मुंबई विधीमंडळातील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विचार-वेध

Share

Book Review : Dubey Priya Ramesh, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik.

Shri B.S.HIRAY : अध्यक्ष महाराज, या बिलाला विरोध करणाऱ्या सगळ्या सन्माननीय सभासदांनीं मराठींत भाषणें केलेली असल्यामुळे त्यांचे समाधान होण्याच्या दृष्टीनें मीहि मराठींतच अत्तर देणार आहे. सन्माननीय सभासद श्री. देशमूख यांनी या बिलात जे नाही ते वाचण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या बिलाच्या बाबतींत ओक गोष्ट मला मान्य केली पाहिजे की या विभागातील वाघेर लोकांना लँड रेव्हिन्यूच्या बाबतीत आजपर्यंत ज्या सवलती होत्या त्या सवलती या बिलान्वये काढून घेतल्या जाणार आहेत. सन्माननीय सभासद श्री. दत्ता देशमूख यांनी आज या बिलाला ज्या तत्वावर विरोध केलाआहे तो त्यांच्या दृष्टीने बरोबर असेल तर अशाच प्रकारची जी अनेक बिले या सभागृहात पास झालीं त्यांच्या बाबतींतहि त्यांनीं हे तत्व लागू करावयास हवे होते. या बिलाला विरोध करण्यामागचे हे तत्वत्यांचे स्वतःचे आहे कर्का त्याना ते कोणी आताचे सुचविले आहे ही गोष्ट सोडून दिली तरी या लोकांबर अंक प्रकारचा जुलूम होत आहे असे जे ते म्हणाले ते कितपत खरे आहे तेआपण पाहिले पाहिजे.
कर्मवीर भाऊसाहेबां विषयी थोडेसे

संयुक्त महाराष्ट्रातील त्यागी नेतृत्त्व, काँग्रेसचे निष्ठावंत सेवक, कुळ कायद्याचे जनक, बहुजनांच्या उध्दारासाठी शिक्षण व सहकार महर्षी, अभ्यासू महसूल मंत्री, साधु पुरुषातले राजकारणी आणि राजकारणातले साधु पुरुष, बदलत्या काळाची पाऊले ओळखून शेतकऱ्यांनी आता प्रक्रिया उद्योगाकडे वळावे असे पन्नास वर्षा पूर्वी सांगणारे भाऊसाहेब. नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक राजकीय नेते उदयास आणणारे भाऊसाहेब हिरे.

कर्मवीर भाऊसाहेबांचे बालपणीचे नांव ‘भाऊ’ शिक्षकांनी शाळेत नांव टाकताना भाऊ असेच टाकले. मालेगांव तालुक्यातील निमगांव या गावात दि. १ मार्च १९०५ या दिवशी त्यांचा जन्म झाला. कर्तृत्वाने बालपणीचे भाऊ पुढे भाऊसाहेब हिरे या नावाने प्रसिध्दीस आले. हिरे मुळचे राजस्थानातील, यादव काळात ते महाराष्ट्रात आले. त्यातील एक कुटूंब निमगांवी आले. (सवीस्तर कुंडली, वंशवेल परिशिष्टात आहे.) भाऊसाहेबांचे वडील सखाराम पाटील, आईचे नांव झेलाबाई, झेलाबाईंचे माहेर चांदवड तालुक्यातील नन्हावे येथील. भाऊ लहान पणापासूनच कुशाग्र बुध्दीचे व चौकस होते. भाऊसाहेबांचे शिक्षण इयत्ता १ली ते ४ थी पर्यंत निमगांव येथे झाले. पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे ५ वी ते ७ वी पर्यंतचे शिक्षण दाभाडी, ता. मालेगांव येथे झाले. त्यानंतर मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण नाशिक येथे उदोजी बोर्डिंगमध्ये राहून न्यु इंग्लिश स्कूल येथे झाले. घरची परिस्थिती सामान्य असल्यामुळे उच्च शिक्षणासाठी ते बडोदा येथे गेलेत. तेथे ते बी.ए. झाले. बी.ए.साठी त्यांनी

‘राज्यशास्त्र’ हा विषय घेतला होता. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. पदवीनंतर ते कायद्याचे शिक्षण घेणेसाठी पुणे येथे लॉ कॉलेज मध्ये दाखल झाले. इ.स. १९३२ मध्ये ते एल.एल.बी. पहिल्या वर्गात पास झाले. मराठा समाजातील सामान्य कुटूंबातील भाऊसाहेब वकील झालेत. त्याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन स्वागत होत होते. तेव्हा त्यांनी सांगितले होते. “माझ्या आयुष्याचे ध्येय, माझ्या सारख्या अनेक गरीब विद्यार्थ्यांना हातभार लावण्याचे आहे.” भाऊसाहेबांनी हे विचार कृतीत आणले. भाऊसाहेबांनी स्थापन केलेल्या व त्यांच्या आश्रयाखालील शिक्षण संस्थांचा वटवृक्ष झाला आहे. या वटवृक्षांच्या शितल छायेखाली अनेक पांथस्थ विसावा घेत आहेत.
अध्यक्ष महाराज, या बिलाच्या पहिल्या वाचनाच्या वेळी उत्तरादाखलच्या भाषणांत मी ज्या काही मूलभूत गोष्टी सांगितल्या त्याकडे सन्माननीय सभासदांचे दुर्लक्ष झाले आहे असे मला मोठ्या खेदाने म्हणावे लागत आहे. हा दुरुस्ती कायदा सभागृहापुढे आणीत असतांना या राज्यांतील जमिनीचा प्रश्न कायमचा सोडवीत आहोत असा दावा सरकारने केलेला नाही अथवा शेतावर राबणारा जो मजूर वर्ग आहे त्याचीही व्यवस्था करण्याचा प्रयत्न प्रस्तुत कायद्याने करीत आहोत असे सरकारने म्हटले नाही. असे असतांना देखील चिकित्सा समितीकडून आलेल्या रिपोर्टावर हरकती घेण्यात येत आहेत याबद्दल मला खरोखर आश्चर्य वाटते.