Share

Katkar Supriya Rajendra (Student)
SAMARTH SHIKSHANSHASTRA MAHAVIDYALAY
SATPUR, NASHIK

श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे गोड कथात्मक चित्र म्हणजे ‘श्यामची आई’ असे म्हणता येईल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत:च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.
आईच्या सान्निध्यात श्याम कसा घडला, आईच्या कोणकोणत्या गुणांचे त्याला अनुभव आले, आईची थोरवी त्याला कशी प्रत्ययाला आली हे सांगत असतानाच लेखकाने श्यामच्या मर्यादा, श्यामचे सद्गुण सूचित केले आहे. ‘रामरक्षा स्तोत्र’ उतरवून घेण्याची हकिगत, कळ्या तोडून आणण्याचा प्रसंग, घरातून पळून जाऊन परत आल्याचा प्रसंग, दोन आणे दक्षिणा आणण्याचा प्रसंग, वडिलांवर रागावण्या-रुसण्याचा प्रसंग, नोट चोरून घेण्याचा प्रसंग, श्लोक न म्हणता म्हटला असे खोटे बोलल्याचा प्रसंग, असे कितीतरी प्रसंग. आपल्या ठिकाणचे दुर्गुण श्यामला जसजसे जाणवतात तसतसे त्याचे व्यक्तिमत्त्व उजळत जाते, विकास पावते. पुण्य व पाप, सत्कर्म व दुष्कर्म, नीती व अनीती यांचे माणसाच्या हिताच्या दृष्टीने मूलभूत ठरणारे दंडक श्यामच्या आईच्या आचरणातून व उपदेशातून वेळोवेळी व्यक्त झाले आहेत.
खरोखरच, श्यामची हे पुस्तक वाचल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि पुस्तक वाचण्यास सुरु केल्यावर पूर्ण पुस्तक वाचण्याचा मोह आवरणार नाही.
‘श्याम पायाला घाण लागू नये म्हणून इतका जपतोस,
तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप’
असे सांगणारी आई कायमच स्मरणात राहते.
धन्यवाद …

Recommended Posts

The Undying Light

Priyanka Kardak
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Priyanka Kardak
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More