Share

सुलताने अंकिता मोहन वर्ग एफ वाय बी ए मराठी
श्यामची आई, लेखक – साने गुरुजी
वाचनाची आवड तशी प्रत्येक माणसाला असते कारण त्यातून मिळणार ज्ञान जीवनात कठीण काळात मार्ग काढण्यास मदत करते. जसं आपल्याला पुस्तकातून शैक्षणिक ज्ञान मिळते, त्याचप्रमाणे आपल्याला आईकडून जीवनाचे ज्ञान मिळत असते. आई म्हणजे आपल्या जीवनाला मिळालेले एक सुंदर नातं असतं. जन्माआधी आईच्या पोटात शिक्षणाची तयारी सुरू होते. आईच्या संस्कारातून मुलाचे जीवन घडत असतं, कधी शिक्षक होऊन तर कधी आपली सखी होऊन नवनवीन गोष्टीचा बोध आपल्याला ती करून देत असते. वेळ प्रसंगी कठोर देखील होते, याप्रमाणे गोष्टी, आईची विविध रूप, साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात.
साने गुरुजींनी आपल्या आईसोबत अनुभवांच्या गोष्टीच्या रूपाने, सुंदररीतीने सांगितलेल्या आहेत. आई मुलाला त्रास होणाऱ्या गोष्टीपासून लांब ठेवते , त्याचप्रमाणे आपला मुलगा इतर मुलासारखा कशातही मागे राहता कामा नये याकरता हट्टाने रागावून पाण्यात पोहायला त्यांच्या मित्रासोबत पाठविते. तो कुठेही लपून बसला तरी त्याला शोधून ती पाठवते आणि त्यांची भीती घालविते. त्याने शिकावं म्हणून कठोर होऊन रागावते, मायेने जवळ देखील घेते आणि आवडीचा पदार्थ बनवून लाड ही करते. अशा प्रकारच्या ४२ रात्रीचा उल्लेख त्यांनी यात केलेला आहे. आईबद्दल असलेली अपार माया, ममता तिच्याविषयी वाटणारे प्रेम या प्रत्येक गोष्टीतून अतिशय सुरेख वर्णन केले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मला देखील आपली आई आपल्या लेकरासाठी किती कष्ट घेते, याची जाणीव झाली. तिचं रागावणं बोलणं ओरडणं हे केवळ आपल्या मुलाच्या चांगल्यासाठी असतं हे समजलं. त्यामुळे जेव्हा कधी ती माझ्यावर रागवते तेव्हा मी तिच्यावर न चिडता आपलं कुठे काय चुकलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करते. जेव्हा हे पुस्तक वाचन झालं, तेव्हा मला ह्या सर्व गोष्टी माझ्या आईमध्ये अनुभवायला मिळाल्या असल्यामुळे, ‘श्यामची आई’ हे पुस्तक आपल्यातलं वाटलं. माझ्या जीवनात आई विषयी मनात एक संवेदना निर्माण झाली आणि मनाशी एक निश्चय केला आयुष्यात कधीही आईचे मन दुखवायच नाही. तिची खूप काळजी घ्यायची आणि तिच्यावर कविता लिहिण्याची प्रेरणा देखील मिळाली. मी माझ्या आईवर भरपूर कविता लिहिल्या आहेत. साने गुरुजी सारखं आपण आपल्या कवितेच्या रूपात पुस्तकात प्रकाशन करू हे स्वप्न उराशी बाळगून आहे. शिंपल्यात पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही. हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही. निळ्याभोर गगनाला अंत कधी होत नाही. आणि आईच्या मायेचा उल्लेख शब्दात कधी होत नाही. सदर पुस्तक हे प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी उपयुक्त आहे.

Related Posts

मराठी आत्मकथनांतील पारधी समाजजीवन (समीक्षा)

Arjun Anandkar
Shareआधुनिक भारताच्या वाटचालीत काही महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यामध्ये स्वातंत्र्यप्राप्ती आणि संविधानाची निर्मिती यांचे स्थान महत्त्वाचे आहे. भारताने वासाहतिक व्यवस्थेकडून प्रजासत्ताक...
Read More

हि वाट एकटीची

Arjun Anandkar
Shareही वाट एकटीची या कादंबरीची नायिका आहे विद्युलता उर्फ बाबी. बाबी एक स्वातंत्र्य विचारांची तेजस्वी, निर्भीड व करारी मुलगी आहे....
Read More

नातेसांबांध

Arjun Anandkar
Shareपस्तक जग जवळ येताना हे अजित बालकृष्णन यांच्या विचारशील लेखनाचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. हे पुस्तक त्यांच्या जीवनातील विविध...
Read More