संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर
विद्यार्थी – पवार अनुज दिपक
वर्ग – एफ .वाय.बी.सी.ए.
पुस्तकाचे नाव – यशाची गुरुकिल्ली
लेखकाचे नाव – आशा परुळेकर
पुस्तक परीक्षण / पुस्तक अभिप्राय
जीवनात यशस्वी होणे म्हणजे आकाशातील चंद्राची अपेक्षा धरणे नव्हे. यश हे अप्राप्य नसते. अनेक व्यक्तिगुणांचे पैलू त्याला चिकटलेले असतात. यश हे माणसाचे भाग्य,.त्याचे सुख-समाधान ठरविण्यास मदत करणारे असते. आपण भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासाची पाने उलटून बघितली, तर त्याची आपल्याला प्रचीती येईल. हेलन केलरने आपल्या अंधपणावर अपार प्रयत्न व कष्ट करून मात मिळविली. डेमोस्टथेनिस हा तोतरा होता. पण महत प्रयत्न करून त्याने आपल्या व्यंगावर केवळ मातच मिळविली. असे नाही, तर तो उत्तम वक्ता बनला. शिवाजी महाराजांनी अपार पराक्रम, धैर्य, चिकाटी, मिष्ठा या माध्यमांतून हिंदवी स्वराज्य प्राप्त केले.