Share

इ.स.1971 साली मौज प्रकाषनाने प्रकाषित केलेली आनंद यादवांची पहिली कांदबरी ‘गोतावळा’.आनंद यादवाने ही कांदबरी 21 प्रकरणात आणि 143 पानंात लिहिली आहे. या कादंबरीतील कथा नारबाच्या तोंडून सांगितली आहे. यादवानी नटरंग (1980), एकलकोंडा (1980), झोंबी (1990), घरभिंती (1992), नांगरणी अषा मोजक्या पण दर्जेदार कांदब-या आनंद यादवानंी लिहिल्या. प्रत्येकाचा आषय विष्व हा वेगवेगळा आहे. मात्र आनंद यादवांच्या गोतावळा कांदबरीने मराठी कादंबरी विष्वाला नवे परिमाण दिले. निसर्ग आणि माणूस यांच्या भावसंबंध आपल्या प्रतिभेचा विषय बनवून जो आविष्कार केलेला आहे तो मराठी कांदबरी विष्वात एक मैलाचं दगड बनलेली आहे. कादंबरी विष्वात अतिषय मौलिक, अव्दितीय अषी ही कांदबरी आहे. नारबा हा गोतावळयाचा नायक आहे. त्याचप्रमाणे रामू सोनवडे, त्याची बायको, मालकीण, गंग्या, सित्या, विकास, हिंदुराव, सावित्री आणि ड्रायव्हर व पाव्हणा या गौण व्यक्तिरेखा आहेत. सोन्या, चाण्या, ओपाला आलेली पाडी, नाग्या – वाघ्या बैल, राम्या – भिम्या रेडे, म्हालिंगा बैल, चंपी कुत्री, म्हारुत्या घोडा, कोंबडा, कोंबडीची पिल्लं, राजा कुत्रा, कासव, षेळीची बकरं आणि इतर पषुपक्षी, झाडझुडपं ही नारबाच्या गोतावळयातील आहेत. नारबाच्या भावविष्वात या सर्वांना महत्वाचे स्थान आहे. रामू सोनवडे, ड्रायव्हर पाव्हणा हे खलनायकासारखे वागतात. त्यांच्यामुळे नारबाचे भावविष्व उध्वस्त होते.

Related Posts

विस्थापितांचे व्यथामय जीवन मांडणारी कादंबरी रिंगाण

Vishnu Rathod
Shareरयत शिक्षण संस्थेचे, रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर (स्वायत्त) वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत पुस्तक परीक्षण स्पर्धा विस्थापितांचे व्यथामय जीवन मांडणारी...
Read More