Share

Name:- Kajal Bhika Bodkhe,
Dept. of Sociology, SPPU Pune,
ही कांदबरी मनोज बोरगावकर यांनी लिहलेली असून ही केवळ कादंबरी नसून तर त्यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिध्दघटनांचा कसदार ललित गद्य हुंकार आहे .त्यांना गोदामायच्या पात्रात भेटलेली लोक त्यांच्या जीवनातील घटना व लेखकांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या घटनांचे आकलन यात केलेले आहे .लेखकांनी केवळ निसर्गाचा केवळ आनंदच लुटला नाही तर तो प्रत्यक्ष अनुभवलाय,जागलाय व वाचलाय. लेखकांना पोहायला शिकविणारे दादाराव तर गोदामायच्या पात्रात भेटलेली साकीनाबी ,कालुभाई,बामनवाड ,तृतीयपंथी सगुणा ,साप पकडणारा प्रसाद तर एका मांजरीमुळे आपल्या संसारच वाटोळ होऊन भिखारी झालेला भिकाजी या
सर्वांच्या जीवनातील प्रत्यक्षघटना या पुस्तकात दिल्या आहेत . तसेच लेखकांना गोदामायच्या पात्रात निसर्गाने अश्या घटना दाखविल्या की माणूस त्याचा कल्पनाही करू शकत नाही .एकवेळी माकडांनी हरणांसाठी झाडावरच्या फांद्या हलवून हरणांसाठी चिंचा पाडल्या तर एकेवेळी हरणांचा कळप नादिपात्राव्रून पाणी पेऊन चिंचेच्या झाडाखाली गेला,तेवढ्यात पापण्यांचे पाते लावते न लावते तोपर्यंत दोन तीन हुप्पी माकड झाडावरून सरसर खाली उतरली व कोणाला काही कळायच्या आत त्यांनी त्या पाडसाला तंगडी धरून उचलले,व झाडावर नेले. त्या दिवशी खाली चिंचा पाडून आपली भूक भागविणारी अन आज पाडसाला अलगद उचलून नेऊन त्याला खाऊन टाकणारी माकड हीच का? त्यावेळी लेखकाच्या मनात आले मोबदला..चिंचांच्या बदल्यात जीवाचा . त्या दिवसापासून त्या चिंचेला कधीच चिंचा लागल्या नाही जे चिंच आम्हा सर्वाना वर्ष भर पुरतील एवढ्या चिंचा दरवर्षी देत होती त्याच चिंचेला पुढील काळात कधीच चिंचा लागल्या नाही . चिंचा लागल्या नाहीत ,एवढे खोल परिणाम त्या झाडावर झाले होते . तसेच मोरांची
चाल ऐटदार का असते याचं गुपित लेखकांनी प्रत्यक्ष मोरांचा पाठलाग करून उघडकीस केले होते ,तसेच एके दिवशी व्हर्जिन जागेवरची वाळू आणून लेखकांनी
नदी केवळ अनुभवली नाही तर ती जगली व वाचली.लेखक एक छान वाक्य लिहितात आयुष्यात आपल्याला अनेक लढाया लढाव्या लागतात ,पण जेव्हा आपली
लढाई निरपेक्ष असते तेव्हा तिचे मोल फार मोठे असते .मग त्यातून गवसलेली वस्तू मुठभर वाळू का असेना . तसेच पोहायला गेल्यावर लेखकांना अनेक पात्र भेटली
त्यातील दहा रुपयाचा इमान राखून आपली रेल्वेस्टेशन वर तिच्या टोळीपासून सावध राहायला खुनवणारी हि भिखारीन जी धक्के मारून गर्दी बाहेर नेऊन इधरसे
भाग्ज्या तेरेको ये मार डालेंगे म्हणणारी साकीनाबी ,तसेच नदीपात्रीतील मासे पकडणारा बामनवाड जो नदीशिवाय एक दिवसही राहू शकत नव्हता त्याच्या
डोळ्यासमोर घडलेल्या बलात्काराने बामनवाड पुढील दोन तीन महिने पाच्श्यातापाने नदीवर आला नाही ,तसेच स्व;तच्या जीवाची परवा न करता सापांच्या क्षेत्रात नवीनच पदार्पण करणारा सर्पमित्र प्रसाद त्याने एका विषारी सापाला वाचविले. पुढील पात्र सगुणा एक तृतीयपंथी. तीनेकेवळ मला तिच्या जीवनातील घटनाच नाही तर रेल्वे मंध्येभेटल्यावर ती माझ्याकडे येत अससताना मी तिच्या पासून डोळे चोरून बसलो तेव्हा तिने मला विचारलं,तेरा समाज हमको क्या बुलाके पुकारतारे म्हणून विचरल तेव्हा मी तिला उत्तर दिल हिजडा तर ती मला बोल्ली खरा हिजडा कोण तू की मे? हा प्रश्न विचारून त्यादिवशी मला गप्प केले.त्या दिवसानंतर आमची चांगली मैत्री झाली ,व त्यातून तिच्या जीवनातील कहाण्या घटना ती माझ्यासमोर उलगडू लागली.सगुणाचा आज्जा ढक्कलस्टार्ट असल्याने त्याचे गुण सागुनातही आले त्या कारणांनी तृतीयपंथी तिला घेउन गेले व तिच्या शरीराचा एक भाग कुठल्याही तांत्रिक पद्धतीने डॉक्टरच्या मदतीशिवाय एका सुरीने खसकन कापून टाकला. पुढे काही दिवसानंतर लेखक सगुणाच्या
गुरुजवळ जातात व त्यांच्या विषयी अधिक जाणून घेतात .या पुस्तकात लेखक केवळ अक्षरांची मांडणी नाही करत तर अक्षर बोलके करता वाचकाला त्या
पुस्तकाची ओढ लागते व वाचक पुस्तक पूर्ण संपवल्याशिवाय खाली ठेवत नाही लेखकाने अतिशय बोलके नादीष्ट पुस्तक लिहिलंय त्यात वाचक वाचतच नसून त्या
घटना स्वत:सोबत घडताय असे प्रत्यक्ष अनुभवताय .यांसारखे अनेक पात्र लेखकाला गोदामय मध्ये भेटतात . लेखक लिहितात नदी म्हणजे आईच्या गर्भासारखे पात्र जे
आपल्या कुशीत सर्वाना सामावून घेते ,नदी म्हणजे विस्तारत गेलेले गर्भाशय ,लेखकाच्या आई गेल्या नंतर लेखकांना त्यांच्या आईची कमी जाणवायला लागली
तेव्हा नदीने त्यांच्या आईची कमी पूर्ण केली. ते तासंतास गोदामायच्या पात्राजवळ बसत ,पुरामध्ये नदीत पोहत ,व्हर्जिन भागातील नदीच्या ताळभागाशी जाऊन
तिथली वाळू आणली होती तसेच रात्री बेरात्री नदीत कधीपण नदीत पोहत असत .तरी आज पर्यंत गोदामायने त्यांना काहीच होऊ दिल नाही. लेखक लिहिताय
आईशी तुटलेली त्यांची नाळ गोदामायशी जोडल्यागतग त्यांना वाटत होती. लेखकांनी हे पुस्तक अतिशय छान व साध्या भाषेत लिहलेल असून टे वाचकाच्या
मनावर ठसा उमटून जाते. शेवटी मला आवडलेलं या पुस्तकातील एक सुंदर वाक्य :- वाहने हा ज्यांचा स्वभाव असतो तो कुठल्याच खूणगाठी बांधत नाही. लेखक फक्त
पुस्तक लिहित नाहीत तर ते पुन्हा पुन्हा जगतात.

Recommended Posts

लाल टीन की छत

PRASAD DAWALE
Share

Shareनिर्मल का संसार निर्मल मन के लोगों के लिए कठोर हो सकता है और कठोर लोगों को भी पिघला सकता है। एक ऐसी निया,जहाँ वो सारी दुनियाएँ हैं, जिन्हें हम अपने रोज़मर्रा के जीवन  में अनदेखा कर देते हैं। ‘लाल टीन की […]

Read More

TO KILL A MOCKINGBIRD

PRASAD DAWALE
Share

ShareVarghese Cheryl, F.Y.B.Tech. Electronics and Telecommunication Engineering,MKSSS’s Cummins College of Engineering For Women,Pune This classic novel weaves a compelling story through the eyes of Scout Finch, a curious and intelligent young girl, as she grapples with the complexities of her world. The […]

Read More