Share

(पुस्तक परीक्षण-आराध्ये नचिकेत हेमंत, Assistant professor-Ambrosia Institute of Hotel Management,Pune)

कर हर मैदान फतेह हे पोलीस महाअधिक्षक विश्वास नाांगिे पाटील याांनी लिहिलेले आत्मकथन आहे, जे संघर्ष,जिद्द, आणि यशाचे उत्कृष्ट उदाहरण ठरते. ग्रामीण भागातील मराठवाड्यातून आलेल्या एका युवकाचा पोलादी नोकिशाहीत प्रवेश कारण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकातून प्रभावीपणे मांडला आहे.
लेखकाचा हा प्रवास केवळ त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगत नाही, तर लाखो तरुणानं प्रेरित करणारा ठरतो. पुस्तकाची सुरुवात त्यांच्या साध्या आणि संघर्षमय जीवनातून होते, जिथे तुटपुंजी साधनसंपत्ती असूनही त्यांनी मोठी स्वप्ने पहिली. शैक्षणिक संघर्ष , परिश्रम, आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी कडव्या स्पर्धा परीक्षण तोंड दिले. यशाचा सर्वेच्च बिंदू म्हणजे आयपीएस सेवेत निवड. मात्र यश मिळाल्यानंतर त्यांनी आपली जबाबदारी कशी पार पडली याचेही तपशील पुस्तकात मांडले आहे.
पुस्तकात त्यांच्या स्पर्धा परीक्षेतील तयारीच्या काळातील अनुभवांवर विशेष भर आहे. अपार मेहनत वेळेचे व्यवस्थापन,आणि आत्मशिस्त कशी महत्त्वाचे आहे हे त्यांनी प्रभावीपणे उलगडले आहे. त्याचबरोबर त्यांचे पोलीस सेवेतील प्रशिक्षण, विविध प्रसंगी घेतलेले धाडसी निर्णय आणि समाजातील समस्यांवर संवेदनशीलतेने केलेले काम याचे यथार्थ वर्णन आहे.
कर हर मैदान फतेह हे पुस्तक फक्त यशाची कहाणी नाही तर मानसिक तयारी शारीरिक क्षमता आणि आत्मिक विकासाचे महत्त्वाचे शिकवण देते. ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही कथा असेच किरण ठरते लेखकाने मांडलेले आत्मपरीक्षण वाचकाला अंतर्मुख करते आणि कठीण परिस्थितीतही हार न मानता पुढे जाण्याची प्रेरणा देते.
पुस्तकाचे शीर्षकाचा अर्थात जिद्दीने प्रत्येक आव्हानांवर मात करण्यास आहे आणि हे पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे विश्वास नागरे पाटील यांनी आपल्या अनुभव अतिशय साध्या सरळ आणि प्रभावी भाषेत मांडले आहेत त्यामुळे वाचकाला त्यांचा संघर्ष आपला वाटतो पुस्तकाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे त्यातून मिळणारी जीवनशैलीतील शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तर हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे हे वाचन वाचकांना कष्ट करण्याची उर्मी आणि यशस्वी होण्याची जिद्द प्राप्त होते.
कर हर मैदान फतेह हे पुस्तक फक्त एका व्यक्तीचा प्रवास नाही तर प्रत्येक वाचकाला स्वतःचे जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उभारत येणारे प्रेरणादायी साहित्य आहे स्वप्नांच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचावे.

Related Posts

उपेक्षतांना संकटावर मात करण्यास भाग पाडणारा ग्रंथ

Bhagwan Gavit
Shareकु. आहेर वैष्णवी बाळासाहेब ( टी वाय बी एस सी )श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा जि. अहिल्यानगर परिचय: मृत्युंजय कादंबरीची...
Read More