Share

Yashoda Hari Pardhi

F. Y. B.ED (Student)
Samarth Shikshanshastra Mahavidyalay, Satpur, Nashik.

पुस्तकाचे मुखपृष्ठ:

तपकिरी रंगाचे मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकावर मध्यभागी शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे राजमुद्रा ही एका पवित्र आणि कार्याचे प्रतीक आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ सुनील धोपावकर नाशिक यांनी केले आहे. राजमुद्रा पानाच्या खालच्या बाजूला पुस्तकाचे नाव व लेखकाचे नाव श्रीकांत देशमुख आहे.

पुस्तकाचा आशय:

‘कुळवाडी भूषण शिवराय’ हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या रयतेसाठी केलेल्या कार्यावर केंद्रित आहे. ज्यामध्ये त्यांना कुळवाडी भूषण आणि रयतेचा राजा म्हणून गौरवले आहे. हे पुस्तक शिवाजी महाराजांचे न्याय,नीती आणि प्रशासकीय कौशल्ये तसेच सर्व जाती धर्माबद्दलचा आदर आणि धार्मिक सलोखा जपणारे व्यक्तिमत्व यावर प्रकाश टाकते. हे पुस्तक शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांचा राजा म्हणून सादर करते आणि त्यांच्या आदर्श प्रशासनावर जोर देते.

रयतेचे कल्याण:

हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या राज्याला शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य लोकांसाठी असलेले राज्य म्हणून सादर करते, जिथे त्यांनी न्याय आणि नीतीचे पालन करून राज्य केले. कुळवाडी भूषण शिवराय या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे श्रीकांत देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणण्यामागील विचार मांडला आहे. जे रयतेचे राजे आहेत. हे पुस्तक महाराजांच्या मानवतावादी बहुजन प्रतिपालक आणि न्यायनिष्ठ राज्याभिमानाचे चित्रण करते. यात महाराजांच्या कार्याचे तेजस्वी आणि प्रेरणादायी पैलू समोर आणले आहेत. जे अनेक ऐतिहासिक संदर्भांवर आधारित आहेत.

कुळवाडीभूषण अर्थ:

हे पुस्तक स्पष्ट करते की कुळवाडी भूषण या उपाधीतून महाराजांनी खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचे राज्य कसे स्थापन केले. 96 कुळी मराठा सरदारांच्या तुलनेत सर्वसामान्य शेतकरी आणि रयतेचे राजे म्हणून शिवाजी महाराज कसे श्रेष्ठ आहेत हे दर्शविले आहे.

बहुजन प्रतिपालक:

छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन समाजाचे कल्याण कसे केले हा मुद्दा या पुस्तकातून अधोरेखित होतो. ते गरिबांचे , दुःखितांचे आणि पिडितांचे राजे होते, असे या पुस्तकात म्हटले आहे.

मानवतावादी आणि समतावादी विचार:

पुस्तक महाराजांच्या मानवतावादी दृष्टिकोनावर भर देते इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजाच्या भल्याचा विचार करताना समाजासमोर आदर्श ठेवायला पाहिजे. कुळवाडी भूषण शिवराय हा असा एक आदर्श आहे जो आपल्याला भविष्याची दिशा दाखविण्यास समर्थ आहे.

शेती आणि शेतकरी या विषयाकडे खूप गंभीरपणे आपल्या वैचारिक सांस्कृतिक पूर्वजांनी पाहिले आहे या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य जनतेसाठी विशेषता शेतकऱ्यांसाठी कसे कार्य केले हे पुस्तक शेती, शेतकरी आणि त्यांच्या समस्या प्रती असलेले प्रेम आणि धोरणे विशद करते, जसे की वतनदारी व मिरासदारी रद्द करणे आणि शोषण व्यवस्थेला आळा घालणे.

शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी मिरासदारी संपवली. त्यांच्या याच गुणांमुळे ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख शेतकऱ्यांचा राजा कुळवाडीभूषण असा केला.

रयतेचा राजा: शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते त्यांनी समाजातील गरीब व दुर्बल घटकांची कल्याण केले.

न्याय आणि समता: त्यांनी समाजातील सर्व जाती-धर्माचा आदर केला.

स्त्रियांचा आदर: त्यांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार दिले आणि त्यांच्या आदराची आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली.

प्रशासकीय आदर्श: शिवाजी महाराजांचे प्रशासन आजच्या लोकशाहीसाठीही आदर्श घेण्यासारखे आहे, कारण ते न्यायप्रिय आणि कल्याणकारी होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय’ या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याने आणि कार्यक्रम आयोजित केली जातात.

Related Posts

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

Priyanka Kardak
Shareहमीद दलवाई यांच्या “राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान” या पुस्तकामध्ये भारतीय मुसलमान समाजाच्या प्रश्नांवर आणि राष्ट्रीय एकात्मतेवर चर्चा केली आहे...
Read More