Book Review : MAHALE YOGITA ASHOK ,MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik.
साहित्य आणि सामाजिक संदर्भ’ हे माझे पुस्तक सु. वीस वर्षांपूर्वी (१९७५) प्रसिद्ध झाले, त्याची पहिली आवृत्ती संपूनही आता काही वर्षे लोटली आहेत. साधारणपणे १९६० नंतरच्या काळात उत्तरोत्तर प्रभावी होत गेलेला सांस्कृतिक साहित्यविचार एका ऐतिहासिक वाङ्मयीन गरजेतून किंवा आव्हानातून निर्माण झाला होता. त्याला स्वतंत्रपणे व काहीशा काटेकोर रीतीने सुसूत्र करण्याचा प्रयत्न वरील पुस्तकात मी माझ्या कुवतीप्रमाणे केला होता. सांस्कृतिक साहित्यविचाराला काहीसे पृथगात्य व अर्थपूर्ण स्थान व महत्त्व आहे, ही गोष्ट अधोरेखित करण्याचे काम त्या पुस्तकाने केले असावे व म्हणूनच कंदाचित त्या छोट्या पुस्तकाला त्या वर्षीचा राज्यपुरस्कार लाभून दखलपात्रता मिळाली. वामन मल्हार, कुसुमावती देशपांडे, दि. के. बेडेकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, नरहर कुरुंदकर आदी समीक्षकांनी सामाजिक-सांस्कृतिक साहित्यविचाराचा पुरस्कार केलेला होताच; तथापि तो बराचसा विखुरलेला होता, त्यातून प्रवाहाचा बोध एकवटून होत नव्हता. १९६० नंतरच्या साहित्यनिर्मितीतून सामाजिक-सांस्कृतिक भानाची अनेकविध रुपे प्रकट होत राहिली. त्यांच्या यथार्थ आकलनाची गरज तीव्रतेने जाणवत होती. जीवनासाठी कला किंवा जीवनवाद यांच्या पूर्वकालीन संकल्पना अर्थपूर्ण ठरत नव्हत्या. नवसाहित्यावरील रूपवादी टीपा-टिप्पणींची नवलाई आणि ‘खडकपाण्याची’ गहनता मराठीच्या विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य जिज्ञासू वाचकालाही पुरेशी पुढे नेऊ शकत नव्हती. साहित्यविचाराला स्वतःच्या नवीन वाटा शोधणे भाग होते. त्यांपैकी एक वाट, सामाजिक-सांस्कृतिक अभियांत्रिकीच्या काही परिचित विचाखणाल्या जमेल तेवढ्या रीतीने साहित्यनिर्मितीच्या संदर्भात स्पष्ट करणे ही होती. या वाटेने जात मराठी साहित्याची परंपरा व नवता यांचे ऐतिहासिकतेच्या भानाने काहीएक स्वरूप विशद करणेही आवश्यक होते. मराठी समाजाच्या स्थितिगतीचे व वृत्तिप्रवृत्तींचेही काहीएक स्वरूप अजमावून पाहणे इष्ट होते. ‘साहित्य व सामाजिक संदर्भ’ या पुस्तकात अशा प्रकारची वाट चोखाळण्याचा मी प्रयत्न केला.
बांधीलकी आणि साहित्य ; बांधील किंवा परिबद्ध न्यायसंस्था, बांधील नोकरशाही, बांधील लेखक-कलावंत, बांधील शासन त्या विचारामागे कुठली तरी सांस्कृतिककिंवा वैचारिक पार्श्वभूमी कळत-नकळत तयार झालेली असते. बांधीलकीची किंवा परिबंधाची संकल्पना म्हणूनच दोन दृष्टींनी समजावून घेता येईल जीवनाची जी ध्येयधोरणे भारतीय संविधानात नमूद केली आहेत, त्यांच्या संदर्भात जी एक नवी सामाजिक जाणीव निर्माण होऊ पाहात आहे
साहित्यांची कांतीप्रवणता ;
इंग्लिशमधील ‘रेव्होल्युशन’ या संज्ञेचा ‘क्रांती’ हा मराठी पर्याय आहे. मूळ संज्ञेचा धात्वर्थ ‘चक्राकार गती’ असा असून अवकाशातील ग्रहताऱ्यांना म्हणजे त्यांच्या भ्रमणाला उद्देशून पश्चिमी खगोलशास्त्रात व आपल्याकडील ज्योतिषशास्त्रात या संज्ञेचा वापर केला जातो
विद्रोहाची संकल्पना आधुनिक आहे. पश्चिमी देशांत अठराव्या शतकापासून म्हणजे औद्योगिक समाजाच्या उदयानंतरच ‘प्रोटेस्ट’ची किंवा निषेधाची किंवा विद्रोहाची संकल्पना प्रचलित झाल्याचे दिसते. हे विसावे शतक तर विद्रोहाचेच शतक मानले जाते. अमेरिकेतील निग्रो समाज, होडेशियातील आफ्रिकी समाज, ऑस्ट्रेलियातील आदिवासी समाज आणि भारतातील आजवर अस्पृश्य मानला गेलेला समाज हे सर्व विद्रोही विचारप्रणालीने पेटलेले समाज आहेत.
साहित्य व सामाजिक संदर्भ हे पुस्तक वीस वर्षापूर्वी [१९७५]प्र्शिध झाले व रा. ग .जाधव यांनी लिहले आहे .यात कादंबऱ्या व सांस्कृतिक साहित्यांचा समावेश केला आहे . त्या सत्यतेच्या पुरेपूर व यथार्थ आकलनासाठी ऐतिहासिक, पारंपरिक, सांस्कृतिक, वर्गीय, विचारप्रणालीय, तत्त्वज्ञानात्मक, वैज्ञानिक असे सगळेच संदर्भ नीटरणे समजावून घेणे.. साहित्य हे व्यक्तीचे प्रतिबिंब धानले, तरीही हे प्रतिबिंब ज्यात हग्गोचर होते, तो दर्पण संस्कृतीचाच असतो. ते ‘तलावातले चांदणे’ असते. मनुष्यजीवनचा हा सर्वोच्च महाप्रत्यय होय.