Book Reviewed by
भूमिका विकास नांदुरे, TYBA, MVP’s KSKW Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik.
आपण अनेक विषयांवरची पुस्तके वाचतो, पुस्तके माणसाला ज्ञान समृद्ध बनवतात, अनुभव संपन्न बनवतात. मी ही माझ्या जीवनात अनेक पुस्तकांचे वाचन केले परंतु पूज्य साने गुरुजींनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक सतत माझ्या मनामध्ये रुंजी घालत असते. माझ्या मनात घर करून राहिलेले श्यामची आई हे पुस्तक म्हणून माझे आवडते पुस्तक आहे. आईच्या प्रेमाचा मूर्ती मंत झरा म्हणजे हे पुस्तक आहे. श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून त्याने साने गुरुजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम भावी व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात वाचून प्रत्येक वाचकांचे डोळे व हृदय भरून येते. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. श्यामची आई या पुस्तकातून त्यांनी आपली जीवनगाथा कथन केली. श्यामची आई हे पुस्तक मराठी भाषेतील अक्षरधन ठरले आहे. माय लेकरातील प्रेम व संस्कारांच्या हृदय स्पर्शी आठवणी या पुस्तकात आहेत. श्यामच्या बालमनावर जे माणुसकीचे संस्कार त्यांच्या आईकडून झाले. त्या घटना या अजरामर कलाकृतीत कथन केल्या आहेत. साने गुरुजींनी १९३३ साली नाशिकच्या तुरुंगात अवघ्या पाच रात्रीत हे पुस्तक लिहिले. एकदा आश्रमातील मित्रांनी त्यांना विचारले होते, “गुरुजी, तुमच्या जीवनात हा कस्तुरीचा सुगंध कोठून आला? तुमच्यामध्ये ही सेवावृत्ती, नि:स्पृहता कशी निर्माण झाली?, त्यामुळे गुरुजी अश्रूपूर्ण नेत्रांनी म्हणाले, गडयांनो हे सारे माझ्या आईचे देणे आहे बरं, आई माझा गुरु आणि तीच माझी कल्पतरू. प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकवले. केवळ मनुष्यावरच नव्हे, तर गाई- गुरांवर, फुलपाखरांवर, झाडा- माडांवर प्रेम करावयास तिनेच शिकवले. माझ्या आईनेच माझ्या जीवनात अत्तर ओतले. सारे तिचे त्या थोर माऊलीचे! ” देश प्रेम व मानवतेचा केवढा अत्युच्च विचार श्यामच्या आईने त्याला दिला होता. नवे चैतन्य आणि सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती साने गुरुजींच्या आईच्या या संस्कारात आहे.
पुढच्या अनेक पिढ्यांची जीवने विशुद्ध व विशाल बनविण्याची विलक्षण संजीवनी श्यामच्या आईमध्ये आहे म्हणून हे पुस्तक मला खूप खूप आवडते. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वाचून हे पुस्तक समजून घ्यायला हवे. ‘माह प्रेमाचे मह मंगल स्तोत्र’ म्हणून गौरविल्या गेलेल्या या श्यामच्या आई ला त्रिवार अभिवादन!
मुळात वाचता येणे ही बाबच लाख मोलाची आहे, असंख्य पुस्तकातून बहुमोल ज्ञानाचा आणि आनंदाचा साठा आपल्या सर्वांसाठीच खुला आहे. वाचनामुळे मनुष्य सुसंस्कृत होतो. त्याची ज्ञान कक्षा रुंदावते त्याच्या विचार प्रक्रियेला चालना मिळते. वाचनच माणसाला मोठे करतो व त्याचे मन विशाल करतो. वाचनातून जिज्ञासा जागते, आणि सृजनशीलता भरून येते. मला सर्वात जास्त सत्यघटनावर आधारित पुस्तके वाचायला आवडतं. मी आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांपैकी मला सर्वात जास्त आवडलेले पुस्तक म्हणजे ‘श्यामची आई’. या पुस्तकामध्ये वर्णन केलेले कोकणातील वातावरण, तिथली माणसं, श्यामची आई याचं चित्रण जणू काही डोळ्यांसमोर उभं राहत. पुस्तकातली एक एक गोष्ट वाचताना अक्षरशः डोळ्यांमध्ये पाणी येत. घरची गरीबी, आजारपण, कष्ट सगळे असताना ही श्यामच्या आईने छोट्या-छोट्या कृतीतून श्यामवर चांगले संस्कार केले.
तेज स्पर्शाने दूर होई अंधार
जैसा मुळांचा वृक्षास असे आधार
शिल्पास आकारी जैसा शिल्पकार
मना घडवी संस्कार………
श्यामची आई कशी होती तिचा स्वाभिमान मायाळूपणा, भिडस्तपणा, प्रसंगी कठोरपणा आपल्याला या पुस्तकातून येतो. साने गुरुजींनी त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग या पुस्तकामध्ये वर्णन केलेले आहे. व त्या प्रत्येक प्रसंगातून त्यांच्या आईने त्यांना कसे घडविले. कशी शिकवण दिली तेही त्यांनी या पुस्तकांत मांडलेले आहे.
एकदा लहानपणी अंघोळ केल्यानंतर पायाच्या तळव्यांना घाण लागू नये, म्हणून श्यामने आईला लुगड्याचा पदर पसरण्यास सांगितले तेव्हा आई त्याचे ओले तळवे पुसत म्हणाली, “बाळ , जसं पायला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसेच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो.” किती तत्वज्ञान श्याम बरोबरच आपल्यालाही या वाक्यात मिळत आहे.
एकदा श्यामने त्याच्या मित्राकडून रामरक्षा वाचण्यासाठी घेतली व ती पाठही केली तेव्हा आई त्याला असं म्हणाली की, ” बाळा असंच कष्ट करत रहा पण आपल्याला काही येतंय म्हणून दुसऱ्याला कधीच कमी लेखू नकोस” सर्वांशी प्रेमाने वागावे ही शिकवण तो आयुष्यभर विसरणार नाही. एकदा आईने फुले आणायला सांगितली होती, तेव्हा श्यामने कळ्या देखील खुडून आणल्या होत्या तेव्हा आई श्यामच्या जवळ येत म्हणाली, “बाळा फुलेही सर्वांसाठी असतात” देवपूजेसाठी सर्वजण फुले वाहतात, तेव्हा सारी फुले आपणासाठी घेऊन येणे बरे नव्हे, तु फक्त स्वतःचा विचार केलास! अरे देव सर्वांचाच आहे. फुलण्याच्या आधी कळ्या तोडणे हे वाईटच कळयांना झाडावरच फुलू द्यावे. डोळे उघडे ठेवून हसू द्यावे.
आयुष्यभर पुरणारी
वाटून ही उरणारी
संस्कारांची शिदोरी
कधीही न संपणारी
श्यामच्या आईची इतकी साधी बोलणी पण त्यात किती खोल अर्थ भरला आहे ना! श्यामला पाण्यात पोहण्याची खूप भीती वाटत असत त्यामुळे तो घरात लपून बसला होता तेव्हा त्याच्या आईने त्याला काठीने बाहेर काढून पोहायला पाठविले अशाप्रकारे श्यामच्या आईने रागावत देखील श्यामवर चांगले संस्कार केले.
एकदा आश्रमातील मित्रांनी त्यांना विचारले होते, “गुरुजी तुमच्या जीवनात हा कस्तुरीचा कोठून आला? तुमच्यामध्ये ही सेवावृत्ती नि: वृत्त कशी निर्माण झाली? त्यावेळी गुरुजी अश्रूपूर्ण नेत्रांनी म्हणाले, गडयांनो हे सारे माझ्या आईचे देणे आहे बरे.
आई माझा गुरु,
आई माझा कल्पतरू
आईचे प्रेम आकाशाहूनही मोठे आहे
आई सागराहूनही खोल आहे…..
प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकवले केवळ मनुष्यावरच नव्हे, तर गाई- गुरांवर, झाडा झुडपांवर, फुलपाखरांवर प्रेम करावयास तिनेच शिकवले माझ्या आईनेच माझ्या जीवनात अत्तर ओतले सारे तिचं! त्या थोर माउलीचे!!”
देशप्रेम व मानवतेचा केवळ अत्युच्च विचार श्यामच्या आईने दिला होता. साने गुरुजींवर झालेले एकेक चांगले संस्कार त्यातूनच ह्यांनी आपल्याला एक संदेश दिलेला आहे तो म्हणजे
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे….
नवे चैतन्य आणि सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती साने गुरुजींच्या आईच्या या संस्कारांत आहे. पुढच्या अनेक पिढ्यांची जीवने विशुद्ध व विशाल बनविण्याची विलक्षण संजीवनी श्यामच्या आईमध्ये आहे. लहानमुलींसाठी श्यामची आई हे पुस्तक म्हणजेच संस्काररुपी ज्ञान अमृतच आहे. आणि प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी हे पुस्तक वाचून समजून घ्यायला हवे कारण या पुस्तकामधून संकटांना तोंड कसे द्यावे, लहानमुलांवरती चांगले संस्कार कसे करावे हे शिकायला मिळते व आजच्या आधुनिक काळात तर याची खूपच गरज आहे असे मला वाटते.
ज्ञानेश्वरी प्रमाणेच श्यामची आई हे पुस्तक सुद्धा मराठी भाषेच एक अमर ‘भूषण’ आहे. यात काही शंका नाही म्हणून हे पुस्तक मला खूप खूप आवडते.
‘मातृ प्रेमाचे महन्मंगल स्रोत’ म्हणून गौरविल्या गेलेल्या या “श्यामच्या आई” ला त्रिवार अभिवादन!