Book Review: Mrunali Samirsing Sisode, Second Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana
“सवय जिंकण्याची” – कित्येक लोकांना इच्छा असते की काहीतरी चांगली सवयी लागण्याची जशी वाचनाची, सकाळी लवकर उठण्याची, रोज व्यायाम करण्याची पण कधी कोणी म्हणत का, मला सवय लागायला हवी जिंकण्याची. हो जिंकण्याची सवय. पण ही सवय लावण्यासाठी सोपे साधन कोणते, म्हणतात की कथेतून प्रसंग जिवंत होतात आणि लक्षात राहतात कायम-मनात विचारात. “किती जणांच्या लक्षात आहेत कॉलेजमध्ये अभ्यास केलेले चाप्टरस” फार कमी हो! पण शाळेत दुसरी तिसरीच्या पुस्तकातील गोष्टी आजही आपल्याला आठवतात. मग ते एकीचे बळ असो की लांडगा आला रे आला ची गोष्ट असो. मग चला आज पाहूया अशाच काही गोष्टी स्वतःला एक सवय लावण्यासाठी. “जिंकण्याची सवय”
ध्येय: मित्रानो जिंकायचे असेल तर सर्वात महत्वाचे साधन म्हणजे ध्येय१९६३ मध्ये Howard Business School मध्ये एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारले की तुम्ही स्वतःचे ध्येय लिहून काढले आहे का? आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे ते तुम्ही ठरवले आहे का? फक्त ३% मुलांनी आपल्याला काय करायचे आहे ते लिहून काढले होते. २५ वर्षानंतर त्या शिक्षकांनी पुन्हा त्या वर्गाची भेट घेतली,की विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात काय केले हे जाणून घेण्यासाठी. तर त्यांना असे निरीक्षणात आले की त्या ३% टक्के मुलांची कामगिरी इतर मुलांना पेक्षा जास्त उत्कृष्ट ठरली होती. आणि इतरांपेक्षा जास्त आनंदी ही होते ते. आपल्याला हवे ते करणे आणि आयुष्याला मनासारखे आकार देणे हे ह्या ध्येयवाद्यांना जमले होते.
तुमचा ससा बदलू नका (आपले ध्येय बदलू नका): एकदा एका सभेमध्ये एकाने जॅक्म हे आलीबाबा डॉट कॉम चे संस्थापक यांना त्यांचे यशाचे रहस्य विचारले तेव्हा त्यांनी सांगितले तुम्ही स्वता:वर आणि तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. स्वप्नाजवळ जाण्यासाठी जे काही योग्य मार्गाने करता येईल ते करा. त्यासाठी नवे तंत्र आणि कौशल्य शिका पण स्वप्न मात्र बदलू नका, विसरू नका यासाठी एकाग्रता खूप महत्त्वाची असते. समजा तुमच्यासमोर नऊ ससे पळत आहेत आणि तुम्हाला त्यातला एक पकडायचा असेल तर एकावरच लक्ष केंद्रित करा तुम्ही सगळ्यांना पकडायचा प्रयत्न केला तर एकही न मिळण्याची शक्यता जास्त असते. तो जर फारच पळकुटा असेल तर त्याला पकडण्याची युक्ती किंवा तंत्र बदला पण तो ससा मात्र बदलू नका. तुमच्यासमोर अनेक संधी येतील, सगळ्या संधी साधने शक्य होणार नाही त्यामुळे एक ससा पकडा आणि त्याला खिशात बंद करा आणि मगच दुसऱ्याच्या मागे जा मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमचे ध्येय लिहून ठेवा तुमचा ससा कोणता ते ठरवा आणि फक्त त्यालाच पकडा.
स्वता:वरचा विश्र्वास: अनेक क्रीडाकथा माणसाला प्रोत्साहित करतात, पण त्यात करोली टॅक्स सारखी दुसरी कथा नाही. करोली टॅक्स हा हंगेरियन सैन्यातील सर्वोत्तम पिस्तोल नेमबाज होता. त्याने वयाच्या 28 व्या वर्षापर्यंत बऱ्याच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या. 1940 च्या ऑलम्पिक स्पर्धेत तो एकमेव सांभाविक विजेता होता, पण सैनिक प्रशिक्षण घेताना त्याच्या हातात एक हात बॉम्ब अचानक फुटला आणि नेमका त्याच नेमबाजीचाच हात संपूर्ण उद्ध्वस्त झाला आणि त्याबरोबर ऑलिंपिक मध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्नही उध्वस्त झाले अशावेळी नशिबाला दोष देऊन तो घरातच बसला असता, तर जगाने त्याला सहानुभूती दाखवली असती पण सहानुभूतीवर जगणारे योद्धे कसे. हा योद्धा उठला, मानसिक ताकद खंबीर केली, सहानुभुतीवर न जगता आपल्या डाव्या हाताने नेमबाजीचा सराव सुरू केला आणि हा डावा हातच जगातला सर्वोत्तम नेमबाज होणार बस ह्या शिवाय दुसरा विचारच नव्हता. बरोबर एका वर्षानंतर कोरोली आपल्या हंगेरीच्या राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत आला त्याच्या सर्व मित्रांनी आणि स्पर्धकांना असे वाटले की तो त्यांना प्रोस्ताहन द्यायला आला आहे. पण जेव्हा करोलीने सांगितले की, मी स्पर्धेत भाग घ्यायला आलो आहे. तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला, त्याने स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धाही जिंकली.
मित्रांनो स्वतःची किऊ करत जगणं सोपं आहे. जगाची सहानुभूती मिळते आणि ती आपल्याला हवीहवीशी वाटते पण ती नेेहमीच घातक असते. दुर्दैवाने करोलीचे ऑलिंपिकचे स्वप्न लगेच पूर्ण होऊ शकले नाही.पण त्याने हार न मानता 1948 सालच्या ऑलिम्पिक सामन्यात सुवर्णपदक जिंकले. त्याने आपल्या डाव्या हाताने नेम धरून स्वप्न पूर्ण केले. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे क्षण येतात. जेव्हा आपण यशाच्या अगदी जवळ जातो आणि अचानक सगळंच हरवून जातं. तेव्हा काय गमावलं याचं दुःख कधीच करत बसू नका, हातात जे शिल्लक आहे त्याच्यावर मन केंद्रित करा आणि पुन्हा उभे रहा.
जिंकणं म्हणजे नक्की काय असतं? यशाच्या नशेने धुंद होऊन बुद्धीजीवी होणं असतं,की एखाद्या विषयाची नशा स्वतःमध्ये बाळगणं असतं. मित्रांनो जर जिंकायचं असेल, तर प्रतेक संकटाला सामोरे जायच असत, कशाचीही पर्वा न करता आपलं ध्येय पूर्ण करायचं असतं. माणसाने मनाचे अडथळे दूर करून जिंकण्याची जिद्द ठेवावी हे ह्या पुस्तकातून शिकायला मिळते. तुम्हाला एक उत्तम नेता व्हावेसे वाटते? स्वतःचा व्यवसाय सुरू करावासा वाटतो? तुमच्या मुलीने तिच्या अंगभूत गुणांचा सर्वाधिक विकास करावा असे वाटते? वरीलपैकी एका प्रश्नाचे जरी ‘होय’ असे उत्तर असेल, तर ‘सवय जिकण्याची’ हे पुस्तक खास तुमच्यासाठी आहे. हे एक असे पुस्तक आहे की जे तुमची विचार करण्याची, काम करण्याची, एवढंच काय तर जगण्याची रीत नक्की बदलेल.