सदर पुस्तक नवीन शैक्षणिक धोरण तोरण 2020 यानुसार महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, कला, स्थापत्य कला, साहित्यकला याची गतकाळातील गौरवशाली भारतीय रचनांची माहिती मिळाली. याकरिता प्रत्येक विषयाचा थोडक्यात व मुद्देसूद ओळख करण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.
या पुस्तकात थोडक्यात माहिती देणारी 15 प्रकरणे अगदी 96 पानात लिहिलेली आहेत. लेखकाने या पुस्तकाच्या रूपाने भारतीय ज्ञानाचे परिचय सर्व अंगानी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकात व्याख्या उद्देश प्राचीन शिक्षण व्यवस्था, तत्वज्ञान, विज्ञान व औषध शास्त्र, शेती, व्यापार, राजकीय व्यवस्था याबाबत माहिती दिलेली आहे.
बुद्ध व जैन धर्मातील तत्त्वज्ञान थोडक्यात परिचय केलेला आहे. भारतीय भाषेचा उगम संस्कृत, तामिळ, पाली, प्राकृत, ब्राम्ही,कन्नड, तेलगू, मल्याळम, ओडिसा याची ओळख लिहिलेली आहे. व या भाषेतील विविध ग्रंथांची थोडक्यात माहिती दिलेली आहे.
भारतीय संगीत कला, नाट्य, यातील विविध प्रकारची माहिती मिळते. भारतीय स्थापत्य कला, मंदिर,आणि नगर रचना, वास्तुशास्त्र यांचा समावेश दिसत आहे. भारतीय नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र या गरजांचा परिचय वाचकांसाठी उपयुक्त आहे. सदर पुस्तकात सखोल पूर्णपणे माहिती नसून यामध्ये वाचकाला अभ्यासाला विद्यार्थ्याला प्राचीन भारतीय ज्ञान व्यवस्था म्हणजे काय याबाबत थोडक्यात माहिती मिळण्यास हे पुस्तक उपयुक्त आहे. पुस्तकाची किंमत फक्त रुपये 165 आहे. त्यामुळे आपल्या संग्रहित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. सदर पुस्तक वेबसाईटवर उपलब्ध आहे. याचे मुखपृष्ठ व पुस्तकाचे पाणी साधी आहे. परंतु ज्ञानावर्धक माहिती यामध्ये आहे.”