इतिहासाची हिरकणी: अहिल्याबाई होळकर

Share

Abhinav Yogesh Alate, Student , FY BBA ( CA ), MES Senior College Pune.
कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर हे विजया जहागीरदार लिखित पुस्तक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनाचा सखोल आढावा घेते. अहिल्याबाई या केवळ कुशल प्रशासक होत्याच त्याचबरोबर  समाजकल्याण, न्यायनिष्ठा, आणि आध्यात्मिकतेचा आदर्श होत्या. अहिल्याबाईंचे साधेपणाने भरलेले बालपण, होळकर घराण्यातील प्रवेश, आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातील चढ-उतार यांचे वर्णन आहे.
पती खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर त्यांनी घेतलेली जबाबदारी आणि त्यातून घडलेली त्यांची वैचारिक जडणघडण. पुरुषप्रधान समाजात त्यांनी एक प्रभावी नेतृत्व स्थापित केले आणि लोककल्याणकारी धोरणे राबवून आपले नाव इतिहासात अमर केले. अहिल्याबाईंनी आपल्या प्रजेसाठी आईसारखे नेतृत्व दिले. लोकांसोबत असलेले त्यांचे संवाद, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेले निर्णय, आणि त्यांच्या न्यायप्रिय धोरणांचा उल्लेख आहे. पुस्तकात त्यांच्या नेतृत्वगुणांसोबतच त्या काळातील ऐतिहासिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक परिस्थितीचे उत्कृष्ट चित्रण आहे, जे वाचकाला त्या कालखंडाशी जोडते. त्यांच्या संघर्षमय प्रवासातून आत्मबळ, धैर्य, आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते. विजया जहागीरदार यांची प्रगल्भ लेखनशैली आणि सुलभ मांडणी पुस्तकाला अधिक वाचनीय बनवते. “कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर” हे पुस्तक इतिहास, नेतृत्व, आणि प्रेरणा यांचा संगम असून प्रत्येकाने वाचावे असे आहे. अहिल्याबाईंच्या संघर्षमय प्रवासातून आत्मबळ, धैर्य, आणि जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते.