Share

Book Review : JADHAV UMESH MUKUNDA, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati, Nashik.

प्रास्ताविक :
भारतात गेल्या २५०० वर्षात अशी एकही प्रौढ व्यक्ती झाली नाही की जिने चलनाचा कधीच वापर केला नाही. सध्या आपण नाणी, नोटा, क्रेडिट, डेबिट कार्ड इ. चा वापर आर्थिक व्यवहारात करतो. सध्याच्या युगात या गोष्टी मुबलक प्रमाणात आपल्याकडे असतील तरच आपले जीवन सोपे होईल अन्यथा नाही, पण अश्मयुगात आदिमानवाच्या काळात चलन नव्हते, त्याची गरजच नव्हती. चलन जरी नसले तरी काही प्रमाणात वस्तुविनिमय जरूर होता. तसे पाहता देवघेवीची कृती आजही तीच आहे. त्याचे माध्यम फक्त बदलले आहे.
साधारणतः नवाश्मयुगाच्या काळात माणूस स्थिर शेती करू लागला.
तेव्हापासून पशुंना खरेदी-विक्रीतील माध्यम मानले गेले. होमर या कवीने ग्रीक महाकाव्य ‘इलियड’ मध्ये गाईंचा स्वरूपात वस्तूच्या किंमती दिल्या आहेत. पारशी ग्रंथ ‘झेंद अवेस्ता’ यातही डॉक्टरची फी गाईच्या रूपात दिली आहे. भारतातही वैदिक कालखंडात ‘गाय’ हे विनिमय माध्यम दिसते.

सारांश
शिवशाही, पेशवाई आणि आंग्लाईचा पहिला टप्पा यांच्या संदर्भात लेखकाने चलनपद्धतीचा अभ्यास केला आहे. मात्र हा सुटा सुटा अभ्यास नसून तो एका उत्क्रांतिप्रक्रियेचा वेध आहे. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा, विशेषतः अठराव्या शतकाचा पुनर्विचार सध्या केला जात आहे. मराठ्यांच्या इतिहासाच्या पारंपरिक चाकोऱ्या मोडून आता नव्या दिशांनी विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. अंशां टप्प्यावर मराठा कालखंडाचे प्रा. प्रभुणे यांचे चलनविषयक संशोधन अभ्यासकांना विशेष उपयुक्त ठरू शकेल. ब्रिटिश काळात जे चलनविषयक बदल झाले, त्यांचे निव्वळ वर्णन करून प्रा. प्रभुणे थांबलेले नाहीत. ब्रिटिशकालीन नाणी व चलनपद्धती यांकडे ‘ब्रिटिश धुरिणत्वाचे साधन’ म्हणून पाहण्याची त्यांची दृष्टी अत्यंत अर्थपूर्ण आहेः तत्कालीन वसाहतवादी अर्थव्यवस्था. आणि साम्राज्यवादाचे प्रभुत्वमार्गी तत्त्वज्ञान यांच्या संदर्भचौकटीत नाणे आणि चलनपद्धतीचा अभ्यास केला तर त्याची फलनिष्पत्ती अगदी वेगळी आणि अर्थपूर्ण ठरेल. प्रा. प्रभुणे यांचा प्रयत्न या प्रकारचा आहे. प्रा. प्रभुणे हे भारतविद्येचे अभ्यासक आहेत. नाणेसंग्राहक आहेत. नाणकशास्त्र, अभिलेखविद्या, मोडी लिपी, फारसी भाषा, छायाचित्रण, गड-किल्ल्यांचा अभ्यास, इ. गोष्टींमध्ये त्यांना रस आणि गती आहे.

निष्कर्ष
जुन्या नाण्यांचा संग्रह व अभ्यास हा छंद ‘जिवाला पिसे’ लावणारा छंद आहे, पण बऱ्याचदा शालेय जीवनातील हे वेड, कॉलेजला जाण्याच्या आतच विरते. या छंदाला थोडीफार शास्त्रीय माहितीची जोड दिल्यास तो आयुष्यभरासाठी एक आनंदाचा स्रोत बनतो.
नाशिकच्या साधारणतः पश्चिमेस नाशिक त्र्यंचकेश्वर रस्त्यावर निम्म्या अंतरावर ‘भारतीय नाणे शोध संस्था’ (Indian Institute of Research in Numismatic Studies) अंजनेरी या गावाजवळ आहे. सामान्य प्रेक्षकापासून ते मुरलेल्या संशोधकांपर्यंतच्या नाणेप्रेमींची ही। जणू ‘पंढरी’ आहे. जगप्रसिद्ध संस्था सुसज्ज ग्रंथालय, तज्ञ सुस्वभावी प्राध्यापक, हजारो छायाचित्रे, नाणेविषयक प्रकाशने, उत्तम विश्रामगृह, नाणी-लिपी परिचय वर्ग, नियतकालिके, आंतर्राष्ट्रीय कार्यशाळा ही या संस्थेची वैशिष्ट्ये होत.
कोणतेही चलन ही तत्कालीन अर्थव्यवस्थेची नाडी असते. सध्याचे चलन हाताळताना या चलनाच्या इतिहासाबाबत आपोआप उत्सुकता निर्माण होते. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राला, लेणी, किल्ले या परंपरांप्रमाणे चलनाची, नाण्यांची मोठी परंपरा आहे.आधुनिकपूर्व महाराष्ट्रातील चलनाला, नाण्यांना केंद्रस्थानी ठेऊन, इतिहासाच्या साक्षीने मांडलेला हा एक छोटा अभ्यास आहे. आधुनिक चलनाचा पाया म्हणून, मराठा चलन व ब्रिटिश चलन यांच्यातील सातत्य- बदलाचा हा एक मनोरंजक व माहितीपूर्ण असा वेध आहे.

Recommended Posts

Ikigai

jkrcbr
Share

ShareGaikwad Sanjay Dattatray; Bharatiya Jain Sanghatana’s Arts, Science & Commerce, Wagholi, Pune The Japanese Secret to a Long, Healthy and Happy Life, or Ikigai, is a book written by two authors, Hector Garcia and Francesc Miralles. Ikigai means the secret of life, […]

Read More

दीक्षांत

jkrcbr
Share

Shareपुस्तक परीक्षण – प्रोफेसर डॉ . सिद्धेश्वर विठ्ठल गायकवाड,भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,वाघोली ता. हवेली जि. पुणे. पुस्तक की लेखिका डॉक्टर सूर्यबाला का जन्म 25 अक्टूबर 1944 को वाराणसी में हुआ वह कायस्थ परिवार में जन्मी है। आपने अपनी […]

Read More