रिच डॅड पुअर डॅड हे रॉबर्ट टी कियोसाकी यांनी लिहिलेले एक अतिशय लोकप्रिय वित्तीय स्वातंत्र्य विषयीचे पुस्तक आहे. हे पुस्तक दोन वेगवेगळ्या पित्यांच्या दृष्टिकोनातून सांगितले जाते. एक गरीब बाबा (लेखकाचा खरा बाबा) आणि एक श्रीमंत बाबा (त्यांच्या मित्राचा बाबा). पुस्तक वित्तीय शिक्षण, गुंतवणून, व्यवसाय उभारणी आणि पैश्या बद्दलच्या मानसिकते बद्दल मूलभूत तत्वांवर प्रकाश टाकते.
मुख्य संकल्पना
पैसा म्हणजे काय ? गरीब बाबा पैशाला नोकरी मिळविण्याचे साधन मानतात, तर श्रीमंत बाबा पैशाला पैसे कमविण्याचे साधन मानतात.
वित्तीय साक्षरता, आर्थिक तत्वे, गुंतवणून, नियोजन यांचे ज्ञान मिळते.
पुस्तक आसक्ती आणि मालमत्ता यांच्यातील फरक स्पष्ट करते. आसक्ती म्हणजे खर्च करून संपणारी गोष्ट आहे. तर मालमत्ता म्हणजे उत्पन्न निर्माण करणारी गोष्ट आहे.
पुस्तक पैश्या बद्दलची आपली मानसिकता बदलून आपण आपल्या वित्तीय भविष्याचे नियंत्रण घेऊ शकतो.
पुस्तक आपला स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे महत्व अधोरेखित करते. ज्यामुळे आपण वित्तीय स्वातंत्र्य प्राप्त करू शकतो.
Bhoye Anjali Subhash (M.V.P. Samaj Adv. Vitthalrao Ganpatrao Hande College of Education, Nashik.)