Share

UPSC मी आणि तुम्ही
– Ansar shaikha
रिक्षा चालकांच्या मुलाने रचला इतिहास
परिस्थितीवर मात करत बनला सर्वात तरुण IAS

मराठवाड्यासारख्या मागास विभाग (जालना जिल्हा शेलगाव सारखा छोटं गाव) आणि मुस्लिम समुदायातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास स्तरातून आलेला जणु या घटकांचे प्रतिनिधीक रूपच आहे. अशा दुर्बल घटकातील व्यक्तीला प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून जगण्याठीच तीव्र संघर्ष करावा लागतो जिथे जगण्यासाठीचा संघर्षच असतो. तिथे शिक्षण घेणं उच्च शिक्षणापर्यंत मजल मारणं आणि प्रशासकीय अधिकारी व्हायचं ठरवलं असं स्वप्न पाहिलं, या स्वप्नालाच आपल्या जीवन संघर्षाचे अविभाज्य अंग बनवलं आणि ते तडीस नेले भोवतालची व्यवस्था पतिकुल असूनही न डगमगता अन्सारनच इथं पर्यंत कलेला हा प्रवास अपवादात्मक ठरतो. म्हणूनच तो जाणून घेणं महत्त्वपूर्ण ठरते.
महाराष्ट्रातील मराठवाड्या भागातील ऑटो रिक्षा चालक युनुस अहमद शेख यांच्या घरी अन्सार यांचा जन्म झाला. अन्सार शेख चे वडील दारूच्या व्यसनामध्ये बुडलेले होते. त्यांनी तीन लग्न केले होते. आंसर ची आई त्याची दुसरी पत्नी होते. त्याला शेतमजुरी करून अन्सार ला मोठे केले आणि त्याचा धाकटा भाऊ अनीसने इयत्ता 7 वी मध्ये शाळा सोडली आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी व अन्सार ला आयएएस परीक्षेच्या तयारी साठी मदतकरण्यासाठी गॅरेज मध्ये काम केले तो कामाचा महिना भरल्यावर पुर्ण पगार 6 हजार रुपये आपल्या मोठ्या भागाला पाठून द्यायाचा.
आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक राहण आणि प्रयत्न करत राहणे खूप गरजेचे असते 9 वीला असताना महाराष्ट्र शासनाची एक घरकुल योजना होती त्या योजनेचे 30 हजार रुपये मिळाले ते आपल्या वडीला सोबत आणण्यासाठी गेला तर तिथल्या अधिकाऱ्याने 3 हजार रुपयांची लाच घेतली त्या मुळे विचार केला की हे चुकीचे आहे. त्या मुळे त्याना कळाले की भष्टाचार हे एका प्रकारचे शोशन आहे. त्याला जर बदलायच असेल तर ज्यांनी ते भोगलय त्याने तिथे पोहचले पाहिजे त्यामुळे त्यांने विचार केला की मला यांच्या पेक्षा मोठा अधिकारी व्हायचं आहे.
अन्सार शेख पहिल्या प्रयत्नात 21 मराठी माध्यमातून (IAS) झाला या पेक्षा अनेक दुर्बलताचा सामना करत ज्या पद्धतीनं इथपर्यंत पोहचला ते अधिक महत्त्वाचे आहे भारतात, जात, वर्ग, लिंगभाव, धर्म प्रदेश भाषा इत्यादी घटकांवर आधारित अत्यंत गुंतागुंतीच परस्पर व्याप्त आणि विषम स्वरूपाच समाज वास्तव आहे. या विषम वास्तवांना अनेक समाज घटकांचा किमान पातळीवर जिवन जगण्यासाठी आवश्यक क्षमता आणि संधी या पासून वंचित ठेवलं आहे.परिणामी , त्यांना अनेक दुर्बलताचा सामना करत कठीण अवस्थेत जीवन जगाव लागला.
★वयाच्या 21 व्या वर्षी अन्सार शेखने इतिहास रचला :-

UPSC परीक्षा उत्तम निकालासह उत्तीर्ण केल्यानंतर 21 वर्षीय तरुणाने ऑल इंडिया रँक मध्ये स्थान मिळविले आणि या वयात तो सर्वात तरुण IAS अधिकारी बनला. अन्सार शेख यांचे बालपण एखाद्या लढाई पेक्षा कमी नव्हते. सर्व संकटाशी झुंज देत अन्सारने आपले ध्येय कधीही सोडले नाही. आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास इच्छुक नसलेल्या अन्सारने एक नवीन मार्ग स्वीकारला ज्याने आज एक इतिहास घडवला पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अन्सार ने नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज केला आणि तेथे त्यांने 275 पैकी 199 गुण मिळवले. अन्सार ने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश खेचून आणले आहे.
★ गरिबी आणि यशाचा काही संबंध नाही:
अन्सार अहमद शेख IAS आपल्या यशाबद्दल म्हणाले.
कष्टाला पर्याय नाही माझ्या संघर्षादम्यान, माझ्या मित्रांनी मला मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या खुप मदत केली आणि माझ्या आर्थिक परिस्थिती मुळे माझ्या कोचिंग अकॅडमी चा फीचा काही भाग माफ केला. अन्सार शेख एकदा IAS उमेदवारांना दिलेल्या संदेशात म्हणाले होते. तुम्हाला वाटत असेल की तुमची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांशी आहे तर तुम्ही चुकत आहात. तुमची स्पर्धा फक्त तुमच्याशीच आहे. त्यामुळे तुमच्या सर्व निराशावादी विचारांपासून मुक्त व्हा म्हणजे यश तुमच्या वाट्याला येईल. बरेच लोक गरीब असल्याचे कारणे देऊन अभ्यास करणे.टाळतात. पण लक्षात ठेवा गरिबी आणि यश या दोन भिन्न गोष्टी आहेत आहेत. आणि त्याचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. तुम्ही मेहनती आणि तुमच्या ध्येयाकडे निश्चय असले पाहिजे.तुमची पार्श्वभूमी महत्त्वाची नाही. त्या मुळे अन्सार शेख गालिब यांचा एक शेर म्हणतात.की

“हातो के लकिरो पर मत जाये गालिब
नशीब तो उनके भी होते है जिनके हात नहीं होते.”

IAS अधिकारी अन्सार शेख यांचे सर्वांना प्रेरणा देणारी कथा आहे.तो भारतातील सर्वात तरुण IAS अधिकाऱ्यापैकी एक आहे. IAS टॉपर अन्सार अहमद शेखने 2016 मध्ये पहिल्यां प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.परतु 2016 च्या बॅचमधील आणि देशातील सर्वात तरुण IAS अधिकारी (THE YOUNGEST IAS OFFICER IN THE COUNTRY) या नावाने ओळखले जाते.

Recommended Posts

The Undying Light

Vandana Chavan
Share

ShareBook Review: Ahire Shubham First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana अनडाइंग लाइट’ हे गोपाळकृष्ण गांधींनी लिहिलेलं, हे पुस्तक असून या महिन्यात प्रकाशित झालेलं पुस्तक वाचून बाजूला ठेवले. स्वतंत्र भारतातला त्यांचा वैयक्तिक इतिहास या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाचं शीर्षकही किती […]

Read More

THE CANTONMENT CONSPIRACY

Vandana Chavan
Share

ShareBook Review: Manish Baliram Sawkar, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana THE CANTONMENT CONSPIRACY पहलगामजवळच्या बैसरनमध्ये २२ एप्रिलचा तो हल्ला झाला नसता, तर आज कदाचित मुंबई-पुण्यातही माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या नव्या पुस्तकाचे स्वागतसोहळे (बुक-लाँच इव्हेन्ट्स) उत्साहानं भरले […]

Read More