Book Review: Sawkar Manish Baliram, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana
गांधारी! डोळ्यावर पट्टी बांधुन असणारी, मौन पण तेवढीच डोळस आणि विचारी. तस गांधारी है नाव कमीच उल्लेखात आले, माझ्या मते भास्कर जगतापांनी मांडलेली द्रौपदी आणि शिवाजी सांवत यांनी लिहीलेली कुंती यात गांधारी आर्त हाक कदाचीत कुठेतरी हरपली , मंदावली आणि म्हणूनच सकल सौभाग्यमंडित देवी गांधारी मौनच राहिल्यात पण डॉ क्षेत्रमाडे यांनी गांधारीमातेच्या हाकेला आपल्या कादंबरीतून वाट करून दिली क्षेत्रमाडे यांनी मांडलेली गांधारी काही अशी.
गांधारनरेश सुबल आणि समाराशी सुधर्मायांना देवी मीनाक्षी यांच्या उपासनेतून प्राप्त झालेली सुलक्षणी आणि सुनयनी कन्या म्हणजेच राजकुमारी गांधारी. लहानपणापासून गांधारी प्रेमळ व तेवढीच धाडसी होती आणि त्यापेक्षा अधिक धार्मिकही. देवावर नितांत श्रद्धा असणाऱ्या राजकुमारी श्री शंभूमहादेवाचे कठीण व्रतं आचारिलें व शौर्यशाली आणि दिर्घायु पतीसाठी प्रार्थना कली. उपवर झाल्यावर महाराज सुमल यांनी चोहोकडे अचेत राजकुमारांना आमंत्रणे दिलीत व गांधारीच्या विवाहाच्या बोलण्या सुरू झाल्यात. एका दिवशी कुरुभूषण, गंगापुत्र भिष्म आणि महान दिग्विजयी सम्राट पांडू गांधारदेशास आले. ज्येष्ठ कुमार अंध धृतराष्ट्रासाठी गांधारीची मागणी केली. दोन्ही कुरुभूषनांमुळे धृतराष्ट्राचे अंधत्व दिपले नव्हे तर लपले आणि लग्णाच्या तयाऱ्या सुरु झाल्या, पण महाराज सुबल गांधारिला वराच्या अंधत्वाबद्दल सांगायचे विसरले. कदाचित मीनाक्षी मातेला गांधारीची परीक्षा पाहावयाची असावी. माहिती झाल्यावर पतीसेवातत्पर, सुलक्षणी गांधारीने सर्व गांधारदेशवासी व हस्तीनापुरवासी यांच्यासमोर सर्वदेव, ब्राम्हण आणि पंचमहाभूतांना साक्षी मानून गांधारीने आजीवन डोळ्यावर पट्टी पांधुन राहण्याचा प्रण केला आणि त्या पातिव्रतेने आपले मनोहर डोळे जन्मजन्मीसाठी बांधुन घेतले.
गांधारी अगदी हस्तीनापुरशी, राजपरिवाराशी एकरूप झाली कुरुवंशाला जेष्ठ स्वस्नुषा शोभावी असच तीच वर्तन, आत्मसम्मान होता. गांधारीचा सत्यप्रीय स्वभाव, मृदु- प्रेमळ बोलण यामुळे पांडुमाता अंबालिका व अंबिका आणि पांडू पत्नी कुंतीशी आधीक जवळीक साधली गेली. माता कुंती तर घटकान- घटका देवी गांधारीशी बोलत असत. थोडा काळ लोटला आणि कर्म चक्र फिरले पांडु परिवार वनवासास गेला व राज्यपद जेष्ठ धृतराष्ट्रास प्राप्त झाले. याचकाळात महर्षी व्यासांच्या आर्शिवावाने दोन्ही राजस्नूषा गर्भवती झाल्यात परंतु नियतिच्या मनात वेगळे नियोजन होते. माता कुंती यांना दोन वेळा गर्भधारणा झाली व दोन पुत्ररत्न प्राप्त झाले दोन वर्षाचा काळ लोटला गेला मात्र देवी गांधारीचा गर्भ वाढत होता परंतु प्रसूत मात्र झाल्या नाही. दोन्ही माता सोबत मातृप्रवासावर निघाल्या पण ही दोन वर्षाची उपेक्षा देवी गांधारीला असहाय्य झाल्यात आणि त्यांनी गर्भावर प्रहार करून दासीच्या मदतीने प्रसूत झाल्यात मात्र यात त्यांची क्रूर चेष्ठा झाली. माता गांधारीने एका मासाच्या गोळ्यास जन्माला घातले. निराश गांधारी देवी स्वताला व आपल्या नशीबाला दोश देत नारायणांसमोर आक्रोश करू लागल्या. तेव्हाच महर्षी व्यासांनी प्रकट होऊन त्या गोळ्याचे शंभर कुंभामध्ये कृत्रिम गर्भधारणा करवून गांधारीला शंभर कौरव कुमाराची माता होण्याच सौभाग्य दिले. खरंच गांधारीच्या पुण्य फळास आले व देवऋषीसेवा करून प्राप्त झालला शतपुत्रवतीभव हा आशीर्वाद सत्कारून घेतला.
काळाने आसूड हाणून आपला रथ हाकला आणि पांडव इंद्रप्रस्थ सोडुन दयुताच्या आमंत्रणास बळी पडले, त्यांचे आगमण राजधानीस झाले. आपला भाऊ शकुनी याची धूर्त प्रवृत्ती आणि पती धृतराष्ट्र यांचा पक्षपाती पुत्र मोह यांचा देवी गांधारीला मनस्वी संताप. दयुताच्या वेळेस सगरागिनी या हक्काने देवी गांधारी यांनी खेळ थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांची हाक पुन्हा ऐकण्यात नाही आली द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेस दुःशासणाला हात कापण्याची धमकी देऊन पुर्ण सभेला सर्वनाशाची पूर्वसूचना देऊनही मातेची हाक पुन्हा वायुमंडलात विरून गेली. त्या विटाळ कृत्यानंतर पुत्राला क्षमा करावी म्हणून पदर पसरवणारी गांधारी आपला आत्मसन्मान विसरली. युद्ध सुरु झाले – महाभारताचे, युद्ध टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या गांधारी देवींचे शब्द परत वगळण्यात आले. पुत्राचे मन वळवणाऱ्या गांधारीला नेहमी अपयश येत गेल आणि तो कल्पीत सर्वनाश घडला. पुत्रशोक सोडुन विधवा स्नूषांचे सांत्वन करणारी देवी गांधारी नक्कीच दैवी अवतार असावी. काळाने अजुन दौड घेतली मनावरचे घाव अजून ताजेच होते. पण मन वळवण्यासाठी स्नुषांसमत स्वतःला देवी गांधारींनी देव-तऋषी सेवेत रमवून घेतले पुत्रांच्या मुक्तीसाठी बेचैन अशणारे धृतराष्ट्र मुबलक दान धर्म देत परंतु ते गांधारी मातेला पटत नसत कारण आता ते वैभव पांडवाचे होते. बरेच वर्ष लोटले गेले आणि एक दिवशी धर्मराज व माधव यांच्याशी बोलून गांधारीने धृतराष्ट्र यांच्या सहित वानप्रस्थाश्रम स्वीकारले. सोबत त्यागमुर्ती माता कुंतीही निघाल्या. श्री सांबाची मनोभावे तपस्या करून आणि अनेक व्रत आचरून मन जेव्हा आसक्त झाले तेव्हा अंतिम अग्निहोत्र मुक्ती प्राप्त केली.
या महान साधवी, सत्यप्रीय, आत्मसम्मानी गांधारीने आपले संपुर्ण जीवन त्यागमय व्यतीले. कठोर व्रत आचरणानी-साधवी गांधारी, कठोर पतीसेवा प्रीय- पतीव्रता गांधारी, कुटील भावास नमवनारी -सत्यप्रीय गांधारी, द्रौपदीच्या शीतल रक्षणारा पुत्र शापवणारी – न्यायप्रीय गांधारी, दुर्योधनाची वैर्यभाव विसरवण्यास गयावया करणारी- माता गाधारी, देवब्राम्हण हितपालक – राजमाता गांधारी, एकच गांधारी मात्र चरित्र अनेक अशा या महामाता देवी गाधारीचे चरित्र खरंच स्त्रित्व भुषवीणारे आहे.
माझी आई, आजी किँबहुना सर्व भारतीय स्त्रीयांसाठी आदर्श असणाऱ्या पंचकन्या म्हणजेच ” अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा सत्यप्रीय महागाता गांधारीचे नाव नक्कीच भुषणावाय आहे. हे पुस्तक प्रत्येक स्त्रीने वाचायला हवे जेणेकरून त्या माता गांधारीचा आत्मसन्मान , निर्भयता आणू शकतील.