Mr. Pankaj Aher (Asst Pro.) S.G.S.S. Dr. J. D. Pawar College of Pharmacy Manur, Kalwan
या पुस्तकात अतिशय महत्वाचं असं एक ब्रीद वाक्य प्रस्तुत केलेलं आहे ते ब्रीद वाक्य असं आहे कि “विजेता वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात” असं म्हटलेलं आहे आणि या पुस्तकाचे विश्लेषण असं की या पुस्तकाचे स्वरूप एखाद्या वस्तू रचना विषयक माहिती पुस्तक आहे. याच्यासाठी वस्तू रचणे प्रमाणेच पायाभरणी करण्या पासून ते यशाची कर्तृत्वाची भक्कम इमारत कशी उभी करावी तशेच “विजयाची कमान किव्वा उद्दिष्ठे पूर्तीची इमले कशी उभी करावी” इतक्या पासून तर कोणत्या मार्गाचा अवलंबन करणे उचित आहे. ह्या सर्व बाबींची समर्पक उदाहरणे देऊन सांगोपांग विवेचन केलेले आहे . म्हणजेच विश्लेषण केलेले आहे. तशेच त्याच्यासाठी आवश्यक असा यशाचा हुकुमी आराखडा हि यात दिला आहे, तस पाहिलं तर खुप साऱ्या पुस्तकांमध्ये माहिती दिलेलीच आहे परंतु ह्या पुस्तकाचं सगळ्यात महत्वाचं उदिष्ट्य असं म्हणता येईल की यशा साठीचे आवश्यक घटक या मागची तत्व, अवगत कृती यात दिलेली आहे. यांचा अवलंब करून तुम्हाला निश्चित यशप्राप्ती कशी करून घेता येईल याचेही यात व्यवस्थितपणे विश्लेषण मांडलेली आहेत मुख्यतः हि मार्गदर्शनपद पुस्तकावर आधारित विश्लेषण आणि यशासाठी किंवा यशाकरिता यशाविषयी नुसती स्वप्न बघून चालत नाही आपलं स्वतःच सुप्त समर्थ ओळखून आपल्यात कोणते कला गुण आहेत हे ओळखून त्याचा पुरेपूर वापर करून निश्चित टप्यात कस यश कस मिळवायचं याची व्यवस्थित पाने मार्गदर्शक रित्या माहिती ह्या पुस्तकातून सादर केलेली आहे. आणि निश्चित हि माहिती सगळ्यांना कामी येईल. हे पुस्तक फक्त लेखात कुठली तरी गोष्ट मांडणे असं नसून त्याच एक कृती रूप असं एक विश्लेषण यात दिलेलं आहे . जेणेकरून प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्याचे विश्लेषण व कृती रूपाने यश सिध्दी आमलात आणु शकतो.