Share

Gunjal Surekha Vilas (Assistant Professor & HoD, Dept. of Zoology, Agasti Arts, Commerce and Dadasaheb Rupwate Science College, Akole)
साप हा शब्द ऐकताच अंगावर काटा येतो व भिती वाटते, पण हा साप एक जीव आहे जो दोन प्रकारामध्ये मोडतो एक विषारी व दुसरा बिनविषारी साप, खरतर बिन‌विषारी सापांना घाबरण्याचे काहीही कारण नाही, कारण त्यांच्यामुळे मानवाला काहीच धोका नाहीये, तरीही आपण सापाला घाबरतो कारण विषारी कोणते व बिनविषारी कोणते हे आपल्याला माहित नसते.

साप या पुस्तकामध्ये लेखकाने विषारी साप व बिनविषारी साप यांची सविस्तर माहीती फोटोसहित दिली आहे. पुस्तकामध्ये आपल्या देशात आढळणाऱ्या एकुण ६५ सापांची माहिती दिली आहे. या माहितीमध्ये सापांचे प्रचलित मराठी नाव, इंग्रजी नाव, शास्त्रीय नाव, आणि ते ज्या भागांत आढळतात तेथील स्थानिक नाव तसेच त्याचे वर्णन, माहिती फोटो अशी पद्धत ठेवली आहे.

विषारी साप एकदा का आपल्याला ओळखायला आले की होणारा धोका कमी होतो, आप‌ल्याकडे विषारी सापामध्ये मण्यार, नाग, घोणस, फुरसे, चापडा असे साप आढळतात, तर काही निमविषारी वर्गातही येतात.

या पुस्तकामध्ये लेखकाने वरील विषारी सापांचा सर्पदंश झाल्यानंतर जी लक्षणे दिसतात याबद्दल माहिती दिली आहे. उदा. नाग – दंश झालेल्या जागी जळजळ होऊन अर्ध्या तासात सूज येऊ लागते. अंग जड होऊन हातपाय गळल्यासारखे वाटतात. डोळ्यांच्या पापण्यांवर नियंत्रण न राहिल्यामुळे त्या मिटतात. तोंडातून लाळ गळू लागते. मळमळून उलट्या होतात आणि घाम फुटतो. श्वास घेणे जड जाते. जीभ जड झाल्यामुळे बोलता येत नाही व गिळण्यासही त्रास होतो. बऱ्याच वेळा दातखिळी बसते.
मण्यार, पट्टेरी मण्यार – ह्या सापांचे विषदंत लांबीला कमी असतात. यांचेविष नागाच्या विषापेक्षा खूप तीव्र किंवा जहाल असते. बरीचशी लक्षणे नागाच्या दंशाप्रमाणे असतात. फक्त दंश झालेल्या जागेवर जळजळ होत नाही किंवा सूज येत नाही व काही वेळाने पोटात आणि सांध्यांत अतिशय वेदना होऊ लागतात.
घोणस – दंश झालेल्या जागी तीव्र वेदना सुरू होऊन जखमेभोवतालचा भाग सुजू लागतो. दंश झालेल्या अवयवावर कधीकधी फोड येतात. नाडीचे ठोके अनियमित होतात. कित्येकदा तोंडावाटे, नाकावाटे व लघवीतून रक्त पडते.
फुरसे – फुरशाच्या आकाराच्या मानाने त्याचे विषदंत लांब असतात. त्याचे विष घोणसपेक्षा जहाल असते. त्याच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. दंश झालेल्या जागी प्रथम जळजळ सुरू होऊन नंतर ती संपूर्ण अवयवावर पसरते. दंश झालेल्या भागातून, लघवीतून व हिरडीतूनही रक्त पडते. त्यामुळे अशक्तपणा येतो.
याचबरोबर प्राथमिक उपचार काय करावेत आणि काय करू नये याबाबतही माहिती दिली आहे.
सर्पदंश झाल्यावर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरी सल्ल्याने केलेले उपचार, दंश झाल्यानंतर असे उपचार तत्काळ शक्य होतातच असे नाही. अशा वेळी डॉक्टरांकडे जाईपर्यंत प्रथमोपचार महत्त्वाचे असतात
सर्पदंश झाल्यावर पुढील गोष्टी कराव्यात :
१. जखम स्वच्छ धुवावी.
२. रुंद क्रेप बँडेज दंश झालेल्या अवयवास बांधावे. बँडेज उपलब्ध नसल्यास कापडाचे ४ इंच रुंदीचे पट्टे वापरावेत. दंश झालेला भाग स्थिर ठेवावा. त्यासाठी बँडेज बांधताना फळीचा आधार द्यावा. डॉक्टरांकडे पोचेपर्यंत हे बँडेज काढू नये. घोणस किंवा फुरसे चावले असेल तर मात्र बँडेज बांधू नये.
३. सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते. त्यास धीर द्यावा व उबदार ठेवावे पण त्यासाठी अल्कोहोल पाजू नये. चालणे, बोलणे असे कोणतेही श्रम करू न देता त्यास शांत राहण्यास सांगावे.
४. डॉक्टरांकडे गेल्यावर दंश झालेल्या व्यक्तीस दमा अथवा कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असल्यास प्रथम सांगावे.
५. चावलेला साप मारून डॉक्टरांकडे नेऊ नये.
सर्पदंश कसे टाळावेत याबद्दलही यात माहीती दिली आहे
→ घराच्या आजबाजुला अडगळ नसावी, तसेच उंदीर होणार नाही याची काळजी घ्यावी कारण अडगळ असेल तर लपायला जागा मिळते आणि उंदीर झाले तर भक्ष्यच्या शोधात ते आपल्या घरापर्यंत येतात.
सापां विषयी शंका व अंधश्रद्धेच निराकरणहीं या पुस्तकामध्ये केले आहे.
उदा.साप डूक धरतो !
सापांची स्मरणशक्ती विकसित झालेली नाही, त्यामुळे साप एखादी व्यक्ती अथवा घटना लक्षात ठेवू शकत नाही.
साप दूध पितो !
साप हा सस्तन प्राणी नाही. दूध हे सस्तन प्राण्यांचे अन्न आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचे नाही.
सापाच्या अंगावर केस असतात !
साप हा सस्तन प्राणी नाही. सस्तन प्राण्यांच्याच अंगावर केस असतात.
हरणटोळ जातीचा साप टाळू फोडतो !
माणसाच्या कवटीचे हाड अत्यंत कठीण असते. डोक्याची शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांना छिन्नी हातोडी वापरावी लागते. हरणटोळ हा साप अतिशय नाजूक आहे. साधारणतः या जातीचे साप झाडावर असतात आणि या सापांना चावण्यास माणसाचे डोके जवळ पडते म्हणून हा गैरसमज पसरला असावा.
नागमणी असतो का?
सापाच्या डोक्यावर असा कोणताही मणी नसतो. नागमणी म्हणून विकले जाणारे खडे हे बेन्झाईनचे असतात.
साप पुंगीवर डोलतो !
सापाला कान नसल्याने त्याला ऐकू येत नाही. तो हलणाऱ्या पुंगीच्या हालचालींवर स्वसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून लक्ष ठेवून असतो. त्यामुळे तो डोलल्यासारखा वाटतो. काही वेळा तो पुंगीवर डंख मारण्याचाही प्रयत्न करताना दिसतो.
रात्री शीळ घातल्यावर साप घरात येतो !
सापाला कान नसल्याने शीळ ऐकू येत नाही.
अशी सापांविषयी सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे.

Recommended Posts

उपरा

Yashodip Dhumal
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Yashodip Dhumal
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More