Share
पुस्तक परीक्षक : डॉ. शैलेंद्र काळे, खडकी एज्युकेशन सोसायटीचे टीकाराम जगन्नाथ कॉलेज, खडकी, पुणे

“प्रेरणा…द साउंड ऑफ सायलेन्स..” अर्थात, संघर्षातून मिळणारी प्रेरणेला आवाज नसतो…संघर्षाचा मुकाबला नेहमी शांतच होत असतो. आयुष्याच्या अवकाशात अनेक माणसं तारे सारखी चमकताना दिसतात; मात्र त्यांच्या चमकण्यात चमत्कार नसतो. अशा संघर्षात दुर्दैवाने काही तारे नकळत यशाच्या अवकाशात लुप्त होतात मात्र संपत नाहीत. तर काही तरी ध्रुवताऱ्यासारखे आढळतात विराजमान झालेली दिसतात. या प्रेरणामुळे आत्मकथनाला आणि त्यात असलेल्या, प्रेरणा देणाऱ्या पालकांना श्रेष्ठ समाजसेवी विद्या बाळ, नानासाहेब गोरे, अनिल अवचट या माणसांनी प्रत्यक्षात मदत करून प्रेरणाचे कौतुक केले आहे. या प्रेरणेचे कौतुक म्हणजे संघर्षाचा वारसा लाभलेल्या अनेक दिव्यांगांना दिलेले आशीर्वाद आहेत.

“प्रेरणाचा”जीवनपट म्हणताना स्वतः लेखिका असलेली आई पेरण्यासाठी काही ओळी लिहिते,…

”या जमिनीवर तू एक आकाश निर्माण कर,

प्रत्येक पावलागणिक एक विश्वास निर्माण कर,

पंखांना क्षितीज नसते म्हणत जगण्यात अर्थ भर,

फिनिक्सच्या उंच भरारीतून प्रेरणा हे नाव सार्थक कर…

प्रेरणाची आई सौ. उज्वला मॅडम ह्या विद्या विभूषित आहेत. वडील केशवराव हे अध्यापक आहेत. उज्वला मॅडम आणि केशव सहानी सर पुण्याच्या जनता शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचे कार्य करतात.…यांच्या पोटी प्रेरणाचा जन्म होतो प्रेरणाचा जन्म तिच्या मुलीच्या ओठांनी पहिल्यांदा आईने असलेलं पाहिलं तेव्हा हा जीव असाच हसत राहावा म्हणून आईचा आनंद गगनात मावेनासा झाला थोडी मोठी झाल्यानंतर मात्र दुर्दैवाने प्रेरणाला पॅरालिसिस झाला तरीही हिंमत न हारता आई-वडिलांनी प्रेरणाचे पालन पोषण केले अगदी निवडुंगाच्या फुलाचे फुलणे, फुलवणे अशा प्रकारचे होते. आयुष्यात फक्त फुले नसता तर त्यासोबत काठीही असतात पण प्रेरणाच्या बाबतीत फुलाखाली असणाऱ्या काट्यांचे पालकत्व अतिशय आत्मिकतेने आई उज्वला आणि वडील केशव यांनी पार पाडले.

हे आत्मकथन…अजूनही संघर्षातून यशाच्या दिशेकडे वाटचाल करणाऱ्या प्रेरणाचे आहे प्रेरणा अजूनही यशाच्या गगनात गगन भरारी उंच उंच भरताना दिसते. काळजाच्या तुकड्याने अखेर गगनाला गवसने घालावी सूर्यवंंजळीत घ्यावा असे आईला सतत वाटले…म्हणूनच तुमची मुलगी प्रेरणा ही ओळख बदलून हे प्रेरणाचे आई-बाबा अशी ओळख जेव्हा समाजात मिळते तेव्हा प्रेरणा घेणे तिच्या हिमतीने जिद्दीने आणि गुरुच्या साथीने”नृत्यांगना”म्हणून एक जिवंत अभिमान आई-बापांच्या आणि समाजाच्या हृदयात पेरला.

३०मे१९८५ ला प्रेरणाचा जन्म झाला. सहा महिन्याची असताना प्रेरणाला अर्धांग वायूचा झटका आला त्यात १०० टक्के बहिरेपण तिच्या आयुष्याला पुजले. दहावी बारावीला यश मिळवताना तिला आणि घरच्यांना मनस्वी अभिमानास्पद आनंद झाला. मूक बहिरेपणा असतानाही प्रेरणाने सर्वसामान्य हुशार विद्यार्थ्यांसाठी तिने यश मिळविलेली बघून सर्वांना प्रेरणाचे कौतुक वाटले. उच्च शिक्षणासाठी तिने संगणक शाखा निवडली. संगणक शाखेत फोटो शॉपी आणि काही संगणक कौशल्य आत्मसात केली.

हे सर्व करीत असतानाच प्रेरणाची आई यांनी तिच्या पावलांना भरत नाट्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याचे ठरविले अर्थात प्रेरणाला नृत्त्यांमध्ये आवडू प्रारंभी पासूनच होती. भरत नाट्य मध्ये प्रारंभिक, प्रवेशिका आणि मध्यमा पूर्ण करून प्रेरणाने आपली नृत्याची जोपासत नृत्यांगना म्हणून नावलौकिक कमविला. याशिवाय मराठी इंग्रजी टंकलेखन इमिटेशन ज्वेलरी मेकिंग, रांगोळी मेहंदी ग्लास पेंटिंग हे कौशल्यही तिने आत्मसात केले याशिवाय चित्रकलेचा फाउंडेशन कोर्स पूर्ण केला.

प्रेरणा उपवर झाल्यानंतर दिव्यांग असलेल्या आईबापांच्या मनाला मुलीचे लग्न तिचे आयुष्य स्वकारक होण्यासाठी चिंता लागून राहते. यातूनच १६ नोव्हेंबर २०१३ रोजी स्वप्निल दीक्षित यांचे बरोबर प्रेरणाचा विवाह झाला. प्रेरणाला पती स्वप्नील यांनी सतत पाठीशी राहून तिच्यातील भरत नाट्य शिक्षणाची पुन्हा एकदा सुरुवात केली १९९६ मध्ये साधना नृत्यलय पुणे येथे गुरु शुमिता चटर्जी-महाजन यांच्या कडून त्यांनी संगीताचे आणि नृत्याची साधना केली. देश परदेश आणि मोठमोठ्या नृत्य सादरीकरण स्पर्धेत प्रेरणाचे कौतुक झाले. सुमारे अर्धशतक पुरस्कार आज प्रेरणाच्या नावावर आहेत.

…वेदनेचे नृत्य झाले असे अभिमानाने प्रेरणे विषयी मराठी विषयाचे ज्येष्ठ,अभ्यासक डॉ.सु.रा. चुनेकर अभिमानाने म्हणतात..

प्रेरणाचे वडील हे सामान्य शेतकरी पासून नोकरी करून शिकणारा शेतकरी कुटुंबातला एक तरुण म्हणून आयुष्याला प्रारंभ करतात याच काळात प्रेरणाची आई उज्वला एका गर्भ श्रीमंत मारवाडी कुटुंबातून आलेल्या त्यांना मदत करते. विषम परिस्थितीत दोघे एकत्र येतात आणि आयुष्याचे सुरेल जीवनगाणे प्रेरणाच्या रूपाने संसारात बहरते,उमलते.. एक सुंदर, सुकोमल, नाचरे सुगंधी फुल…”प्रेरणा”.. नाद तालाचा ठेक्याचा आवाज न ऐकताना देखील एक श्रेष्ठ नृत्यांगना अशी ही ओळख सर्वांना प्रेरणादायी ठरते.

 

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

Related Posts

मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान

Anand Naik
Shareमराठ्यांचा इतिहास हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासात एक वेगळं पान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य सतराव्या...
Read More

द अल्केमिस्ट

Anand Naik
Share ‘द अल्केमिस्ट’ ही बघायला गेलं तर एक सरळसाधी गोष्ट. सॅन डियागो नावाच्या मेंढपाळाची. तो एका छोट्याशा खेड्यात राहत असतो....
Read More