श्री मस्के रामकृष्ण नेमीचंद्र (टी वाय बीसीएस- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर)
परिचय
मला आवडलेले पुस्तक अग्निपंख आहे. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि संघर्षमय चित्रकथा रेखाटले आहेत. या पुस्तका
ची सुरुवात त्यांनी मातापित्या स्मरून करून केली. या पुस्तकात अब्दुल कलामांच व्यक्तिमत्व उलगडला आहे.
कथानक
कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामा नाथ पुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्यामुळे कलाम यांना गावात वर्तमानपत्रे विकून तसेच लहान मोठी कामे करून पैसे कमवावे लागले. त्यांचे बालपण खूपच कष्टात गेले. शाळेत असताना एकदा गणिताचे शिक्षक राम कृष्ण अय्यर यांनी छडीने मारले तेव्हा ते मनावर घेऊन पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या कलामांचे अनेक वेळा कौतुक झाले. माझ्या छडीचा मार खाणारे पुढे जाऊन मोठी व्यक्ती बनतात असे ते शिक्षकांनी म्हटले. कलमांना गणिताची मोठी आवड होती. नंतर ते तिरुपतीलापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथे बीएससी झाल्यानंतर त्यांनी मद्रासी युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रवेश घेतला. प्रवेशासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने घाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेचेत एराणॉटिकलचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. जीवनातल्या अनेक संघर्षाशी दोन हात करत कलाम यांनी आपले ध्येय गाठले.
शैली आणि मांडणी
अतिशय सहजतेने आणि सोप्या भाषेत या पुस्तकाची मनोहर शब्दात मांडणी केली आहे. आयुष्यातील यशस्वी होण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे माणूस प्रचंड इच्छाशक्तीने संकटावर मात करी कसा यशस्वी होतो याच उत्तम मांडणी यात करण्यात आली आहे. कलामान्य सहजतेने आपल्या यशाचे रहस्य वाचकांना या पुस्तकात उलगडून दाखवले आहे.
विशेष वैशिष्ट्ये
तरुणांसाठी प्रेरणादायी पुस्तक.
जगात सहजतेने काही मिळत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात हा संदेश.
अभ्यास कष्ट आणि परिश्रम हे वाया जात नाहीत याची प्रचिती म्हणजे हे पुस्तक.
समारोप
डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे आपल्या सर्व सहकाऱ्यांना प्रोत्साहित करताना दिसतात. अपयशाने कधीच खचून जाऊ नये. त्यांनी त्यांच्या टीमला संदेश दिला आहे, संकटे अडचणी येत असतात पण त्या संकटांना कसे उत्तर देता येते हे आपल्यावर अवलंबून आहे. अडचणी आल्यावर त्यांना न घाबरता त्याच्यावर कशी मात करावी हे अग्निपंख या पुस्तकातून डॉ. कलाम यांनी सांगितले आहे.
