नाव : प्रा .सोनाली अनिल काळे
कॉलेजचे नाव : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- नाशिक.
विभाग: एम. बी. ए.
बाबुराव बागुलांनी लिहिलेली सूड ही मराठी दलित साहित्यातील महत्वाची कादंबरी आहे त्यांनी समाजातील दलितांवरील असमानता अन्याय आणि शोषणाचे अतिशय प्रखर आणि धक्कादायक असे चित्रन केलेले आहे. त्यांच्या लेखनातील सशक्त भाषा आणि अस्सल वास्तववाद यामुळे ही कादंबरी वाचकांच्या मनावर खोलवर छाप सोडते.
दलित समाजाच्या दुःखद अनुभवांवर आणि त्यातून होणाऱ्या सूडाच्या भावनेवर ही कथा आधारित आहे. समाजातील भेदभाव , अत्याचार, अन्याय,संघर्ष यांचे वास्तववादी चित्रण या कादंबरीत केलेले आहे. बाबुराव बागुल यांनी दलित समाजाच्या दुःखाचे आणि त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्याचे मार्मिकपणे वर्णन केलेलं आहे.
एक क्रांतिकारी लेखक म्हणून बाबुराव बागुल यांची ओळख आहे. त्यांचे लेखन केवळ संवेदनशीलच नाही तर विद्रोह आणि सामाजिक परिवर्तनाची ठिणगी देणारे आहे. सूड या कादंबरीमध्ये दुःख आणि त्यावरील संघर्ष स्पष्ट करण्यात आलेला आहे.
कथा खूप सोपी असली तरी आकर्षक आहे. मनातील सूड, त्याचे दुःख आणि त्यासाठीची लढाई हे सर्व अतिशय हृदयस्पर्शी आहे. भाषा अतिशय प्रभावशाली आणि तीव्र असूनही सोपी असल्याने ती हृदयापर्यंत सरळ पोहोचते. ही कथा नुसती एका माणसाची कथा नसून संपूर्ण दलित समाजाच्या अस्तित्वाच्या संघर्षाचे दर्शन घडवणारी कादंबरी आहे. त्यामुळे दलित साहित्यप्रेमींनी , तसेच कोणत्याही सामाजिक स्थितीची आवड असणाऱ्यांनीही सूड कादंबरी नक्की वाचावी. सूड हे केवळ एक पुस्तक नाही तर प्रत्येक गोष्टीची सत्यता समजण्यासाठीचा आरसा आहे.