Share

केशवने त्याचा बेस्ट फ्रेंड सौरभसोबत एक इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सुरू केली आहे. हे दोन हौशी डिटेक्टिव्ह त्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारी आणखी एक केस यशस्वीपणे सोडवतील का? मग त्यांच्या मैत्रीचं काय होईल? ‘तुला प्रेरणा भेटली, तेव्हापासून माझा बेस्ट फ्रेंड हरवलाय,’ मी सौरभला सांगितलं. हाय, मी केशव, आणि माझा बेस्ट फ्रेंड, फ्लॅटमेट, सहकारी आणि बिझनेस पार्टनर सौरभ माझ्याशी बोलायला तयार नाहीये. कारण, मी त्याची आणि त्याच्या होणाऱ्या बायकोची थट्टा केली. सौरभ आणि प्रेरणा लवकरच लग्न करणार आहेत. हे अरेन्ज्ड मॅरेज आहे. मात्र, लव्ह-मॅरेज केलेल्या जोडप्यांपेक्षाही जास्त गोडगोड रोमान्स त्यांच्यात सुरू असतो. करवा चौथच्या दिवशी तिने त्याच्यासाठी उपवास केला. दिवसभर तिने काही खाल्लं नाही. संध्याकाळी, तिने त्याला कॉल केला आणि उपवास सोडण्यासाठी ती गच्चीवर चंद्राची आणि सौरभची वाट पाहात थांबली. एक्साइट झालेला सौरभ तिच्या तिमजली घराच्या जिन्यावरून धावतच वर गेला. पण जेव्हा तो पोचला, तेव्हा… वेलकम टुवन अरेन्ज्ड मर्डर, भारतातील सर्वाधिक खपाच्या लेखकाची एक विलक्षण वेधक थरारकथा. प्रेम, मैत्री, परिवार आणि गुन्हा यांची ही कथा तुमचं मनोरंजन करेल आणि तुम्हाला खिळवून ठेवेल.

Related Posts

गिग वर्क कल्चर

Nilesh Nagare
Shareमला सांगायला आवडेल सकाळच्या अवतरण पुरवणी मधली प्रफुल्ल वानखेडे यांची गोष्ट पैशापाण्याची ही लेक मालिका खूप गाजली. त्या लेखांचे पुस्तक...
Read More

गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास

Nilesh Nagare
Shareविद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय. विद्यानगरी. बारामती. सोनवणे स्नेहा अंबादास (अकरावी सायन्स) पुस्तकच नाव – गरुड झेप लेखक...
Read More