Share

अभिजात म्हणावा असा ग्रंथ आहे. प्रथम प्रकाशित १९८९. आज ३०हून अधिक वर्ष होऊन गेली, तरी हा ग्रंथ वाचला जातो. आजही तो ताजा, वाचनीय, मननीय आहे आणि पुढेही राहील १६ वर्षाचा एक युवक ‘आपल्याला देशकार्य करणारा कार्यकर्ता व्हायचे ही जीवनाची दिशा ठरवतो आणि शिक्षण, पुचक संघटन, ग्रामीण विकास, विविध ‘आंदोलनं… अशा सर्व उचापत्या करत देशभर भ्रमंती करतो, पदयात्रा काढती, काम करतो, लेखन-वाचन-चिंतन करतो… त्याची ही कहाणी आहे.
आंध्र प्रदेशातल्या वादळानंतर केलेलं मदतकार्य, फुटीरतावादी खालिस्तान चळवळीच्या काळात पंजाचमधलं काम, बांगलादेशातलं घुसखोरांविरुद्ध आसाममध्ये झालेलं आंदोलन, ईशान्य भारतातली फुटीरतावादी चळवळ, काश्मीरमधली प्रक्षोभक स्थिती, गुजरातमधलं राखीव जागांविरोधी आंदोलन, रामजन्मभूमी प्रश्न, शहाबानो प्रकरण, यातून उद्भवलेला हिंदू- मुस्लीम नात्याचा विषय, इंदिराजींची हत्या, दिल्लीतलं राजकारण, शेतकरी आंदोलन… अशा सर्व विषयांचा स्वतः समक्ष जाऊन, सहभागी होऊन घेतलेला हा शोध आहे. हा नुसता घडामोडीचा अहवाल नाही. स्वतः पाहिलेल्या, अनुभवलेल्या, सहभागी झालेल्या घटनांचे तपशील तर पात आहेतच; पण त्यांच्या मुळाशी जाऊन घेतलेला हा ‘भारताचा शोध आहे. देशस्थितीचा, देशप्रांचा सखोल अभ्यास तर आहेच; पण नुसतेच प्रश्न मांडणारे पुस्तकी पांडित्य नाही, तर उत्तरे शोधण्याची, कृती करण्याची पडपड यात आहे. सर्व जाती-पाती-वर्ग-धर्म-पंथ भाषा, प्रदेश-लिंग यांच्यावर उठून ‘भारतीय दृष्टीनं भारताच्या प्रश्नांचा शोध घेणारी ही डायरी आहे. एका विचारी कार्यकर्त्याची अंतर्मुख असलेली, अंतर्मुख करणारी, भारताच्या भविष्याबद्दल आशाचादी असलेली डायरी, करियर, कीर्ती, पद, पैसा, संसार पांचा काहीही विचारसुद्धा न करता दहा वर्षांहून अधिक काळ अर्स झोकून देऊन कार्य केल्यावर अविनाश धर्माधिकारी १९८६ साली IASमध्ये निवडले गेले. म्हणजे नुसत्या कार्यकर्त्याचा कार्यकर्ता-अधिकारी झाले, असे कार्यकर्ते अधिकारी आत्ता भारतीय प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांत उतरावेत, या हेतूनं त्यांनी १९९६मध्ये IAS सेवेचा राजीनामा देऊन चाणक्य मंडल परिवार’चं शैक्षणिक कार्य सुरू केलं आहे. निवडणुका लढवल्या… भ्रष्टाचार विरोधासाठी, माहितीच्या अधिकारासाठी आणि नागरिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आंदोलनं केली.
देशकार्याची धडपड सुरू आहे….

Recommended Posts

उपरा

Dr. Bhausaheb Shelke
Share

Shareपुस्तक पुनरावलोकन नाव : प्रा .सोनाली अनिल काळे कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक. विभाग: एम. बी. ए. उपरा लेखकाचे नाव: लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे आत्मकथन उपरा हे मराठी साहित्यातील एक […]

Read More

The Undying Light

Dr. Bhausaheb Shelke
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More