Share

रोंडा बायर्नचे “द सिक्रेट” हे पुस्तक सकारात्मक विचारांची शक्ती आणि आकर्षणाचा नियम शोधते,
या पुस्तकात जसे तुम्ही विचार करता तसेच तुम्हाला मिळते आणि तुम्ही तसेच बनता परिस्थिती तुम्ही आकर्षित करते त्यामुळे आपण पुढे जाऊन त्या सर्व गोष्टी मिळू शकतो याची कल्पना केली आहे. ही गोष्ट आपल्याला आधीपासूनच माहित आहे पण त्याचा उपयोग तुम्ही चुकीच्या पद्धतीने करता आला आहे कारण त्याचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला कोणीही शिकवले नाही पण हे आता तुम्हाला शिकवले जाणार आहे याचा वापर करून तुम्ही तुमचे जीवन बदलणार आहे तुम्ही ही गोष्ट शिकल्यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता. जसे की तुम्ही एखाद्या चुकीचे काम करता त्यावेळेस तुम्हाला खूप सारे जण ओरडणार असतात तेव्हा तुम्ही या परिस्थितीविषयी तुमच्या डोक्यामध्ये खूप विचार केलेला असतो तुम्ही तुमच्या डोक्यात जी कल्पना तयार करता त्यालाच म्हणतात द सीक्रेट आपल्या मनामध्ये निर्माण झालेले मानसिक विचार सकारात्मक विचारात रूपांतर करणे या लेखिकेने हजारो पुस्तके वाचले आणि आपल्यासाठी एक सोपी पद्धत निर्माण केले एखाद्या गोष्टीविषयी मानसिक चित्र बघणे हे आपल्या विचारांना मजबूत करते जेवढे शक्तिशाली आपली मानसिक चित्र असेल तेवढे शक्तिशाली विचार येतील तसे तुम्ही विचार कराल तसे तुम्हाला जग दिसेल जेव्हा तुम्ही मानसिक चित्र बघता तेव्हा तुम्ही ते साकार करता कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामधील हिरो आहात. स्वतःला निगेटिव्ह रोल देऊ नका जसे तुम्ही स्वतःला रोल द्याल तसेच तुम्ही स्वतःला पहाल जी गोष्ट तुमच्या डोक्यात आहे तीच गोष्ट तुमच्या शरीरात येत असते आतापर्यंत या पृथ्वीवरचे शोध लावले गेले आहेत त्यांचा अभ्यास केला असता असे जाणवले की जे त्यांच्या डोक्यात होते तेच त्यांच्या शरीरात होते म्हणून नवीन शोध लागले आहेत. त्यावेळेस तुमच्या स्वतःवरती विश्वास असतो त्यावेळेस त्या गोष्टी घडल्याशिवाय राहत नाहीत एक गोष्ट खूप छान सांगितले आहे . एक चित्र जेवढी माहिती देते ती माहिती हजार शब्द देऊ शकत नाहीत फक्त सकारात्मक चित्र पुरेशी नाही तर भावना सुद्धा खूप महत्त्वाच्या रोल पार पाडतात भावना शिवाय कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य पूर्ण होऊ शकत नाही म्हणून आयुष्यात तुम्ही भावना सोबत घेऊन चला
त्या गोष्टी तुम्हाला आनंदाने प्रेमाने चांगल्या भावनांनी मिळून जातील.

Related Posts

यशोदा पाडगावकर यांचे आत्मचरित्र

Sneha Salunke
Shareलक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून सुनिता देशपांडे यांच्या पर्यंत स्त्रियांनी विशेषतः साहित्यिकांच्या पत्नींनी लिहिलेल्या आत्मवृत्तांमुळे मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे. ‘कुणास्तव...
Read More