श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या. आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र म्हणजे ‘श्यामची आई’ असे म्हणता येईल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.
Related Posts
Share“गोल्स!” हे ब्रायन ट्रेसी यांचे एक प्रेरणादायी आणि परिवर्तन घडवणारे पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी यशस्वी होण्यासाठी उद्दिष्टांची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट...
Shareधावणे श्रुती शिवाजी(विद्यार्थी )निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव ,मन मे हे विश्वास “हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे.जे...
Share“Personality Development and Soft Skills” (2nd Edition) by Barun Mitra is an insightful and practical guide to enhancing one’s personality...
