माधुरी श्रीकृष्ण भोपळवाड,
जयकर ज्ञान स्त्रोत केंद्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
श्यामची आई- साने गुरुजी
निरीक्षण- श्यामची आई हे साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले आत्मकथनात्मक
पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांच्या बालपणाच्या आठवणीवर आधारित असून यामध्ये एकूण 42 रात्रीचे
प्रसंग सांगितले आहे . मी कॉलेजला असतांना मला खेळात पारितोषिक मिळाले होते. त्यामुळे ते पुस्तक
वाचण्याची संधी मला मिळाली.गुरुजीचा आईचे नाव ‘यशोदा’ होते. लहानपणापासून गुरुजीचे आपल्या आईवर
अतोनात प्रेम होते ‘श्यामची आई’ या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या
आहेत.यामध्ये प्रामुख्याने एक आदर्श होतकरू आणि प्रेमळ आई यांचे दर्शन घडते तसेच यामध्ये श्यामच्या
आईने श्याम वर केलेले चांगले संस्कार दिसून येतात यामध्ये आईच्या महान त्यागाचे सुसंस्काराचे दर्शन
घडून येते.
यामध्ये श्यामची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सुद्धा श्याम वर त्याच्या आईने केलेले
संस्कार हे नावाजण्या जोगे आहेत. आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे
म्हणून झटणारी पण हे संस्कार उपदेशाच्या रूपात मुलांना न रुजवता स्वत:च्या वागण्यातून व दैनंदिन
छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी
कठोर बनणारी ही आदर्श श्यामची आई हे पुस्तक आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी
प्रेरक ठरेल, हे निश्चित. श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील
सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना
श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय
भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. साने गुरूजीं लिखित ‘श्यामची आई’ एक पुस्तक नसून
आई बद्दलचे प्रेम, आदर आणि कृतध्नता व्यक्त करणारा एक ग्रथ आहे. आईचे वैशिष्ट्य हे आहे की,
तिच्या आयुष्याचा क्षण नि क्षण तसेच शारीरिक-मानसिक अंश नि अंश तिच्या बाळाच्यासाठीच असतो.
बालक तळतळून रडत असो वा स्वानंदात रमून खेळत असो, त्याला हृदयाशी कवटाळणे, सर्वतोपरी रक्षण
करणे, हा आईचा स्वभाव आहे. ती तिला ईश्वरी देणगी आहे. आपल्या बालकाची आवड पुरवून त्याचे
जीवन साकारणे, हे तिचे अंगभूत कर्तव्य ती निरपेक्षपणे बजावत राहते. श्यामच्या आईचे श्यामवर केलेले
संस्कार हे अनंत काळासाठी आहे. किंबहूना येणा-या काळात त्याची गरज अधिकाधिक भासणार आहे.
संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर
करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे… पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार हे एका
पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा साने गुरूजी यांनी ‘श्यामची
आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या;
साने गुरुजीनी लिहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे.
कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं. नाशिकला जेलमधे असतांना साने
गुरूजींनी आईच्या आठवणी लिहून काढल्या. साने गुरूजींचे ‘श्यामची आई’ हे काही आत्मचरित्र, कांदबरी
किंवा निबंध नाही. मातेबद्दलच असणार प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ या
पुस्तकात आहे. हे सुंदर पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक म्हणजे त्यानी
लिहीलेल्या आईच्या आठवणीं आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रघ्दाजंली, हृदयातील सारा
जिव्हाळा यात गुरूजींनी ओतलेला आहे.
यातील काही प्रसंग
1) जसे की श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून पण जप
या छोट्या प्रसंगावरून किती सुंदर शिकवण दिली आहे.
२) तसेच मला चोराची आई म्हटलं तर चालेल का? यावरून शाम वर चांगल्या प्रकारचे संस्कार केलेले
दिसून येतात.
३) घरातून पळून जाऊन परत आल्याचा प्रसंग, वडिलांवर रागावणे रुसण्यांचा प्रसंग, नोट चोरून घेण्याचा
प्रसंग, न म्हणता म्हटला असे खोटे बोलण्याचा प्रसंग, पाण्यात पोहण्याचा प्रसंग असे कितीतरी प्रसंग
यामध्ये वर्णन केलेले आहेत. श्यामची आई हे पुस्तक एक सुंदर पुस्तक असून साने गुरुजी यांनी त्यांच्या
मातेबद्दल असणारे प्रेम जिव्हाळा भक्ती आणि कृतज्ञता यामध्ये मांडले असून सदर आत्मचरित्र
वाचताना वाचकांचे डोळे व हृदय भरून येते आईचे वैशिष्ट्य हे आहे की तिच्या आयुष्याचा क्षण निक्षण
तिच्या बाळासाठीच असतो जेव्हा बाळ रडत असते किंवा खेळत असते त्याला हृदयाशी कवठाळणी तसेच
त्याचे रक्षण करणे तिचा स्वभाव झालेला आहे तिला मिळालेली ही ईश्वरी देणगीच आहे.
श्यामची आई हे पुस्तक का वाचावे
श्यामची आई हे पुस्तक वाचताना लक्षात आले की साने गुरुजी चे आई प्रती प्रेम तर होतेच पण मित्र
–मडळी सोबत असलेला स्नेह सुद्धा अपार होता. यातून आईने आपल्या मुलावर कसे संस्कार केले पाहिजेत हे
श्यामची आई या पुस्तका वरुन लक्षात येते. आपल्या लेकराला सगळे काही आले पाहिजे हि त्यामागची धडपड
असते वेळ पडल्यास जबर मार तर त्यानंतर प्रेमाने जवळ घेणे हे सर्व एक आदर्श माताच करू शकते. श्यामची
आई हे पुस्तक आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.