आपल्याला जर एखाद्या गोष्टी दिवस मिळवायची असेल तर, त्यासाठी आपल्याला आधी संघर्ष हा करावाच लागतो. कोणती गोष्ट स्वतः आपल्याजवळ येत नसते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे एका खेडेगावातील खूप गरीब व कष्टाळू असलेल्या राजेश नावाचा मुलगा हा आहे. एका छोट्याशा घरातील जन्माला आलेला हा मुलगा होता. त्याचबरोबर त्याची आई ,वडील व त्याच्या तीन बहिणी असा छोटासा त्यांचा परिवार होता. लहानपणापासूनच घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आपल्याला जीवन जगायचे असेल तर शिकलेच जावे लागेल .त्याचबरोबर शेतातील कष्ट करण्याची क्षमता देखील त्यांच्यामध्ये असल्याने, त्यांनी कोणतेही काम करण्यात कधीच माघार घेतली नाही. लहानपणापासूनच त्यांचे वडील व त्यांची आई जिला ते प्रेमाने आई असे बोलत होते हे पण आधीपासूनच शेतात काबाडकष्ट करत असत ,असे ते सांगतात. त्यांची ताई देखील खूप कष्ट करत असे, का तर तेव्हा आर्थिक परिस्थिती नीट नव्हती .त्याच बरोबर त्यातून आपली रोजी रोटी भागली पाहिजे व उरलेच तर माझे शिक्षण देखील असा त्यांचा हेतू असायचा. लहानपणापासून अक्का ताई मोलमजुरी करत असत. पण कधी कधी माझे मन हे कष्ट करायला नाही म्हणायचे ,मग मी माझ्या सवंगड्यांसोबत खेळायला जायचो. पोरांसोबत नदीवर मासे पकडायला जायचे, असे अनेक खेळ खेळत मी मोठा होत गेलो .मला ताई -अक्का कायम सांगत अशा पोरांसोबत खेळत जाऊ नको, पण मी कधी ऐकली नाही व माझा हट्टपणा सोडला नाही .पण त्याच बरोबर मला नंतर समजू लागले व माझे लक्ष अभ्यासाकडे दिले व चांगल्या मार्काने दहावीत उत्तीर्ण झालो व त्यानंतर एचएससी बोर्डात पण पास झालो .त्यातून त्याला एक निश्चित दिशा गवसत गेली व आपल्याला काहीतरी करून दाखवायचे अशी जिद्द त्यांनी ठरवली. त्यांनी त्यानंतर घरची परिस्थिती कडे बघून बीएससी मध्ये प्रवेश घेतल्या व त्याच अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षांचा देखील अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यातून यश मिळवलीस म्हणजे I.A.S. ही पदवी प्राप्त केली .जीवनात अपयशाचे मार्ग येतात,पण त्यात माघार न घेता यशाचा पाठलाग करून यश मिळवलेच याचे उत्तम उदाहरण आहे. जीवनाकडे आणि समाजाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे हे राजेश पाटील यांची व्यक्तिमत्व होते .त्यांनी त्यांच्या जीवनात यश मिळवण्याची कारणेच ते होते की – , न खचता, न डगमगता, अपयशाला न घाबरतात ते पुढे पुढे जात राहिले. त्यांच्या कष्टाची लाज न बाळगता त्यांनी अभ्यासा बरोबर कष्ट करून आपली अनुकूल असे मोल त्यांनी मिळवले .त्या परिस्थितीच्या झळा आपल्याला खूप काही अनमोल धडा शिकून जातात. त्यांना या गोष्टीतून खूप काही चटके बसले असतील ,पण त्या चटक्यांनी ते शेकून निघले, म्हणजे एका परिस्थितीत सोबत संघर्ष करत ,यश प्रतकारत ते पुढे चालले होते. मोठमोठ्या थोर महात्मा मुळे त्यांच्यावर सामाजिक दृष्ट्या दृढ संस्कार मिळालेले होते ,म्हणजेच त्यांना वाचण्याची खूप आवड होती. म्हणून त्यांना जिथे कुठे कोणतेही पुस्तक वाचायला मिळाले तर ते आवर्जून वाचत असत .आजच्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी माहित नसतात, मग त्या माहीत करून घ्यायला त्यांना मोठ्या महात्म्यांची /थोर पुरुषांची व त्याचबरोबर आजच्या समाजात काय करावे, वाचन कसे करावे, हे राजेश पाटील यांनी योग्य भाषेत समजावून सांगितले आहे. हे सर्व सांगताना त्यांनी कधी स्वतःच्या व कौटुंबिक जीवनाचा विचार नाही केला तर ,त्या समस्या कशा सोडण्यात येतील यावर मार्ग शोधायचा प्रयत्न करत असे. अपयशी ही यशाची पहिली पायरी असते. त्यात माघार न घेता पुढे जात राहायची संकल्पना त्यांनी मांडली. या सर्व त्यांच्या अनुभवामुळे त्यांचा देवावरील विश्वास नाहीसा झालेला होता. त्यांनी एवढेच सांगितले की , जीवनात यशाकडे जायचे असेल तर स्वतः कष्ट करून मिळवायचे ,देवावर सोडून तुम्ही काही न करता तो आपोआप थोडी मिळणार आहे. त्यातून आपल्याला मार्ग देखील हा नंतर नक्कीच. एका खेडेगावातील मुलगा, त्याच्या घरच्या परिस्थितीला तोंड देत ,आपल्या यशाच्या मार्गाकडे झुंजारत, संख्याशास्त्र या विषयांमध्ये विद्यापीठात , पदवूत्तर शिक्षण घेतो व तेथील विद्यापीठातील ग्रंथालयात अभ्यास करत असतो .त्यातूनच तो आयएएस होतो ,ही आश्चरचिकित करणारी गोष्ट आहे. असे राजेश पाटील यांसारखे असे खूप विद्यार्थी आहे, जे की पुढे जाऊन खूप काही करू शकतात ,पण ते प्रयत्न करत नाही, माघार घेतात व यशाकडे जाण्यापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी म्हणते म्हणतात ,असे विद्यार्थी आयुष्यात नेहमी प्रयत्नशील राहावेत, असे ते म्हणतात. शिक्षणाबरोबरच आपण एखादा व्यवसाय देखील करावा .त्यामुळे सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीवर आधारित शैक्षणिक सोयी सुविधांचे व्यवहार होणार नाहीत.
Previous Post
महामानव डॉ.भीमराव रामजी आंबेडकर Next Post
अन्या से अनन्या Related Posts
SharePrajakta Shejwal: We love reading thrillers. We’ve mentioned it so many times that our regular readers already know it :)....
Share“Wings of Fire” by APJ Abdul Kalam Wings of Fire is more than an autobiography; it is an inspiring tale...
ShareBook Review : Gangurde Aarti Rajendran ,MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati, Nashik. This book written...
