आजपर्यंत छत्रपती शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक चार-पाच प्रसंगच पोवाड्यांपासून ग्रंथापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत / लोकांसमोर पुन्हा पुन्हा रंगवून मांडले गेले आहेत. या ठराविक प्रसंगांपलीकडील छत्रपती शिवराय सर्वसामान्यांना माहित नाहीत. या पार्श्वभूमीवर विश्वास पाटील यांचे महासम्राट अतिशय विस्तृतपणे छत्रपती शिवरायांची जीवनगाथा कादंबरीमालेच्या रूपात वाचकांसमोर मांडते. राजमाता जिजाऊ यांचे वडील लखोजीराव जाधव यांची भर दरबारात निजामाने केलेली हत्या, जिजामाता आणि शहाजीराजेनी स्वराज्य स्थापनेचे बघितलेले स्वप्न इथून महासम्राटची सुरुवात होते. दोन वेळा शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेचा केलेला प्रयत्न, शहाजीराजे आणि त्याच्या भाऊबंदांची पराक्रमी कामगिरी परंतु दूरदैवाने पुन्हा विजापूरच्या आदिलशाहाची करावी लागलेली चाकरी याचा विस्तृत पट कादंबरीमध्ये आढळतो. छत्रपती शिवरायांचे शहाजीराजांच्या राजतालमीत प्रशिक्षण, स्वराज्य स्थापना, शहाजीराजांची आदिलशाहाने केलेली कैद याबरोबरच छत्रपती शिवरायांचे स्वराज्यविस्तार व त्यानंतर अफजलखानाची स्वारी आणि त्याचा जावळीत छत्रपतींना केलेला वध, या सर्व घटनाचे सविस्तर विश्लेषण या खंडात आहे. विश्वास पाटील यांच्या ओघवत्या लेखनशैलीने वाचक कादंबरीमध्ये गुंग होवून जातो. छत्रपती शिवरायांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचावी अशी ही कादंबरीमाला आहे.
Related Posts
Shareभारताचे संविधान या पुस्तकामध्ये मानवाचे मूलभूत हक्क जसे की समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, तसेच धर्म स्वातंत्र्याचा हक्क या...
Shareसारिका आर शेलार (एम बी ए प्रथम वर्ष): इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्पुटर मानजमेंट (आयआयसीएमआर) द अल्केमिस्ट पुस्तकाचे लेखक “पाउलो...
ShareYoung sailor Edmond Dantès was falsely accused and sent to prison. He was even framed as an agent of the...
