माझा भारत ,उज्वल भारत

Share

Book Review : Pawar Sunanda Kashinath,MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik.

माझ्या गुरुच्या – शिक्षकांचे शिक्षक असलेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९३१–२०१५) यांच्या – पुस्तकाला प्रस्तावना लिहण हो माझ्यासाठी भाग्यचं आणि तितकच अवघड काम आहे. त्यांच्या कल्पना खुपच व्यापक असायच्या आणि त्यांचा दृष्टिकोनही खूपच सखोल असायचा. त्यामुळे पुस्तकांच्या काही पानांमध्ये तो मांडण
हे माझ्यासारख्या विदयार्थ्याला शक्यच नाही. तरीही, हे शब्द लिहित असताना माझ्या मनान त्यांच्या- विषयी रंगीबेरंगी आठवणी उचंबळून येत आहेत. माझ्या मनात गुरूंनी माझ्या मनान चेतवलेला प्रत्येक विचारा मला आठवतो आहे; आणि हा प्रत्येक विचार त्यांनी मला कसा शिकवला, त्याची निर्मिती आणि त्यांच परिवर्तन कस केलं, हे आठवतं आहे.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतीय पिढ्यांना दिलेला वारसा म्हणजे त्यांनी स्वप्न पाहायला प्रोत्साहन दिलं, ती वाढवायला आणि प्रत्यक्षात आणायला प्रेरणा दिली. वर्तमानपत्र टाकणारा एक मुलगा पुढे जाऊन अंतराळशास्तज्ञ, रॉकेट इंजिनिअर, क्षेपणशास्त्रज्ञ आणि अखेरीस भारताचा अकरावा’ राष्ट्रपती होनो ही गोष्ट देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिलासा देणारी आहे; आपल्यात क्षमता असेल आणि मेहनत घेण्याची, करण्याची तयारी असेल तर आपणही मोठी झेप घेऊ शकतो, असा आत्मविश्वास देणारी ही गोष्ट आहे.
डॉ. कलाम यांना तरुणांबद्धल विशेष जिव्हाळा होता. ते कितेकदा म्हणत, वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत मुलांच्या मनाची जडणघडण होत असते. तेव्हाच त्यांच मन उत्तमरित्या घडवायला हव, नहीतर नंतर ते कठीण होऊन जातं.” त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यातला मोठा भाग- त्यांच्या राष्ट्रपती – पदाच्या कार्याकाळात आणि त्यानंतरही- भारतीय तरुणांच्या मनांना आकार देण्यासाठी वेचला. तरुणांमध्ये तीन गोष्टी मुख्यत्वाने असल्या पाहिजेन अस त्यांना वाटायचं अशा प्रामाणिकपणा, सर्जनशीलना आणि धैर्य त्यांनी याबदल एक समीकरण ही तयार केल होत. ज्याला ते ‘”ज्ञानच समीकरण”अस म्हणायचे .
या पुस्तकात समाविष्ट केलेल्या बऱ्याच भाषणाच्या लेखन प्रक्रियेत मीडॉ .कलाम यांच्यासोबत होतो असे ते म्हणत .
हे पुस्तक प्रामुख्याने तरुणांसाठी आहे. त्यात त्याच्या आयुष्यातले वेगवेगळे विचार, जगलेले क्षण गुंफलेले आहेत. त्यामुळे देश घडवणाऱ्या अग्रगण्य केल्यापैकी एक असलेल्या कलाम यांच हो पुस्तक प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्यात ऊर्जा फुंकण्यासाठी पथर्शक मैलाचा दगड ठरत .

* तुमच्या देशावर प्रेम करा *
“डॉ. कलाम हे जेष्ठ व आदरणीय मार्गदर्शक होते .मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो.त्यांच्या जान्याने मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातला सर्वोतम मार्गदर्शक गमावून बसलो आहे. आपल्या देशाला एक बळकट राष्ट्र करण्यासाठी झटणारा देशाचा पुत्र आपण गमावला आहे. भारताची तरुण पिढी स्वयंसिद्ध आणि कणखर व्हावी, यासाठी त्यांनी आपलं अवघं आयुष्य वेचल.”