नाळ तोडायच्या आधीपासून ते चीतेपर्यंत बाळहंबरापासून ते हंबरडयापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन संघर्षमय झाला अशा जगातल्या सगळ्याच जाती धर्माच्या असंख्य अनामिक स्त्रियांना अन माझ्या प्रिय आईला ही कादंबरी समर्पित केली आहे.
देवा झिंजाड यांनी लिहिलेली “ एक भाकर तीन चुली “ ही कादंबरी मानवता समाजाचा दबाव आणि वैयक्तिक संघर्ष यावर आधारित जीवनातील विविध पैलूंचा, आव्हानांचा आणि नातेसंबंधाचा गूढ संकेत आहे.
कादंबरीतील मुख्य पात्र भाकर तयार करणाऱ्याप्रमाणेच त्यांच्या जीवनातील तीन महत्वाच्या पैलूंमध्ये अडकलेले आहे. वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक या तीन चुलींचे व्यवस्थापन करताना त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. कादंबरीचे लेखन खूप साधे वा गहन आहे. झिंजाड यांची शब्दशैली भलेही साधी असली तरीही त्यातील संवाद प्रभावी आहेत. पत्रांची मानसिकता आणि भावनिकता उलघाल उत्तम प्रकारे दर्शवली आहे. या कादंबरीतील पात्र आणि त्यांचा दाखवला गेलेला चांगुलपणा आणि चुकांपासून एका व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे असेल हे लक्षात येते व वाचकाचा वाचनातील रस वाढतो.
कादंबरीचा मुख्य विषय म्हणजे जीवनातील पर्याय आपल्यावर असलेल्या सामाजिक अपेक्षा आणि आपले अस्तित्व यांच्यातील ताणताणाव व्यक्तिगत ईच्छा- शक्ती आणि समाजातील नियम यामधील युद्ध नेहमीच व्यक्त केले आहे.
“ एक भाकर तीन चुली “ एक भावनिक अंतर्मुख आणि विचार करायला भाग पडणारी एक कादंबरी आहे जी माझ्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. जीवनाच्या जटीलतेला उजाळा देणारी समाज आणि व्यक्ती यांच्यातील संघर्ष उलघडणारी ही कादंबरी प्रत्येक वाचकासाठी एक उत्तम वाचनाचा अनुभव आहे.