Share

Name of the Reviwer: Kadam Gourav Santosh
Name of the College: Nowrosjee Wadia College, Pune
जगप्रसिद्ध हास्यसम्राट चार्ली चॅप्लिन यांचं जीवनचरित्र सांगणारे हे पुस्तक आहे समस्त जगाला हसवणारा लहानपणापासूनच दुःखाचे किती अश्रू लपवले पचवले गरिबीची झळ सोसली मात्र याची जाणीव इतरांना होऊ नये यासाठी धडपड करत राहिला. या हास्य सम्राटाच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा त्याच्या अंतर्मनात देखील अगदी तसंच आहे हे लेखकाने अगदी अचूक वर्णन केले आहे
पुस्तकांच्या सुरवातीलाच लेखकाने एक अतिशय दुर्दैवी प्रसंग रेखाकला आहे. चार्ली ची आई गाण्याचा कार्यक्रम करण्यास रंगमंचावर उभी असते अचानक तिचा आवाज जातो आणि गाणं थांबतो तिला रंगमंचावर थांबता येत नाही मात्र पैसे देऊन आलेल्या लोकांचे मनोरंजन झालेच पाहिजे यासाठी अवघ्या पाच वर्षाच्या चार्लीला रंगमंचावर उभे राहून आपल्या बोबड्याबोलात आईचे अर्धे गाणे पूर्ण करतो आणि प्रेक्षकांचे मन जिंकतो हे त्याचे रंगमंचावर पडलेले पहिले पाऊल अतिशय हलकी ची परिस्थिती आईला अधून मधून येणारा वेडाचा झटका यातून चारली सावरत होता मोठा सावत्र भाऊ सीड मुळे चार्लीला काहीसा आधार मिळाला पण याच संघर्षातून आणि आईच्या संस्कारातून तो एक प्रगल्भ कलाकार घडत गेला त्याच्या भाग्याचा दिवस म्हणजे एका दिग्दर्शकाने त्याला विनोदी भूमिका करण्यास बजावले मोठी ढगळ विजार बॅगी पॅंटवर तंग जॅकेट कोट हॅट हातात काठी मोठे बूट असा पेहराव त्याने केला त्याची चालीने एक विनोदी व्यक्तिरेखा उभी केली. हुकूमशाही हिटलर आणि चार्ली यांचा जन्म एकाच आठवड्यात झाला एकाने लाखोंच्या आयुष्य उद्धात उध्वस्त केले तर चार्लीने त्याच लोकांना हसवून जीवन जगण्याची प्रेरणा दिली. यशाच्या प्रवासात चार्लीने संसाराकडे दुर्लक्ष केले पण उतरत्या वयात त्याच्या चौथ्या पत्नी उना यांनी त्याची साथ शेवटपर्यंत सोडले नाही त्याचे नेपोलियन व येशू ख्रिस्त चित्रपट काढण्याची इच्छा अधुरीच राहिली अमेरिकेने त्यांना ऑस्कर देऊन आदराने गौरव केला शेवटी 1977 सालच्या नाताळच्या दिवशी ते या नाट्यमय जगातून निघून गेले हसरे दुःख हे एक महान मूक अभिनय सम्राटाचे जीवन चरित्र वाचताना अनेक प्रसंग मनाला भिडतील वचकांमध्ये वेगळी उमेद निर्माण होऊन परिस्थिती समोर न झुकता अपार कष्टांद्वारे जीवनाची उंची गाठण्याची प्रेरणा मिळेल म्हणून वाचकाने चार्ली चापलींचे आत्मकथन एकदा जरूर वाचवे.

Related Posts

उपाशी

Manojkumar Thakur
ShareReview By Prof. Allapurkar Renuka Subhash, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune अन्न, वस्त्र, निवारा यामधील सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे...
Read More