Share

श्यामची आई हे साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले आत्मकथनात्मक पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित असून त्यांच्या आईच्या महान त्यागाचे आणि संस्काराचे प्रभावी चित्रन करते. साने गुरुजींच्या लेखनातून आईच्या निस्सीम प्रेमाची त्यागाची आणि कर्तव्य भावनेची अप्रतिम कहानी उलगडते. ही कथा श्याम या मुलाच्या भोवती फिरते. श्यामचे बालपण गरीब व संस्कारक्षम कुटुंबात घडते. श्यामची कुटुंबाची परिस्थिती अत्यंत कठीण असते. वडील फारसे शिकलेले नसल्याने त्यांना रोजगार योग्य मिळत नाही. या परिस्थितीत श्यामची आई कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. ती कष्टाळू संयमी आणि त्यागशील स्वभावाची आहे. तिने आयुष्यातील सर्व दुःख आणि त्रास सहन करूनही आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले. श्यामची आई हे पुस्तक आईच्या ममतेची गोष्ट नाही. तिच्या नैतिकता, समाजसेवा आणि कर्तव्याचेही उत्कृष्ट उदाहरण आहे. ती आपल्या मुलांना कष्ट करण्याचे महत्त्व शिकविते. आणि त्यांना कधीच निराश होऊ देत नाही. श्यामच्या आईने त्यांना सत्य आणि प्रामाणिकपणाचे धडे दिले. श्यामला नेहमी इतरांची मदत करण्याची करण्यास प्रेरित करते .श्यामची आई नेहमी देवावर श्रद्धा ठेवून कष्ट आणि त्यागाची शिकवण देते. पुस्तकात अनेक प्रसंगांमध्ये आईच्या कर्तुत्वाचे उल्लेख आहे. श्यामला शाळेत पाठवण्यासाठी ती कष्टाने पैसे पाठवते. आणि त्याच्या शिक्षणासाठी शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलते. श्यामच्या आईचे ध्येय स्पष्ट असते की, आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे आणि त्यांना उत्तम व्यक्ती बनविणे .आईच्या त्यागामुळे श्यामच्या मनात तिच्याविषयी अपार प्रेम निर्माण होते. ते श्यामच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्याला योग्य मार्गदर्शन करते. आणि त्याला सदाचरणा चे धडे देते. श्यामच्या आईने तिच्या आयुष्यात अनेक संकटे सहन केली आहेत. पण तिच्या मुलांच्या शिक्षणात आणि विकासात तिने कधीच कमीपणा येऊन दिलेला नाही. पुस्तकाचा शेवट अत्यंत भावनिक आहे. श्यामची आई आजारी पडते आणि अखेरीस तिचे निधन होते. तिच्या निधनानंतर श्यामच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण होते. पण तिच्या शिकवणीतून तो आपले जीवन सत्कारणी लावतो. आईच्या आठवणीने त्याला नेहमी प्रेरणा मिळते श्यामची आई हे पुस्तक एक आदर्श आईचे उदाहरण आहे. या पुस्तकातून साने गुरुजींनी त्यांच्या आईवर असलेले अपार प्रेम आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. भारतीय समाजातील आईच्या भूमिकेचा गौरव करताना गुरुजींनी तिला नवी ओळख दिली आहे. श्यामची आई हे पुस्तक केवळ साहित्यिक दृष्टिकोनातून नव्हे, तर नैतिक मूल्य संस्कार आणि समाजसेवा दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे. त्यामुळे हे पुस्तक भारतीय साहित्यातील एक अमूल रत्न मानले जाते.

Related Posts