‘भुरा’ हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील प्रा. शरद बाविस्कर यांचे आत्मकथन आहे. धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या लेखकाने, प्रतिकूल परिस्थितीतून, गरीबीतुन उच्चशिक्षण घेतले आणि जगभरातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतले. भुरा ऊर्फ शरद यांचा प्रवास गरिबी, सामाजिक अडचणी आणि शैक्षणिक संघर्षांनी भरलेला आहे. दहावी नापास झाल्यानंतरही त्यांनी शिक्षणाची ओढ सोडली नाही. बिगारी कामगार , क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत असताना, त्यांनी इंग्रजी शब्दकोश पाठ करून भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आईने दिलेले “झिजून मरा, पण थिजून नाही मरा” हे तत्वज्ञान त्यांच्या जीवनाचा आधार बनले. ‘भुरा’ हे आत्मचरित्र प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, ज्यात लेखकाने शिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान कसे मिळवावे हे दाखवले आहे. त्यांच्या कथेतून जिद्द, इच्छाशक्ती, आत्मविश्वास, स्वाभिमान आणि मेहनतीचा खरा अर्थ उलगडतो. जिद्द आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी असेल तर शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात परिवर्तन कसे घडवता येते, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
Previous Post
गरुडझेप Next Post
The Secret Related Posts
Shareनाना मी साहेब झालो हे पुस्तक उपेक्षित सालगड्याच मुलगा ते आय आर एस अधिकारी यांचा एक जगा वेगळा जीव घेणा...
Shareगांधी आणि त्यांचे टीकाकार साधना प्रकाशनाच्या या पुस्तकात 18 लेख आहेत, गांधीजी आणि सावरकर व हिंदुत्ववादी, गांधीजी आणि आंबेडकर, गांधीजी...
ShareKamal v Thube, Librarian, SITS, Narhe टेलिकॉम क्रांतीच महास्वप्न माझा प्रवास……….. सॅम पित्रोदा मी हाती घेतलेलं पुस्तके अत्यंत साहसी जिद्दी...
