Share

महानायक
लेखक विश्वास पाटील
विश्वास पाटील लिखित नेताजी सुभाष चंद्र भोस यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित महानायक पुस्तक नुकतेच वाचून संपवले पुस्तकंबद्दल आणि लेखका बद्दल सांगायला शब्द अपुरे पडत आहेत. महत्वाचे म्हणजे ज्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावर हे पुस्तक आधारित आहे .त्यांचे व्यक्तिमत्व लिहिण्यासाठी मुळात कितीही शब्द लिहिले .तरी अपुरे पडतील. नेताजीच्या आयुष्य खूपच वेगळे होते .आपण कल्पनाही करू शकत नाही असा गोष्टी त्यांना शक्य करून दाखवल्या होत्या केवळ आपली मातृभूमी स्वातंत्र्य करण्याच्या एकाच ध्यासापोटी ! त्यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यावर लहानपणापासून तर मृत्यूपर्यंत इतक्या तपशीलावर पुस्तक लिहिणे खूप जिकरीचे काम होते. इतिहासाचे संदर्भ चुकायला नको हे लेखक पुढे आवाहन असतो. माझ्या माहितीनुसार सात-आठ वर्ष संधीधन करून सतत लोकांच्या मुलाखती घेऊन तसेच अनेक जापानी इंग्रजी व इतर भाषेतील पुस्तके यांचा संदर्भ घेऊन विश्वास पाटील यांनी हे भले मोठे सातशे पानांचे पुस्तक लिहिले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांतरासाठी सिरस्कार व्हावे यासाठी लेखकाने संपादित केलेली लोक आवृत्ती मी वाचली. या पुस्तकांचे भाषांत अनुवाद केला आहे. या कादंबरीचे एकूण १९ मोठे प्रकरण आहेत आणि विसावा भाग अपसहार आहे. पुस्तकाचा उरलेला अर्धा भाग भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुभाष चंद्र हे पेशावर अफगाणिस्तान जर्मनी, इटली, जपान ,सिंगापूर, बँकॉक, बाह्य देश यांसारख्या ठिकाणी कसे जातात ते सांगतो. दुसरे महायुद्ध १९३९ ला सुरू झाल्यानंतर त्याचा कायदा. घेऊन ब्रिटिशांना जैरीस आणण्याचे ही त्यांची महत्त्वाची कांगशा होती .त्यासाठी ब्रिटिशांच्या शत्रू शब्द गटाला भेदून त्यांच्या करवी भारतीय युद्ध कैदी एकत्र करून आझाद हिंद सेना स्थापन करायची आणि ब्रिटिशांच्या कोहिमा येथून आक्रमण करायचे आणि दिल्ली जिंकायची अशी त्यांची योजना होती.महानायक या कादंबरीचे भाषाशैली अतिशय सोपी आणि दर्जेदार अशी आहे. त्यामुळे वाचकाला ती भाषा आवडते. या पुस्तकाचे गणसंख्या सातशे इतके आहे त्यामुळे हाताळण्यास थोडे कठीण आहे माननीय योग्य पद्धतीने केली आहे . महानायक या कादंबरीचे किंमत ५४० इतकी असून सर्वसामान्यांना परवडणारे आहे.

ऋतुजा पंढरीनाथ महाले
प्रथम वर्ष,कला, त्र्यंबकेश्वर

Related Posts