Share

‘पु.ल’ म्हणजे मराठी साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व होय. सुनिताईप्रमाणेच, त्यांच्या विनोदबुद्धीने त्यांची साथ शेवट पर्यंत सोडली नाही. दवाखान्यात वारंवार गोळ्या (Tablets) खावं लागण्याचं उल्लेख ‘गोळीबार’ अस करणारा हा माणूस महाराष्ट्रात जन्मला हे आमचं नशीबच म्हणावं लागेल. डोळ्यात अश्रू असण्याऱ्या माणसाच्या गालावर हास्य फुलवण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखनात आहे. १९६४ साली प्रकाशीत झालेलं हे पुस्तक एका सामान्य माणसाच्या बदलत्या जीवनाची कहानी आहे. पुस्तकातील विविध पात्रे पु.ल नी उत्तमरीत्या रेखाटली आहेत, त्यातला “नानु सरांजमे” हा माझा आवडता. चाळीत राहण्याऱ्या माणसाच्या आयुष्यातील अनुभव आणि बदल यांचं विश्लेषण विनोदात्मक आहे. पुस्तकाच्या शेवटी पु.ल म्हणतात, “वेळ आणि माणूस दोन्ही गोष्टी बदलत असतात. शेवटी, आयुष्यात हसत राहणं आणि मजेत जगणं सगळ्यात महत्त्वाच.”

Related Posts