ABDAGIRE SWAMINI JAGDISH B.Sc(CS),
COLLEGE OF COMPUTER SCIENCES, Wakad Pune.
गरुडझेप : एक ध्येयवेडा प्रवास
लेखक : भरत आंधळे
गरुडझेप हे पुस्तक भरत आंधळे त्यांच आत्मचरित्र सांगून जाते. त्यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक आहे. त्यांच्या आपार कष्टांची कहाणी त्या पुस्तकात लिहिलेली आहे. त्यांचा बालपणाच्या प्रवासापासून ते आय. आर एस चा प्रवास त्या पुस्तकातून आधोरेखित होतो. त्यांचे बालपण खूप खडतर होते. परंतु त्यांच्या कष्टांनी त्यांच्या जीवनाची वाट कशी बदलली हे त्यांची जीवनशैली सांगते.
त्यांच्या शिक्षणाचा खर्च पण त्यांच्या आईच्या कष्टाने उभा राहिला. त्यांच्या आईने त्यांना शिक्षणासाठी खूप पाठिंबा दिला, त्यांची घरची परिस्थिती खूप बेताची होती. त्यांना दोन वेळेचे जे जेवण व पुस्तके देखील खूप मुश्किलीने मिळाली. जेव्हा ते आय. आर एस चा अभ्यास करत होते तेव्हा दहावी अगदीच कमी टक्क्यांनी उत्तीर्ण होऊन देखील त्यांनी निश्चय करून घाम गाळला. त्यांनी २००० साली सुरु केलेला प्रवास २०१० येऊन थांबला खूप अपयशांना सामोरे जाऊन त्यांनी हे यश प्राप्त केले. त्यांनी यश न येऊन सुद्धा यशाची पाठ काही सोडली नाही. त्यांची यशासाठीची जिद्द चिकाटी व सर्वात महत्त्वाचा संय्यम आपल्याला ते प्रयत्न, पुस्तकातून दाखवून देतात हाच त्यांचा एक ध्येयवेडा प्रवास आपल्याला त्या पुस्तकातून कळून येतो. मला हे पुस्तक खरंच खूप प्रोत्साहन दिऊन गेले. माझ्या स्वप्नांबद्दल मला खूप चिकाटी व धैर्य भेटले मला माझ्या जगण्याचा उद्देश भेटला. हे पुस्तक मी का ? कश्यासाठी? वाचले त्यापेक्षा ते वाचून मला जो मार्ग आणि समाधान भेटले ते अविस्मरणीय होते.
परिस्थितीतून कसा मार्ग काढावा हे त्या पुस्तकातून कळून येते त्यावर मात करून पुढे जायचं ते मला गरुडझेप पुस्तक वाचून कळाले. आपला आपल्या ध्येयावर पूर्ण विश्वास असेल तर यश मिळण्यापासून आपल्याला कुणी दूर नाही ठेवू शकत. आत्मविश्वास आणि स्वप्नांबद्दलची जिद्द शिखरावर नेहून ठेवते. गरुडझेप हे पुस्तक भरत आंधळे यांचे कुटुंब निरक्षर असून सुद्धा त्यांच्या उत्कृष्ट साक्षरतेचा पुरावा आहे. एका शेतकाऱ्याला किती खडतर भयंकर वेदनेतून जावं लागतं आणि कर्जाचा व घराचा भार सांभाळून शिक्षण पूर्ण करणे ही सोपी गोष्ट नसते. काहीही सुख- सोयी उपलब्ध नसताना देखील शिक्षण पूर्ण करणे खूप अवघड आहे. एका खेडेगावातील हि एका मुलासाठी खूप अवघड गोष्ट होती परंतु अशक्य ही शक्य करून दाखवले ने भरत आंधळे यांनी त्यांचे आपल्याला शब्द खूप काही सांगून जातात कारण जर स्पर्धेत उतरायचे असेल तर एक तर मनाची तयारी खूप भक्कम लागते. कारण स्पर्धा तकतर यश नाहीतर अनुभव देऊन जाते. त्यांची विनोदीशैली हसवून जाते त्यांचे आपार कष्ट जाते परंतु शेवटी डोळे पाणवतात.
कितीही यश मिळाले तरी मागे वळून पहा.” हे सिंदूताईंची वाक्य भरत आंधळेच्या सामान्यतेची आणि सुज्जननेची साक्ष देऊन जातात. एवढे मोठे यश मिळून देखील त्यांचे पाय जमिनीवरच आहेत हे त्यांच्या साधेपणावरून आपल्याला कळते. दहावीनंतर काम करून स्वत: च्या पैश्यावर जगून शिक्षण करणे व बाबा गेल्यानंतर घराची जबाबदारी अगदी सरस – रित्या पार पाडणे खूप विलक्षण गोष्ट आहे. त्यानंतर काम करून पदवीदर होणे अस्वयंभूत गोष्ट होय. आपण कुठल्याही पदावर नसताना व काहीही नसताना लग्नासारखी मोठी जबाबदारी स्विकारून जिद्दीने ती निभावणे खूप अवघड गोष्ट आहे. जबाबदाऱ्या घेऊन झटकने सोपे असते पण निभावणे ते फक्त भरत आंधळे त्यांनाच ठाऊक.
अनेक कामाच्या संधी मिळून् सुद्धा निवडलेल्या ध्येयावर ठाम राहणे व बोललेल्या गोष्टी करून दाखवणे आणि दिलेल्या शब्दांना जागणे हे भरत आंधळे सारखा चांगला माणूसच करू शकतो. चांगली संगत माणसाला कुठे पोहचवू शकते त्याची परिचीती या पुस्तकातून कळते वेडे लोकंच इतिहास घडवतात आणि भरत आंधळे त्यांचे हे वेड त्यांना आयुष्यभरासाठी शहाणपण देऊन गेले त्याचे मला फार कुतूहल वाटते. हे पुस्तक स्पध स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी खूप मोलाचे ठरेल हे काही वावगे नाही. हया पुस्तकानी मला उडण्यासाठी पंख दिले ते पंख मला निश्चितच माझ्या प्रयत्नाना यश देतील ते काही चूक नाही. भरत आंधळे ह्यांनी स्वत : सोबतची स्पर्धा करून ह्या स्पर्धापरिक्षेवर विजय मिळवला. मला असे वाटते की प्रत्येक ध्येयासाठी धडपडणाऱ्या माणसांनी हे पुस्तक वाचले पाहिजे. मी भरत आंधळे ह्यांना खऱ्या आयुष्यात भेटण्याची इच्छा व्यक्त करते. जीवनातून नवीन उभारी घेनाऱ्या माणसाची तहान भागवणारे पाणी म्हणजे हे पुस्तक आणि गरुडासारख्या तीव्र क्षमतेने उडू पाहणाऱ्या व झेप घेणाऱ्या पंखाना बळ देणारे पुस्तक म्हणजेच “गरुडझेप”..