बुधभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे. या ग्रंथाचे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत. ग्रंथाचा अभ्यास करून काही जणांनी एम.फिल./ पीएच.डी. मिळवली आहे. या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे श्री बुधभूषण ! छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले रचित हा संस्कृत ग्रंथ. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अनेक इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अमोल इतिहास पुढे आणला. छत्रपती संभाजी महाराज अत्यंत प्रतिभाशाली साहित्यिक होते. त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी श्री बुधभूषण नावाचा मोठा संस्कृत ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. वयाच्या सतराव्या वर्षी हा ग्रंथ पूर्ण केला. याशिवाय भोजपूरी हिंदी भाषेतही ‘सात सतक’ ‘नखशिखा’ व ‘नायिकाभेद’ हे ग्रंथ लिहिलेत. संभाजी ब्रिगेडच्या युवकांना संभाजी महाराजांबद्दल असलेले आत्यंतिक आकर्षण शूरत्व, वीरत्व, स्वाभिमान, स्वराज्याभिमान, कुलाभिमान, शिवाभिमान अशा विविध पौरुषत्वाच्या बाबींशी जुळलेले आहे. संभाजी महाराज म्हणजे त्यांच्यासाठी एखादे प्रत्यक्ष जिवंत असे प्रेरणास्थान आहे. या सर्व त्यांच्या भावनिक श्रद्धांमध्ये भर पडली ती सर्वश्रेष्ठ जागतिक पातळीवरील तरुण राजपुत्र बहुभाषिक साहित्यिक युवराज संभाजी राजे या आगळ्या-वेगळ्या क्षेत्राची. त्यामुळे छत्रपती संभाजी राजांचे श्री बुधभूषण व विविध ग्रंथलिखाण प्रत्यक्ष आपणास पहायला हाताळायला व वाचायला मिळावे अशी अनेकांना हुरहूर लागलेली होती. दुर्देवाने शंभूराजांचे हे मूळ साहित्य एकत्रित कुठेच उपलब्ध नाही. छत्रपती संभाजीराजांचे ज्येष्ठ चरित्रकार वा. सी. बेंद्रे यांनी श्री बुधभूषण ह्या संस्कृत ग्रंथाचा काही भाग इटली व फ्रान्समध्ये असल्याबाबतचे मत सुमारे १९२० च्या दरम्यान व्यक्त केले होते. श्रीबुधभूषणमधील काही त्रोटक श्लोक अनेक ठिकाणी गेल्या सत्तर-ऐंशी वर्षात प्रकाशित झाले आहेत. असे असले तरी छत्रपती संभाजी महाराज एक महान भाषापंडित होते. याशिवाय त्यांना भारतातील प्रत्येक प्रांताची भाषाही ज्ञात होती. तसेच परकीय भाषांपैकी इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, हिब्रु, फारशी, उर्दू या भाषाही शंभूराजांना लिहिता-बोलता- वाचता येत होत्या, याबाबत सर्वच प्रामाणिक देशी व परदेशी इतिहास अभ्यासकांचे एकमत झाले आहे. आज आपल्या हाती ‘श्रीबुधभूषण’ हा तीन अध्यायाचा मिळून एकत्रित ग्रंथ देत आहोत. गेले सात-आठ वर्षे मराठा सेवा संघ ह्या प्रयत्नात होत परंतु ह्या महानग्रंथाचे योग्य असे भावार्थमिश्रित अनुवादस्वरुप भाषांतर करण्यासाठी त्या ताकदीची व्यक्ती सापडत नव्हती.
Related Posts
Shareययाती कादंबरी हा माझा अनुभव आहे ययाती कादंबरी बद्दल. माझ्या आयुष्यात वाचलेली मी पहिली पौराणिक कादंबरी. खांडेकरांना ज्या कादंबरी साठी...
ShareThe 19th century was a time of great progress and new opportunities around the world. While John D. Rockefeller was...
