Share

देवालाही मागून न मिळणारे दान म्हणजे आई. बालपणातील विश्व म्हणजे आई, यातीलच निस्वार्थ व निर्मळ भावनेने प्रेम करणारी व तितक्याच कठोरपणे शिस्त लावणाऱ्या आईची हृदयस्पर्शी कथा म्हणजे साने गुरुजींनी साकारलेली श्यामची आई हे पुस्तक.
थोर क्रांतिकारक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी लिखित श्यामची आई हि कादंबरी त्यांनी नाशिक येथील कारागृहात असताना अवघ्या पाच दिवस लिहून काढली त्यातील प्रत्येक सत्र वाचताना साने गुरुजींच्या अफाट शब्द सामर्थ्याचे वाचकांना व श्रोत्यांना खिळवून ठेवण्याच्या अगण्य लेखन शैलीचे दर्शन घडते.
हे पुस्तक वाचताना कोकणातील सुसंस्कृत व साध्या कुटुंबाचे व तेथील रम्य संस्कृतीचे वर्णन डोळ्या समोर उभे राहते.
श्यामची आई हे साने गुरुजींची पुस्तक सुंदर आणि सरल असून त्यात साने गुरुजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणारे प्रेम भक्ती, आदर व कृतज्ञता अशा अपार भावना साने गुरुजींनी या पुस्तकात मांडलेल्या आहेत.
साने गुरुजींनी चांगल्या पुस्तकाची व्याख्या पुस्तक म्हणजे त्यातून स्वतःला आठवावे आणि वाटावेही अशी वाख्या केली आहे. ती व्याख्या त्यांच्या लेखनातून आपल्याला समजते. श्यामची आई हे पुस्तक लिहून त्यांच्या आईला मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र वाहिलेले आहे.
आई बद्दल जगात वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य निर्माण झाले आहे. पण अजूनही ज्या पुस्तकामध्ये घरोघरी वाचन व्हावे असे वाटते. हे पुस्तक वाचताना साने गुरुजींच्या प्रेमाने चिंब होवून आजही सर्वच्या हृदयात मायेचा ओलावा निर्माण होतो.
Sahare Haridas Raghunath (M.V.P. Samaj Adv. Vitthalrao Ganpatrao Hande College of Education, Nashik.)

Related Posts

आदिवासी आयकॉन्स

Sanjay Aher
Shareडॉ.सुनिल घनकुटे (मराठी विभाग ), सहाय्यक प्राध्यापक अगस्ति कला ,वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय ,अकोले आजच्या पुस्तकाचे परिक्षण द्यावयाचे...
Read More