हमीद दलवाई यांच्या “राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान” या पुस्तकामध्ये भारतीय मुसलमान समाजाच्या प्रश्नांवर आणि राष्ट्रीय एकात्मतेवर चर्चा केली आहे त्यांनी मुसलमान समाजातील धार्मिक कट्टरतेला विरोध करताना, आधुनिक विचारसरणी, शिक्षण, आणि स्रीयांच्या अधिकारांसाठी आवश्यक सुधारणांचा विचार मांडला आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्व समाजांनी एकत्र येऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यात भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आदर करून धर्म आणि राष्ट्रवाद यामधील संतुलन कसे राखावे यावरही त्यांनी विचार मांडलेले आहेत. राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन आणि धर्मांधतेचा त्याग करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे आणि भारतातील मुस्लीम समाजाच्या समस्यांवर उपाययोजनांवर भाष्य केले आहे.
धर्मनिरपेक्षता आणि मुस्लीम समाज – दलवाई यांनी धर्मनिरपेहातेच्या तत्त्वांचा आधार घेत भारतीय मुस्लिम समाजाने आधुनिक विचारसरणी स्वीकारावी यावर भर दिला आहे, त्यांनी धर्माच्या अतिरेकी पालनापेक्षा शिक्षण, विज्ञान आणि समाजिक सुधारणांना महत्व दिले आहे.
महिला सक्षमीकरण – मुस्लीम महिलांच्या हक्कांसाठी दलवाई यांनी जोरकस भूमिका मांडली आहे त्यांनी बहुपत्नीत्व, तीन तलाक यांसारख्या प्रथा दूर करून महिलांना समान अधिकार देण्यासाठीची गरज प्रतिपादित केली आहे. त्यांनी धार्मिक रूढी-परंपरांच्या अडचणींबद्दल स्पष्टपणे लिहिले आहे आणि मुस्लिम समाजाचे शिक्षण आधुनिकता, आणि प्रगतीला प्राधान्य दयावे असे सांगितले आहे.
राब्ट्रीय एकात्मता भारतीय मुस्मिम समाजाचा मुख्य प्रवाहात सहभाग वाढवून, देशाच्या प्रगतीत त्यांचा हातभार लागावा यासाठी दलवाई यांनी आवाहन केले आहे. त्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करण्यावर भर दिला आहे.
वरील पुस्तकाचे प्रकाशन 1970 च्या दशकात लिहिले गेले असूनही आजही त्यातील विचार तितकेचे महत्त्वाचे आहेत हे पुस्तक केवळ मुस्लिम समाजापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण भारतीय समाजासाठी एक मार्गदर्शक आहे, दलवाई यांचे विचार आजही धर्मनिरपेक्षता, समाजसुधारणा आणि स्त्री-पुरुष समानतेच्या संदर्भात प्रेरणादायी आहेत. दलवाई यांची भूमिका तात्कालिक काळात वादग्रस्त ठरली असली तरी त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले.