डॉ. डी .जी. उशीर, डॉ. एस .आर .जावळे, डॉ.एस. आर .पगार, डॉ. एस.व्ही. टिळे डॉ. एम.एम. भोसले. यांनी “बाजार संरचना आणि कल्याणकारी अर्थशास्त्र”या पुस्तकाच्या माध्यमातून प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्वच स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
प्रथम वर्ष वाणिज्य शाखेसाठीच्या द्वितीय सत्रासाठी” बाजार संरचना आणि कल्याणकारी अर्थशास्त्र” हे पुस्तक पूर्णपणे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिले आहे .अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने नवीन बाजार संरचनेशी संबंधित अनेक नावीन्यपूर्ण संकल्पनांचा प्रकरणांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ बाजाराचे वर्गीकरण व बाजारातील बदलते कल प्रवाह, अपूर्ण बाजार संरचना सरकारी हस्तक्षेप आणि कल्याणाच्या संकल्पना, कल्याण सुधारण्यासाठी उपायइ. अर्थशास्त्र हा विषय समजण्यासाठी आकृत्यांना खूप महत्त्व असते त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी आकृत्या समीकरणे ,तक्ते याचा आधार घेऊन मुद्दे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयसमजण्यास खूप मदत होणार आहे.
हे पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त आहे असे नाही तर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठांमध्ये शिकणारे विद्यार्थी प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील उपयुक्त ठरेल असे मला वाटते.