Share

भारताचे संविधान या पुस्तकामध्ये मानवाचे मूलभूत हक्क जसे की समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, तसेच धर्म स्वातंत्र्याचा हक्क या सर्व हक्कांविषयी माहिती मिळाली. हे पुस्तक वाचून मला खूप माहिती मिळाली. स्वातंत्र्याचे हक्क काय असतात हे मला या पुस्तकात समजले मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकात मानवांच्या अनेक हक्कांविषयी माहिती दिली आहे. संसदेचे कोणते अधिकार आहेत हे या पुस्तकात मला समजले,सरकारी कामाविषयी माहिती मिळाली आणि संसद म्हणजे काय,राज्यसभा म्हणजे काय लोकसभा म्हणजे काय, त्याची रचना कशी आहे हे समजले. सरकारी कामकाज कसे चालते आणि आपली मूलभूत कर्तव्य कोणते आहेत हे समजले राज्य धोरणांची निदेशक तत्वे कोणती आहेत हे समजले सांस्कृतिक व शैक्षणिक कोणते हक्क आहेत हे भारताचे संविधान या पुस्तकातून मला समजले.

Related Posts