Share

Book Reviewed by दिव्या मदन गुप्ता (११ वी वाणिज्य)
MVP’s KSKW Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik.,
स्वामी या कादंबरीचे पहिले पान उघडताच मला मुखपृष्ठावर श्री गणेशाचे दर्शन झाले, आणि पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तुत्व आणि त्यांचे वैयक्तिक जीवन याची ओळख झाली. पानिपतच्या लढाईनंतर अवघे सोळा वर्षांचे असताना पेशवाईची जबाबदारी अंगी येऊन पडलेल्या माधवराव पेशव्यांनी स्वत:चा गृहकलह सोडवत मराठी स्वराज्यासाठी केलेल्या भराऱ्या मन उल्हासित करुन जातात.
बारा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पानिपतच्या पराभवानंतर कोलमडलेल्या राज्याची पुन्हा एकदा मराठा साम्राज्याचा दरारा निर्माण केला. वयाच्या सोळाव्या वर्षी अचानक मराठा साम्राज्याचा पेशवे पदाची जबाबदारी उचलणाऱ्या माधवराव पेशवे यांच्या मनातील भावभावना, तरूणपणातील पेशवे जबाबदारीने प्रौढ कसे बनले. ज्याला राज्याच्या शत्रूपेक्षा घरातील व्यक्तींबरोबच वैचारिक व राजकीय युद्ध लढावे लागले. या सर्वांचे वर्णन लेखक रणजित देसाई यांनी खूप सुंदर व सोप्या शब्दांत मांडले आहे.
माधवराव व त्यांच्या पत्नी यांच्या नात्यातील वर्णनही अप्रतिम आहे. प्रत्येक प्रसंग हे डोळ्यासमोर जिवंत उभा करण्याचे सामर्थ्य रणजित देसाई यांच्या लेखणीतून दिसते.
कादंबरीच्या पहिल्या ओळीपासून सुरू झालेला वाचन प्रवास शेवटच्या ओळीपर्यंत केव्हा येऊन संपते ते कळतच नाही. ही कादंबरी वाचून एक प्रश्न सारखा निर्माण होतो तो म्हणजे आपल्याच माणसांनी माधवरावांना त्रास दिला नसता तर आज मराठा साम्राज्य कसे असते?
हि कादंबरी वाचायला मला खूप आनंद झाला.

Related Posts

अर्थसाक्षर व्हा

Yogita Phapale
Shareभारतातील साक्षरता बऱ्याच प्रयत्नांनंतर आता कुठे जरा वाढलेली बघायला मिळते. शासन, वेगवेगळ्या संस्था आणि अगदी व्यक्तीगत पातळीवर केलेल्या अथक प्रयत्नांमुळे...
Read More