Share

वर्तन परिवर्तन ह्या पुस्तकामध्ये लोकांच्या जीवनामध्ये बदल करून त्यांचे तसेच त्यांच्या संबंधित लोकांमधे बदल कसे केले जातील हे दर्शवले आहे.यामधे अनेक गोष्टी दिल्या आहेत आणि त्या गोष्टींमधून अनेक शिकण्यासारख्या गोष्टी दिल्या आहेत.त्याचा माझ्यावर खूप च सकारात्मक परिणाम झाला. व्यक्तिमत्व म्हणजे काय तर आपले आचार विचार कृती यांचा मिलाफ.आपली प्रशंसा व्हावी असे वाटत असेल तर आपण आपल्या वर्तनावर लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या वागण्याचा दुसऱ्यावर कसा परिणाम होऊ शकतो.अनेक लोक असे का वागतात किंवा का आहेत ह्यामागे काही त्यांच्या भूतकाळातील गोष्टी आहेत, त्याचं आजुबाजूच वातावरण त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व तसे बनले आहे.त्यामधे परिवर्तन आणण्यासाठी काही गोष्टी अवलंबून त्याचा वर्तनामधे समावेश केला पाहिजे हे लेखिकेने संबोधले आहे. छोट्या छोट्या गोष्टींच्या स्वरूपात त्यांनी दैनंदिन जीवनातील गोष्टी मांडल्या आहेत ज्या सहजरित्या समजल्या जातात.त्यामुळे व्यक्तिमत्त्व व व्यक्तिमत्त्व विकास साध्य करणे सहज समजले आहे.

Related Posts