Pournima Vidya Vinayak Kulkarni (T.Y.B.A) H.P.T Arts and R.Y.K Science College, Nashik
वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली ययाति ही कादंबरी मराठी साहित्यातील एक अद्वितीय रचना मानली जाते. महाभारताच्या आधाराने लिहिलेली ही कथा केवळ ऐतिहासिकच नाही, तर मानवी जीवनातील गूढता, वासना, मोह आणि त्याग यांचा सखोल अभ्यासही आहे. १९६० साली या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला जो मराठी साहित्यासाठी गौरवाचा क्षण ठरला.
ययाति पुस्तकाचा सारांश
ययाति या कादंबरीचा मूळ संदर्भ महाभारतातील आदिपर्वातील यतोपाख्यानामधून घेण्यात आला आहे लेखकाने या मूळ संदर्भाला अनेक आयाम जोडले आहेत जेणेकरून ने वर्तमान काळाशी सुसंगत असेल. दैहिक आणि भौतिक इच्छांना मागे धावणाऱ्या एका राजाची ही कथा आहे. ज्याचची लालसा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. या कथेत लेखकाने नैतिक परिमाणावर मुख्य पात्राच्या मनात सुरू असलेला संघर्ष समर्पकपणे चित्रित केला आहे.
कादंबरीतील तीन नायक त्यांच्या स्वतःच्या कथा सांगतात. लेखकाने तीच घटना तिघांच्याही दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पध्दतीने सांगितली आहे. हस्तिनापूरचा राजा आणि चंद्रवंशी नहुषाचा राजा ‘ययाति’ हे सर्वात प्रमुख पात्र आहे त्याचा एक मोठा भाऊ यती होता, जो भौतिक वासनांपासून दूर होता आणि त्याने राजवाडा सोडला होता बाकी मुख्य पात्रे म्हणजे असुरांचे गुरु शुक्राचार्य, त्यांची कन्या देवयानी, असूर राजा वृषपर्व आणि त्यांची मुलगी शर्मिष्ठा आणि देवयानी या बालपणीच्या मैत्रिणी होत्या दुसरे पात्र म्हणजे ऋषी कुमार कचा बृहस्थीपतीचा पुत्र. देवांचा पुत्र जो ययातीचा मित्र आणि देवयानीचा आकर्षण किंवा प्रेम होता. ययाती आणि शर्मिष्ठा यांचा मुलगा पुरुचीही या कथेत अनोखी भूमिका आहे.
मला काय आवडले
ययाति यासारख्या कादंबऱ्या पुन्हा पुन्हा रचल्या जात नाहीत. अतिशय प्रभावी लेखन, योग्य गती, नेमके शब्दाचा वापर आणि सुरळीत कादंबरी प्रवाह हे निर्मात्याचे कौशला म्हणावे पौराणिक संदर्भति कल्पनाशक्ती आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन यांची सांगड घालत त्यांनी ‘ययाति’ सारखी सुंदर रचना कशी निर्माण केली. वाचून असे वाटले की लेखकाने यथाति वर्तमानात आणला आहे कारण आजची व्यक्ती ही एक प्रकारची ययाति आहे जी आपली तृष्ण शमवण्यासाठी पळत असते. लालसा नाहीशी होत नाही तर वाढतं आहे.
‘ययाति’ या कादंबरीलात मला सगळ्यात जास्त आवडली ती कथा म्हणजे कथा चालू आहे तरीही लेखकाने कथेसोबतच पात्राच्या अंतरंगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या तर्कशुद्धतेचा किंवा नसलेल्या परिणामाच्या विचार केला आहे.
मानसिक संघर्षाचे कुशल चित्रण आणि भावनाच्या नेमन्या अभिव्यक्तीने या कादंबरीला ययाति विक्षिप्त बनवणाऱ्या सरळ कथाशिवाय मानसशास्त्रीय दृष्टीकोनही दिला आहे.
जे मला आवडले नाही
यथाति हि निःसंशय सुंदर रचना आहे. पण वाचताना सतत निराशेची भावना जागवते आले नाही मला कथेच्या मुख्य पात्राशी जोडता आले नाही कारण अशा प्रकार केले गेले आहेत साधारधापणे, कादंबरीतील कोणत्या ना कोणत्या पात्राप्रती निर्माण होणारी ओढ आपल्याला कादंबरी शेवट पर्यंत वाचण्यास प्रवृत्त करते.
सत्य हे आहे की आपण सर्व आपल्या जीवनात हेच करतो एवढेच आम्ही आमची इच्छा पूर्ण करण्यात व्यस्त आहोत कुठे सत्तेची लालसा, पैशाची लालसा , तर कुठे नावाची लालसा प्रत्येकजण तृष्णा तृप्त करण्यात मग्न आहे. याचा शेवट कुठे आहे कोणालाच माहित नाही.
शिफारस
माझ्या मते, ययाति वाचायलाच हवा कथा पौराणिक असेल पण आजच्या काळातही घटना तितकीच भावना चपखल बसते. पात्रांच्या भावना आणि घटनेकडे पाहण्याचा दृष्टिने यांचे अतुलनीय चित्रण आहे. त्यामुळे ययाति वाचून काय करूनये हे काही प्रमाणात समजू शकते.