श्री नवले अनिरुद्ध आबा (टी वाय बी एस सी- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर)
परिचय
छावा ही कादंबरी उत्कृष्ट लेखक श्री शिवाजी सावंत यांनी लिहिले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मला संभाजी महाराजांची ओळख अनेक रूपात झाली. युवराज एक शूर लढवया, कोणत्याही प्रसंगी माघार न घेता लढणारा, वीरधोरणी राजकारणी, प्रजादक्ष राजा व संवेदनशील कवी म्हणून संभाजीराजांची ओळख झाली.
कथानक
संभाजी महाराजांनी प्रसंगी आप्त जणांना ही विरोध करून त्यांना शिक्षाही केल्या. पण निररपराधाचा बळी जाऊ दिला नाही. प्रत्येक धर्माचा आदरभाव करायचा. त्यांच्या मनी कोणत्याही धर्माबद्दल असती नव्हती. औरंगजेबाच्या कुटील कारस्थानी महासत्तेसमोर संभाजी राजांनी कधी हार मानली नाही. ते जेव्हा दिलेरखानाला जाऊन मिळाले तेव्हा तो राजकारणाचा एक भाग होता. मात्र काही चुकीचा अफवा पसरवल्या. सोयराबाई आणि दरबारातील काही महत्त्वाचे मंत्री गण यांनी संभाजी राजाविरुद्ध बंडाची स्थिती निर्माण केली. इतकंच काय शिवाजी महाराजांवर वीस प्रयोग केल्याचा आरोपही
केला. कट शहाच्या सर्व राजकारणाला मूठ माती देत शंभूराजांनी आपणच खरे शिवाचा छावा आहोत हे सिद्ध केले.
शैली आणि मांडणे
शिवाजी सावंत यांनी छावा या कादंबरीसाठी अत्यंत समृद्ध आणि प्रभावी भाषा वापरले आहे. त्यांनी पात्राच्या भावनांना आणि विचारांना खोलवर स्पर्श केला आहे. लेखकाने नव्या दृष्टिकोनातून सादर करून संभाजीराजांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
समारोप
संभाजी राजांची ही शिकवण मला या पुस्तकात मिळाली. आयुष्यात स्वतःहून घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर तुम्ही चुकाल, पण त्यातून सुद्धा काहीतरी शिकलं पाहिजे. ध्येयासाठी अंतिम श्वासापर्यंत लढा करणे. संभाजीराजांसारखं बलिदान कधीच व्यर्थ जात नसतं. त्यातून पुढच्या पिढीला लढण्याची नवीन प्रेरणा मिळते. हिंदवी स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या शिवाच्या छाव्यास विनम्र अभिवादन!