नाव :-सिमंतिनी संजय निगडे ,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे .
मायमिरर पब्लिशिंग प्रकाशित लेखिका डॉ. रश्मी यांनी लिहलेले “समाजसेविका सुधामूर्ती प्रेरणादायी जीवनचरित्र या पुस्तकाचे शीर्षक बघूनच पुस्तक वाचण्याची ओढ लागते आणि मुखपृष्ठावर असलेला हास्यमूर्त सोज्वळ सुधामूर्ती चा चेहरा पाहून आपुलकीचा सुगंध दरवळतो.
डॉ. रश्मी यांनी अत्यंत विचारपूर्वक या पुस्तकाचे लेखन अतिशय सुंदर आणि सोपे भाषेत मांडले आहे. यामध्ये एकुण २९ छोटे त्यामध्ये बालपणापासून ते वाढत्या वयाच्या दिशेने एका महान व्यक्तिमत्वामध्ये काय गुण दिसून येतात तसेच प्रत्येक परिस्थितीमध्ये ते सामोरे कसे जातात व त्यांना येणाऱ्या संकटाना धैर्याने मात करुन समाजामधील ते आदरणीय/महान व्यक्तीमत्व कसे बनतात थाचे विश्लेषन लेखिका करतात.
सुरुवातीला आयुष्य आणि बालपणाबद्दल वाचताना प्रकर्षाने जाणवते की तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती” एखादे महान व्यक्तिमत्व त्याच आई-बापाच्या पोटी जन्माला येते ज्याच्यांत तेवढे महानत्व, पुण्य जोडीला आहे ते व्यक्तिमत्व घडत असताना त्यावर होणारे बालसंस्कार त्यांच्या मनावर आयुष्यभरासाठी कोरले जाते. आणि त्याप्रमाणेच सुधामूर्तीच्या मनावर अगदी लहान पणा पासूनच राष्ट्रभक्ती, समाजसेवा, जिज्ञासूवृत्ती, चिकाटी, परिश्रम, आपुलकी परोपकार भाव आणि वाचनलेखन ची आवड ही मूल्ये कोरली गेली जी आजतागायत त्यांच्यात आपणास पाहायला भेटतात आणि वेगवेगळ्या उदाहरणांतू लेखिका यांचे विश्लेषन सुंदर प्रकारे करतात.
शिक्षण आणि कारकीर्द करताना त्यांना प्रथम महिला इंजिनिअर म्हणून आलेले अनुभव असेन किंवा टेल्को कंपनीमध्ये पुरुषप्रधान विचारसरणी अतिशय उत्तमरित्या महिला सशक्तीकरणासाठी रोवलेले बीज असेल. यातुनच जाणवते की महान व्यक्तिमत्व कधीही प्रवाह सोबत नाही तर प्रवाहाविरुद्ध जातात आणि इतिहास घडवतात.
बालपण, शिक्षण, आणि कारकीर्द निभावताना आयुष्याच्या टप्पा एका विकाणी येवून थांबतो तो म्हणजे ‘लग्न’ आणि आयुष्याचा जोडीदार निवडताना ते शेवटपर्यंत साथ देण्याचा निर्धार आलेले नकार तरी त्यामधून एकेमेकांप्रती विश्वास ठेवून पुढील आयुष्याला केलेली सुरुवात – साथ शेवटपर्यंत आजच्या जी आजच्या पिढीला आदर्श नाते संबंधाचे उदाहरण आहे. तसेच सुधा मूर्ती एक आई म्हणून त्यांच्या मुलांना घडवताना त्यांच्यावर ही सामजिक मूल्ये, साधी राहणीमान, परोपकारी स्वभाव आणि सामजिक बांधिलकी चे बीज रोवतात.
स्वतःचे शिक्षण कारकीर्द त्यानंतर नातेसंबंध- परिवार सांभाळताना ही सामाजिक बांधिलकी, सांभळायला विसरले नाही. नारायण मूर्ती ना प्रवासात साथ देवून उभरलेली इन्फोसिस कंपनी जेव्हा अस्तित्वात आली त्यानंतर त्यासावी त्यांनी घेतलेले अहोरात्र कष्ट, प्रयत्न, कंपनी कर्मचारीचा अर्जित केलेला विश्वास, आपुलकीचे वातावरण उत्तम सेवा नवनवीन उपाययोजना यातूनच त्यांचे खडतर प्रयत्न आणि परिश्रमाची मूल्ये दिसून येतात. आणि कंपनी नावारुपाना आल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी निर्माण केलेले ‘इन्फोसिस फाऊडेशन’द्वारे त्यांनी समाजकार्य आणि विविधसेवा पुरवठा चालु केला.
समाजसेवेमध्ये त्यांचे फाऊडेशनद्वारे [CSR] कॉर्पोरेट सामजिक उत्तरदायित्व असेल किंवा महिलांच्या सशक्तीकरणासाठी केलेली उल्लेखनीय कामगिरी असेल तसेच सामाजिक व सांस्कृतिक परंपरे ची जोपासना करून त्यांची कृतज्ञता विनम्रता , आपुलकी चि भावना ही मूल्ये दिसुन येतात ही मूल्ये त्यांच्या व्यक्तिमत्वात हिरे-मोतीची भर घालतात.
तसेच पृष्ठ क्रमांक ६५ मधील भागामध्ये लेखिका त्याच्या विन्रमता, परोपकारी, साधीराहणी याबद्दल सांगतात ज्यामध्ये सूधामूर्ती यांचे श्रेय आपल्या आजीला आणि पालकांना देतात. तसेच पुढील पिढीलाही ही मूल्ये जोपासली पाहिजे असे त्या मनोमन व्यक्त करतात त्यासोबतच त्या लोककल्याण, शिक्षण आणि आणि आरोग्य क्षेत्रामध्ये कामगिरी करण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांनी कौटुंबिक जीवन आणि व्यावसायिक जीवनाची सांगाड घालुन सामजिक बांधिलकी जपत ले कशाप्रकारे एकसंध करता येते याचे उदाहरण दिले आहे.
पुस्तकाचा पूर्वार्थ इथपर्यंत संपतो, मध्यान्ह मध्ये त्यांची काही छायाचित्र आहेत ज्यामध्ये त्यांचा लहानपणीचा फोटो त्यानंतर परिवारा- सोबत, त्यानंतर त्यांचा प्रिय श्वान गोपी सोबत , तरी दुसऱ्या छायाचित्रात लहान मुलांसोबत बसलेली एक शिक्षिका, एकामध्ये पुरस्कार स्विकारणारी समाजसेविका तर एका छायाचित्रात पुस्तकाचे अनावरण करणारी लेखिका, तसेच पती आणि मुलांसोबत कायम उभी असणारी गृहिणी अशा विविध रुपांत त्यांचे दर्शन घडते पण सर्व छायाचित्रांमध्ये एक समानता असेल ती म्हणजे सुधामूर्ती ची ती प्रेमळ आणि सोज्वळ हास्यछटा जी पाहून मन सुद्धा सकारात्मक आणि प्रसन्न होते.
पुस्तकाच्या उत्तरार्धात सुधामूर्ती चे, सामजिक कार्याची, त्यांच्या विचारांची व त्याचे आपत्ती व्यवस्थापन मधील इन्फोसिस फाऊडेशन द्वारे केले गेलेले योगदानाची लेखाजोगा पुखले. त्यातील त्यांचे एक वाक्य जे मनाला प्रभावित करते ते म्हणजे “गरिबीच्या चक्रामधून बाहेर पडायचे असेल तर हे चक्र भेटण्याची आणि स्वतःला सशक्त बनवण्याची क्षमता ही शिक्षणाने प्राप्त होते.”
त्यांनी कॉर्पोरेट सामजिक जबाबदारी अंतर्गत 2000 साली अक्षयपात्र योजना, शास्त्रविषयक संशोधन मूलभूत वैद्यकीय सेवा पुरवठा, गाव दत्तक घेण्याची योजना आणि शिक्षणासारख्या मुलभूत सुविधा मिळवण्यासाठी ते अजूनही कार्यरत आहेत.
सुधा मूर्तीने कोविड मध्ये केलेले योगदानही याला अपवाद नाहीत १०० करोडच्या कोषमूल्यांसह त्यांनी विविध उपक्रमांना चालना दिली. शिक्षण तसेच आरोग्य सेवेमध्ये विविध उपक्रम राबवले. त्यामध्ये शाळेचे नूतनीकरण, शिष्यवृत्ती, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, दवाखान्याची निर्मिती आरोग्य शिबीर अशा विविध उपक्रम राबवले गेले याबद्दल वाचताना लक्षात येते की महान व्यक्ती एखादे कार्य निस्वार्थ भावनेने करत राहतात आणि विनम्रता एवढी की त्याचे श्रेय न घेता त्याला सामजिक बांधिलकी व समाजाला आपण देण लागतो असे म्हणून उदारता दाखवतात.
या पुस्तकामधील सर्वात आवडलेला भाग असेल तर तो म्हणजे पृष्ठ क्रमांक ११५ वरील “उदारता आणि विनम्रतेचा भाग आहे यामध्ये दिलेले आठ धडे अष्टांग योग प्रमाणे आयुष्यावर प्रभाव पाडतात. जसे पहिला धडा निस्वार्थ सेवा बद्दल सांगतो तर, दुसरा धडा यशप्राप्तीनंतरही विनम्रता शिकवतो तिसरा धड़ा सर्वसमावेशक दुष्टीकोन आणि विविधतेचा स्वीकार करण्याची शिकवण देतो, तर चौथा दृढ निश्चयाने आपत्तीचा सामना करायची धडा देतो, पाचवा व सहावा धडा आयुष्यात सहानुभूतीच महत्व आणि दान देण्याच सामर्थ चे विश्लेषन करतो. तसेच शिकण्याचे (सतत नविन शिकत राहणे) महत्व आणि आणि लहान कामांचा मोठा प्रभाव यांचे स्पष्टीकरण सातवा आणि आठवा शिकवतो आपण यामधून आयुष्य भरासाठी मोलाची शिकवण घेऊन अशा महान व्यक्तींचा आदर्श जोपासू शकतो.
सुधा मूर्ती एक आई म्हणून मुलांवर साधी राहणी आणि सामजिक बांधिलकीचे संस्कार करतात. एक लेखिका बनून त्यांच्या लेखनाद्वारे सामजिक दृष्टीकोन बदलण्याची ताकद ठेवतात. एक जोडीदार म्हणून प्रत्येक वळणावर पतीला दिलेली साथ, आणि उद्योजिका म्हणून आलेल्या संकटाना दिलेली मात त्याच्यातील मूल्ये चा प्रभाव दाखवून देतात. त्यासोबतच त्यांच्या फाऊडेशनद्वारे विविधसेवा पुरवताना समाजसेविकांचा भाग ही त्या निभावतात.
प्रत्येकाला आयुष्याच्या वळणावर प्रेरणा देणारी त्याची काही वाक्ये आहेत जे सत्य परिस्थिती • आनंदी राहणी व समाधानी जीवनाचे गुपित खोलते अनंत समाधान आणि ऐहिक- भौतिक सुखां मधील फरक स्पष्ट करते. हे या पुस्तकातील अंतिम भागात आहे त्यातील काही वाक्ये खालील प्रमाणे.
1) ” तुमची पार्श्वभूमी तुम्ही कोण आहात हे ठवू शकते , पण तुम्ही काय होवू शकता हे तुम्ही काय ठरवता यावर अवलंबून असते.
2) खुल्या मनाने विचार पूर्वक दान करा.
3)राग जपण्यासाठी जीवन फारच लहान आहे.
4)सर्वात मोठे धन स्वास्थ आहे.
5) व्यक्तिगत ध्येयप्राप्ती म्हणजे यश नाही तर दुसऱ्यांना विकासासाठी प्रेरणा देणे हे खरं यश आहे.
6) तुम्ही जे करता त्यावर प्रेम करा. तुम्ही नक्कीच महान काम करू शकाल.
अशी त्यांची महत्वपूर्ण वाक्यांचे अमृत ग्रहन करत पुस्तकाचे शेवट लेखिका करतात. लेखिका डॉ. रश्मी यांनी अत्यंत प्रभावीपणे सुधामूर्ती यांचा जीवनपट रंगविला आहे. जो वाचकाला त्याच्या बद्दलचा आदर, सकारात्मक- दृष्टीकोन, आणि मनुष्य जीवन जगताना माणुसकी जोपासमाला शिकवतो व मूलतत्वे अंगीकृत करायला लावतो. हीच मूलतत्वे आपण आयुष्यात स्विकारली तर एका महान व्यक्तीमत्व बनण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही असे आदर्श आणि शिकवण देणारे १७६ पानांचे सुंदर पुस्तक आहे.