सध्या सगळे जग हे आभासी जगात जगत आहे. प्रत्येक जण एकमेकांशी तुलना करत आहे. त्याच वेळी हे करीत असताना मनुष्याला आर्थिक घडी बसवता येत नाहीय. सध्याची पिढी आपल्या आधीच्या पिढीपेक्षा जास्त कमावत आहे त्याचे आर्थिक नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना प्रचंड तणावाखाली जगावे लागत आहे. त्यातून आत्महत्या असे प्रकार घडत आहेत. या पुस्तकातून सर्वांना आर्थिक साक्षर करण्याचे अवघड असे काम अगदी सोप्या शब्दात लेखकाने केले आहे. मराठी माणूस उद्योग विश्वात आपले स्थान कसे निर्माण केले पाहिजे याचे बारकावे देखील लेखकाने अतिशय सोप्या भाषेत मांडले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण नेहमी म्हणतो की एक स्त्री शिकली पूर्ण कुटुंब शिकते म्हणूनच आर्थिक साक्षरता आणायची असेल तर आधी एक स्त्री आर्थिक साक्षर झाली पाहिजे. लेखकाने या पुस्तकात गरीब आणि श्रीमंत याची अतिशय सोप्या शब्दात व्याख्या सांगितली आहे, गरीब म्हणजे पैसे नसणे नसून पैसे कमावून सगळे खर्च करणारा आहे. प्रत्येकाने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे असेल तर त्याला पुस्तकासारखा दुसरा मार्गदर्शक नाही. पैसे कमावत असताना एकमेकांची मने दुखवत तर नाही ना याची काळजी घेतली पाहिजे कारण ज्ञानात आणि माणसात केलेली गुंतवणूक ही आयुष्यात सगळ्यात जास्त परतावा देते. अशा सगळ्यांची जाणीव लेखकाने छोट्या छोट्या गोष्टीतून समजावून सांगितले आहे. आर्थिक साक्षरतेसाठी लेखकाने सोपे असे मार्ग सांगितले आहेत, ते म्हणजे मोठेपणा टाळून आहे तसे वागावे, प्रत्येकाने आपला रोजचा जमा – खर्च मांडावा, इतरांशी तुलना बंद करणे, गरज असेलच तरच नवीन वस्तू घ्यावी, कोणतेही वस्तू घेत असताना लाज न बाळगता वाटाघाट करून घावी, अनावश्यक खर्च टाळावा ई. मराठी माणसाने व्यवहारात उतरण्याची तयारी दर्शविली पाहिजे यासाठीचे उत्तम मार्गदर्शन लेखकाने या पुस्तकात केले आहे. भरपुर ज्ञान आणि पैसे कमवावे पण त्याचा योग्य वापर करता आला नाही तर त्याचा शून्य उपयोग आहे. माणसाने पैसे कसे कमवावे आणि ते मिळालेला पैसे कुठे खर्च करावे याची करून देणारे हे पुस्तक आहे. थोडक्यात सांगायचे झाले हे पुस्तक प्रत्येकाला खऱ्या जगात कसे जगायचे याचे जाणीव करून देते. प्रत्येकाने आपल्या संग्रहात हे पुस्तक अवश्य ठेवावे.
Next Post
A Thousand Splendid Suns Related Posts
ShareAn interesting book is one that you can’t let off your hand once you start reading. All of Sri M’s...
Share“2 States – The Story of My Marriage” is a semi-autobiographical novel by Chetan Bhagat, one of India’s most popular...
ShareIn this book, world’s great Scientists, Authors, Philosophers has revealed the secret. The secret of joy, health, money, relationships, love,...
