Share

पुस्तकाचे नाव:स्वातंत्र्य आले घरा  (the free  man  )           लेखक :कॉनराड रिक्टर                  अनुवाद: जी ए कुलकर्णी
परचुरे प्रकाशन मंदिर           प्र आ:१९६८    द्वि आ:२०१०              किंमत:१२५           पाने:११४

हि कहाणी आहे हेन्री डेलीकर उर्फ हेन्री फ्री man  याची.जर्मनी मधल्या राइन नदीकाठचा हा मुलगा गुलाम म्हणून अमेरिकेला आणला जातो तिथे त्याला मिळालेली वागणूक,त्याचे स्वंतत्र विचार,त्याला भेटलेली  घर मालकीण ,त्याचे मित्र,स्वतन्त्रतेसाठी त्याने सुरु केलेले प्रयत्न,गुलामाचे जीवन ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे हे पुस्तक होय;
हेन्री ला त्याच्या विचारामुळेच  फ्री हे आडनाव पडते.फिलाडेल्फिया ला आल्यानंतर त्याचे आयुष्य कसे बदलते ह्याचे साग्रसंगीत वर्णन ह्या पुस्तकात आहे.तत्कालीन गुलामांची  कशा प्रकारे ने आण व्हायची, कशी कामे त्यांना करावी लागायची याची छान माहिती मिळते(ह्यासाठी अच्युत गोडबोलेंच गुलाम मात्र जरुर  वाचावं )एकंदरीत GA चा पुस्तक म्हणून ठीक आहे पण मला तितकस नाही आवडल .म्हणजे एक कथा म्हणून ठीक पण आवर्जून वाचावे असे मात्र नाही.अनुवादित असल्यामुळे  G A न्च्या मुळ  लेखनाची मजा  ह्यात वाटत नाही .

Related Posts

आपल्याला आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास आणि आपल्या स्वप्नांना साकार करण्यास प्रेरणा देते

Dr. Rupali Phule
Shareआपण जिंकू शकतो हे एक उत्कृष्ट अवयं साहाय्य पुस्तक आहे. मी या पुस्तकाची शिफारस प्रत्येकाला करतो जो त्यांच्या जीवनात यशस्वी...
Read More

सराांनी ललहहलय त्यामुळे पढना तो बनता है! कारण त्याांच्या प्रत्येक पस्ुतकातल्या सखोल लेखनाने मला कायमच अचांबबत केलय

Dr. Rupali Phule
Share‘मनात’ हे पुस्तक अच्युत गोडबोले सराांनी ललहहलय त्यामुळे पढना तो बनता है! कारण त्याांच्या प्रत्येक पस्ुतकातल्या सखोल लेखनाने मला कायमच...
Read More