पुस्तक परीक्षण कु. घुटे गायत्री कृष्णा,तृतीय वर्ष कला राज्यशास्र विभाग , अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर
वयाच्या १६ व्या वर्षी महान अश्या ग्रंथाची निर्मिती संत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम अशा ग्रंथाची निर्मिती केली. महाराजांचा जन्म आळंदी (आपेगाव) येथे, शेके बाराव्या शतकामध्ये झाला. “ शके बारोशे बारो तेरा तै टिका केली ज्ञानेश्वरा । सचिदानंद बाबा आदरे लेखक झाला “ । माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम अशा ग्रंथाची निर्मिती केली. तसे पाहिले तर ज्ञानेश्वर महाराजांनी चार ग्रंथाची निर्मिती केली. 1) हरिपाठ २) ज्ञानेश्वरी ३) आमृतानुभव 4) चांगदेवपासष्टी. यापैकी असलेला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे हे या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे या गावात आहे. त्याला पैस असे म्हणले जाते.
मनुष्य जिवण जगत असताना जगाव कस हे ज्ञानेश्वरी शिकवते आणि मराव कस हे भागवत ग्रंथ शिकवते. विज्ञान आणि आध्यात्माची सांगड घालनारा एकमेव ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. संत नामदेव महाराज म्हणतात. “नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ट – ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावा’” ज्ञानेश्वरीतील एका ओवीचा जरी अनुभव घेतला तरी जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय रहाणार नाही.
मनुष्याणे जिवणात कसे जगावे, कसे वागावे, कसे बोलावे हे ज्ञानेश्वरी शिकवते त्याविषयी खालील ओवी
“ साच आणि मवाल । मितुले आणि ससाळ ।
शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे ।।
मनुष्याने बोलताना आपले शब्द अमृताप्रमाणे असावे अस जिवन जगाव हे ज्ञानेश्वरी शिकवते. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष भगवान महाविष्णुचे अवतार
“ महा विष्णुचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ।
भगवान परमात्मा श्री कृष्णाने कुरुक्षत्रावर भक्त अर्जुनासाठी गिता सांगितली अर्जुनाचेनी व्याजे / गिता सांगोनि श्रीराजे । संसारा एवढे थोर ओझे । फेडिले जगाचे ।
अर्जुनाचे निमित्त करून जगातील सर्व जिवाचे संसाराचे ओझ दुर व्हावा म्हणून भगवान श्रीकृष्णाने गिता सांगितली परंतु गिताग्रंथ हा संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे कलीयुगातील सर्वसामान्य जीवाला तिचा अर्थसमजवणार नाही. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत मधील गिता प्राकृत (मराठी) मध्ये आणली. छपन्न भाषेचा केलासे गौरव भवार्णवी नाव उभारिली छपन्न भाषा वापरून ‘ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाची निर्मिती केली.
ज्ञानेश्वर महाराजांन सारख ज्ञान नाही. जनाबाई त्यांच्या ज्ञानाच वर्णन करताना म्हणतात. ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर । समुद्राचे पाणी जसे मोजता येत नाही तसे माऊलीचे ज्ञान मोजता येत नाही. सर्वसामन्य जिवाचे जसे वय वाढत जाते तसीत्यात्या ज्ञानाची प्राप्ती होत जाते.परंतु माऊली ज्ञानेश्वर महाराज जन्मताच ज्ञाने होते. उपजाच ज्ञानी । हे वर्म जाणोनी । आले लोटांगनी चांगदेव ।
चौदाशे वर्षे तप:चर्या करणाऱ्या चांगदेवाने ज्यांना लोटांगण घालावे असे ज्ञानेश्वर महाराज नव्हे नव्हे, तुकाराम महाराज म्हणतात “ कैसा वासुदेव बोलतो बोल । बाळापोटी माय रिघेला मेले माणुस जित उठवीला वेळ काळाते ग्रासील गा” मेलेला माणूस जिवंत करण्याच सामार्थ्य ज्यांच्यात आहे ते ज्ञानेश्वर महाराज आणि म्हणून त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. म्हणून म्हटलय “ डोळा पाहावी पंढरी । वाचावी ज्ञानेश्वरी “ का ?तर ज्ञान होय मुढा अति मुर्ख त्या दगडा अतिशय मूढ असलेल्या व्यक्तीला सुद्धा ज्ञानेश्वरी वाचल्यान ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय रहाणार नाही. म्हणून म्हटलय. ते ज्ञान पैगा बरवे । जरी मनि अथी अनावे । तरी संता या भजावे सर्वस्पेशी.
आता पर्यत विज्ञाने अनेक शोध लावले परंतू ज्ञानेश्वर महाराजांनी साडे सातशे वर्षापुर्वी ज्ञानेश्वरीत अनेक शोध सांगितले आहेत. पैकी
१) सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपरनिकसने लावला. परंतू माऊली ज्ञानेश्वारानी ज्ञानेश्वरीमध्ये ७२५ वर्षापूर्वीच सुर्याचे भ्रमण हा भास आहे आसे सांगितले त्या संदर्भातील ओवी.
जैसे न चालता सुखाचे चालणे।
तैसे नैष्कर्म्यत्व जाने । कर्मची असता ।।
२) विजेचा शोध :
तया उदकाचेनी आवेशे ।
प्रगटली तेज लखलखीत दिसे ।
तया विजु माजी आसे । सलील काही.
३) घडयाळाचा शोध :
उपजे ते नाशे । नशिले ते पुनरुपी दिशे ।
हे घटिका यंत्रजैसे । परीभमे गा ।।
असे अनेक शोध या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहेत. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्रेष्ट आहे. हा ग्रंथ वाचला आणि जर तो आचरणात आणला तर जिवनाचे कल्याण झाल्याशिवाय रहाणार नाही. प्रत्येकाने एकदा तरी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचवा.